लाल ड्रॅगनने शेतकरी मालामाल ; पुणे मार्केटला मिळतोय तब्बल ‘इतका’ दर ; सरकारही देतंय हेक्टरी 1,60,000 रु. अनुदान, पहा अर्ज प्रोसेस…
ड्रॅगन फळाचा हंगाम पुण्याच्या मार्केट यार्डात बहरला आहे. पुण्यात त्याची सध्या एक ते दोन टनापर्यंत आवक होत असून, लाल रंगाच्या गराच्या फळाला मागणी वाढू लागली आहे. रंगाने लाल- गुलाबी असलेल्या आणि आतून लाल किंवा पांढऱ्या रंगाचा गर, चवीला आंबट गोड असलेल्या ड्रॅगनला सरासरी एका किलोला 100 ते 200 रुपये दर मिळत आहे. गेल्या आठवड्यात ड्रॅगनची आवकही 4 ते 5 टनांपर्यंत होत होती. मात्र, पावसामुळे पुन्हा आवक घटली आहे. येत्या आठवड्यात पुन्हा आवक वाढेल, असा अंदाज आहे.
पुण्यातील गुलटेकडी मार्केट यार्डात सध्या लाल रंगाच्या ड्रॅगन फळाने ग्राहकांचे लक्ष वेधून घेतले आहे. वरून आकर्षक वाटणाऱ्या या फळाची आवक वाढली असून मूळचे परदेशी असलेल्या या फळाची आता आहे. महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांमध्ये लागवड केली जात परिणामी, गुलटेकडी मार्केट यार्डात त्याची आवक होत असून खरेदी विक्रीचे व्यवहारही होत आहेत.
हे ड्रॅगन फळाचे व्यापारी नितीन कुंजीर म्हणाले, ड्रॅगन फळ चीन, मलेशिया, थायलंड या देशातील पीक आहे. या फळाची लागवड हलक्या मुरमाड जमिनीत होते. हे फळ दिसायला आकर्षक आहे. फळाच्या वरील भाग हा लाल रंगाचा असला तरी आतूनही फळाचे गर हे लाल आणि पांढऱ्या रंगाचे असतात. मार्केट यार्डात सद्य : स्थितीत अवघी एक ते दोन टनाची आवक होत आहे .
जम्बो रेड नावाच्या नवीन जातीच्या ड्रॅगन फळाची बाजारात आवक सुरू झाली आहे. जम्बो रेड या जातीच्या फळाचीआवक बारामती भागातून होत आहे. या फळाची प्रामुख्याने बारामती, इंदापूर, बार्शी, सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातून तसेच नगर जिल्ह्यातून आवक होत असून शेतकरी मालामाल होत आहे.
ड्रॅगन फ्रुट लागवड अनुदान योजनेसाठी 2021 मध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून ड्रॅगन फ्रुटच्या लागवडीसाठी राष्ट्रीय एकात्मता फलोत्पादन अभियानाच्या अंतर्गत एकरी 65 हजार रुपये अनुदान म्हणजे 1 हेक्टरसाठी 1 लाख 60 हजार रुपये अशा प्रकारे अनुदानासाठी अधिकारीक घोषणा करण्यात आली होती.
या अनुदानासाठी शेतकऱ्यांनी mahadbt Portal ऑनलाईन पद्धतीने अर्ज केले होते. त्या पात्र शेतकऱ्यांना लॉटरी लागली आहे. परंतु बरेच असे शेतकरी आहेत की त्यांना लॉटरी लागल्यानंतर कोणती कागदपत्रे अपलोड करायची ? लागवडीचा खर्च ? अंदाजपत्रक ? अनुदान कशा प्रकारे मिळेल ? या सर्व प्रकारची माहिती नसते. त्यामुळे ते या अनुदानासाठी पात्र असूनही अनुदानापासून वंचित राहतात. तरी शेतकरी मित्रांनो तुम्ही ड्रॅगन फ्रुट लागवड अनुदान योजनेसाठी अर्ज केला नसेल तो अर्ज कसा करायचा ते ही आपण पाहूया…
ड्रॅगन फ्रुट लागवड अनुदान योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा कराल ?
सर्वप्रथम तुम्ही राज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टल वर जावं लागेल.
त्यानंतर होम पेज वर तुम्हाला https://mahadbtmahait.gov.in/Farmer/Login/Login करावं लागेल.
या ठिकाणी तुमचा युजर आयडी पासवर्ड (User ID Password) टाका. त्यानंतर कॅप्चा कोड भरून तुम्हाला लॉगिन करावे लागेल.
लॉग इन केल्यानंतर तुम्हाला होमपेज तुमच्यासमोर उघडेल. या पेज वर तुम्हाला सरकारी योजना हा ऑप्शन दिसेल.
या मधून तुम्हाला ‘फलोत्पादन'(‘Horticulture’) नावाचा ऑप्शन दिसेल. या ऑप्शनवर क्लिक केल्यावर तुम्हाला फलोत्पादन अर्जावरील संपूर्ण माहिती भरा.
त्यानंतर तुम्हाला ‘एकात्मिक फलोत्पादन’ हा ऑप्शन निवडा. यामध्ये तुम्हाला विविध फळांचे ऑप्शन दिसतील.
या फळांमधून तुम्ही ड्रॅगन फ्रुट नावाच्या ऑप्शन वर क्लिक करा.
अर्ज भरून दिल्यानंतर मी अर्ज केलेलया बाबींवर जाऊन छाननी अंतर्गत बाबींचा समावेश न झाल्याने ते दाखवणार नाही. त्यासाठी तुम्हाला पुन्हा होमपेज वर जावं लागेल.
व तुम्ही निवडलेल्या बाबीची पूर्तता करावी लागेल. तसेच योजने बाबीचा अटी-शर्ती मला मान्य आहे, या गोष्टीवर क्लिक करून अर्ज सादर करायचा आहे.अशाप्रकारे ड्रॅगन फ्रुट या फळ लागवडीसाठी तुम्ही शासकीय अनुदान मिळू शकतात…
लॉटरी लागल्यानंतर कागदपत्रे कशी अपलोड कराल ?
ज्या शेतकरी मित्रांची ड्रॅगन फ्रुट लागवड अनुदान योजनेसाठी निवड झाली आहे. त्यांनी खालील 4 पेजेस फॉर्म / अंदाजपत्रक डाउनलोड करावं. त्यामधील सर्व माहिती काळजीपूर्वक भरून ते तुम्हाला महाडीबीटी पोर्टल वर अपलोड करावे लागतील. तसेच तुम्हाला ते तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे जमा करावे लागतील.
या कागदपत्रांची तपासणी केली जाईल, त्यानंतर पूर्वसंमती दिली जाईल. त्यानंतर तुम्ही लागवड केल्यानंतर अधिकाऱ्यांमार्फत स्थळ पाहणी केली जाईल अन् त्यांनतर हे अनुदान तुमच्या खात्यात जमा होईल.
आता आपण ड्रॅगन फ्रुट बद्दल सर्व माहिती जाणून घेऊयात, जसे की, लागवड / सिंचन पद्धती / फवारणी / रोपे खरेदी कुठे कराल ? फायदे / बाजारभाव याबद्दल त्यामुळे हा संपूर्ण लेख वाचा.
ड्रॅगन फ्रुट बद्दल तुम्हाला माहितीच असलं ते तुम्ही खाल्लेही असणं. हे फळ आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानलं जातं. पांढऱ्या पेशी वाढवण्याची हे फळ तर अमृत मानलं जातं. एखाद्या व्यक्तीला डेंग्यू, व पांढया पेशी कमी झाल्या तर त्याला ड्रॅगन फ्रुट खाण्याचा सल्ला दिला जातो. परंतु हे फळं पाहिलं आपल्याकडं पिकवल जातं नव्हतं. याची लागवड सर्वात अगोदर दक्षिण अमेरिकेत केली गेली होती. अमेरिकेनंतर देशा- देशात ड्रॅगन फ्रुट ची यशस्वी लागवड करण्यात आली.
ड्रॅगन फ्रूटला हिंदीमध्ये कमलम आणि पिटाया फळ म्हणून देखील ओळखलं जातं. हे फळ कमळाच्या फुलासारखं दिसतं म्हणून गुजरात सरकारने या फळाचं नाव बदलून कमलम ठेवलं आहे.
आता इंडियन ड्रॅगन फ्रूट कमलम नावानं ओळखले जाते. या फळाची लागवड करून शेतकरी बांधव शेती करून चांगला नफा मिळवू शकतात. याच्या लागवडीची खास गोष्ट म्हणजे कमी पाण्यात ही लागवड करता येते. तसेच ड्रॅगन फ्रूटच्या झाडांमध्ये रोगव कीड लागत नाही. आतापर्यंत ड्रॅगन फ्रूटच्या लागवडीदरम्यान कोणतेही आजार व रोग झाल्याचं आढळून आलेलं नाही…
ड्रॅगन फ्रूटची एकदा लागवड करा अन् तब्बल 25 वर्षां पर्यंत नफा कमवा…
एवढेच नाही तर या फळाच्या पिकामध्ये केवळ एका गुंतवणुकीनंतर पारंपरिक शेतीच्या तुलनेत सुमारे 25 वर्षे उत्पन्न मिळू शकतं. त्यामुळे ड्रॅगन फ्रूटची लागवड शेतकऱ्यांसाठी खूपच फायदेशीर ठरते.
आपण ड्रॅगन फ्रूटच्या प्रकाराबद्दल जाणून घेऊ…
ड्रॅगन फ्रूट हा कॅक्टस वेलचा एक प्रकार आहे. ड्रॅगन फळाचे शास्त्रीय नाव हायलोसेरस अंडस (Hylocerus Andesus) आहे. भारतात ते कमलम नावानं ओळखलं जातं. त्याची फळे ही कोवळी व रसदार असतात. ड्रॅगन फ्रूट हे दोन प्रकारचे असतात. एक फ्रुटमध्ये पांढरा गर आणि दुसऱ्यामध्ये लाल गर असतो त्याची फुले अतिशय सुवासिक असतात, जी फक्त रात्रीच उमलतात आणि सकाळी गळून पडतात. एका झाडाला किमान 10 ते 12 फळे येतात…
ड्रॅगन फ्रूटची लागवड कुठे होते :-
सध्या भारतात गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक,केरळ,तामिळनाडू, ओडिशा, पश्चिम बंगाल,आंध्र प्रदेश आणि अंदमान निकोबार बेटांमध्ये ड्रॅगन फळाची लागवड केली जाते. काही काळापासून उत्तर प्रदेशात त्याची लागवड केली जात आहे. येथील अनेक शेतकरी शेती करून चांगला पैसा कमावत आहेत.
ड्रॅगन फ्रूटचे उपयोग आणि कमालीचे फायदे :-
ड्रॅगन फ्रूटचा वापर सॅलड, मुरंबा, जेली आणि शेक बनवण्यासाठी केला जातो. हे फळ आरोग्याच्या दृष्टीनेही खूप फायदेशीर मानलं जातं. त्याच्या वापराने अनेक आजारांवर उपचार करता येतात. विशेष म्हणजे हे फळ कोणताही रोग मुळापासून नाहीसा करू शकत नाही, परंतु त्याची लक्षणे कमी करून आराम नक्कीच देऊ शकतात. याच्या सेवनाने रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते, त्यामुळे मधुमेहाचा धोका कमी होतो. याचे सेवन हृदयरोग्यांसाठी फायदेशीर असल्याचे सांगितले जाते.
याशिवाय कर्करोगाच्या आजारातही याचे सेवन आरामदायी असल्याचे सांगितले जाते. हे शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित करते, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.हे फळ पचनसंस्था निरोगी ठेवण्यासही उपयुक्त आहे.सांधेदुखीच्या रुग्णांसाठीही याचे सेवन फायदेशीर मानले जाते. याशिवाय रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे म्हणून याचे सेवन केले जाऊ शकते. एवढेच नाही तर त्याचा वापर केस आणि त्वचेसाठीही फायदेशीर असल्याचे सांगितले जाते.
ड्रॅगन फ्रूटच्या लागवडीसाठी सावलीचं वातावरण आवश्यक :-
कडक ऊन किंवा सूर्यप्रकाश त्याच्या लागवडीसाठी चांगला मानला जात नाही. ज्या भागात तापमान कमी असतं, म्हणजेच उष्णता कमी असते अशा ठिकाणी हे सहज पिकवता येतं. ज्या भागात उष्णतेचे प्रमाण जास्त असते, त्या भागातच सावलीच्या ठिकाणी लागवड करता येते. त्याच्या लागवडीसाठी दरवर्षी सरासरी 50 सेमी या दराने पावसाची आवश्यकता असते.
ड्रॅगन फ्रूटच्या लागवडीसाठी आवश्यक तापमान अन् माती कशी असावी ?
ड्रॅगन फ्रूटच्या लागवडीसाठी 20 ते 30 अंश सेल्सिअस तापमान योग्य मानलं जाते. वालुकामय चिकणमाती ते साध्या चिकणमा मातीतसह विविध प्रकारच्या जमिनीत याची लागवड करता येते. परंतु उत्तम जीवाश्म आणि निचरा असलेली वालुकामय जमीन त्याच्या पिकासाठी सर्वात योग्य आहे. 5.5 ते 7 पर्यंत मातीचे pH मूल्य ड्रॅगन लागवडीसाठी चांगलं मानलं जातं.
ड्रॅगन फ्रूटच्या लागवडीसाठी वावर कसं तयार कराल ?
ड्रॅगन फ्रूटसाठी शेत तयार करताना लक्षात ठेवा की, शेतात तण अजिबात नसावे. यासाठी शेताची ट्रॅक्टर व कल्टीवेटर यांनी योग्य नांगरणी करावी. यानंतर जमिन सपाट करण्यासाठी पाट लावावा. नांगरणीनंतर कोणतेही सेंद्रिय कंपोस्ट जमिनीत विहित प्रमाणानुसार टाकावे…
ड्रॅगन फ्रूट फार्मिंगमध्ये पेरणीची पद्धत, जाणून घ्या…
ड्रॅगन फ्रूट फार्मिंगमध्ये पेरणीची सर्वात सामान्य पद्धत म्हणजे झाड कापून त्याचे रोपटे बनवणे व ते जमिनीत रोवणे. परंतु ते बियाण्याद्वारे देखील पेरलं जाऊ शकतं, परंतु बियाणे उगवण्यास बराच वेळ घेत असल्याने आणि मूळ झाडाची गुणवत्ता देखील त्या रोपामध्ये येण्याची शक्यता कमी असते. म्हणून त्याला व्यावसायिक लागवडीसाठी योग्य मानलं जात नाही. दर्जेदार रोपांच्या छाटणीतून ड्रॅगन फ्रूटचे नमुने तयार करावेत. या अंतर्गत सुमारे 20 सेमी लांबीचा नमुना शेतात लागवडीसाठी वापरावा. त्यांची लागवड करण्यापूर्वी, मूळ झाडाची छाटणी करून ढीग करावे…
ड्रॅगन फ्रुटच्या रोपांची लागवड कशी कराल ?
ड्रॅगन फ्रूटची रोपे 1:1:2 या प्रमाणात माती, वाळू आणि शेण मिसळून कोरड्या शेणाने लावावीत. रोपांची लागवड करण्यापूर्वी त्यांना सावलीत ठेवावे जेणेकरून सूर्याच्या तीव्र प्रकाशामुळे या रोपांना नुकसान होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. दोन रोपे लावण्याच्या ठिकाणी किमान 2 मीटर मोकळी जागा सोडली पाहिजे. रोप लावण्यासाठी 60 सेमी खोल, 60 सेमी रुंद खड्डा खणला पाहिजे.
या खड्ड्यांमध्ये झाडे लावल्यानंतर मातीबरोबरच कंपोस्ट खत आणि 100 ग्रॅम सुपर फॉस्फेटही टाकावे. अशा प्रकारे एक एकर शेतात जास्तीत जास्त 1700 ड्रॅगन फ्रूट रोपे लावावीत. ही झाडे जलद वाढण्यास मदत करण्यासाठी, त्यांना आधार देण्यासाठी लाकडी फळी किंवा काँक्रीटचा वापर केला जाऊ शकतो.
ड्रॅगन फ्रूट फार्मिंगसाठी खाते आणि फवारणी…
ड्रॅगन फ्रूट रोपांच्या चांगल्या वाढीसाठी जीवाश्म घटक आवश्यक आहेत. प्रत्येक झाडाच्या चांगल्या वाढीसाठी 10 ते 15 किलो सेंद्रिय कंपोस्ट / सेंद्रिय खत द्यावे. यानंतर दरवर्षी सेंद्रिय खताचे प्रमाण दोन किलोने वाढवावे. याशिवाय पिकाच्या योग्य विकासासाठी रासायनिक खतांचाही वापर केला जातो. वनस्पतिजन्य अवस्थेत रासायनिक खताचे प्रमाण पोटॅश: सुपर फॉस्फेट : युरिया = 40 : 90 : 70 ग्रॅम प्रति झाड असं दिलं जातं. जेव्हा झाडांना फळे येण्याची वेळ येते तेव्हा कमी प्रमाणात नायट्रोजन आणि मोठ्या प्रमाणात पालाश द्यावे जेणेकरून चांगले उत्पादन घेता येईल.
फुलोऱ्यापासून फळधारणेपर्यंत म्हणजेच फुलोरा येण्यापूर्वी (एप्रिल), फळधारणेची वेळ (जुलै-ऑगस्ट) आणि फळ तोडणी (डिसेंबर) रासायनिक खते ज्यामध्ये युरिया : सुपर फॉस्फेट : पोटॅश = 50 ग्रॅम : 50 ग्रॅम : 100 ग्रॅम या प्रमाणात प्रत्येक झाडाला द्यावे. दरवर्षी 220 ग्रॅम रासायनिक खत वाढवावे जे 1.5 किलोपर्यंत वाढवता येते…
ड्रॅगन फळ लागवडीमध्ये सिंचन कसं ठेवाल ?
ड्रॅगन फ्रूट प्लांटला जास्त पाणी लागत नाही. लागवडीनंतर रोपांना हलके पाणी द्यावे. त्यानंतर आवश्यकतेनुसार सिंचन करता येतं. पण सिंचन हलके असावे आणि शेतात पाण्याचा निचरा होण्याची चांगली व्यवस्था असावी जेणेकरून शेतात पाणी तुंबणार नाही. सिंचनासाठी, तुषार सिंचन किंवा ठिबक सिंचनाचा वापर केला जाऊ शकतो.
ड्रॅगन फ्रिटला कीटक आणि रोग लागतात का ?
ड्रॅगन फ्रूटच्या लागवडीचे वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या झाडांना रोग व कीड होत नाही. आजपर्यंत त्याच्या झाडांवर कोणत्याही प्रकारची कीड किंवा रोग आढळून आलेला नाही. अशा प्रकारे, त्याच्या लागवडीमध्ये कीटकनाशकांचा वापर नगण्य आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांचा कीटकनाशकांवर होणारा खर्च वाचतो…
ड्रॅगन फ्रूट उत्पादन : ड्रॅगन फ्रूट लागवडीमध्ये फळांची लागवड
ड्रॅगन फ्रूट झाडांना वर्षभरात फळे येऊ लागतात. झाडांना मे ते जून महिन्यात फुले येतात आणि ऑगस्ट ते डिसेंबरमध्ये फळे येतात. ड्रॅगन फुल आल्याच्या 1 महिन्यानंतर फळांची काढणी केली जाऊ शकते. डिसेंबर महिन्यात झाडांना फळे येतात. या काळात झाडावरून किमान सहा फळे तोडता येतात. फळ पिकलेले आहे की नाही हे फळाच्या रंगावरून सहज समजू शकतं. कच्च्या फळांचा रंग गडद हिरवा असतो, तर पिकल्यावर त्याचा रंग लाल होतो. रंग बदलल्यानंतर तीन ते चार दिवसांच्या आत फळे काढण्याचा सल्ला दिला जातो पण जर फळे निर्यात करायची असतील तर रंग बदलल्यानंतर एका दिवसाच्या आत काढावीत…
ड्रॅगन फ्रूटचा बाजारभाव जाणून घेऊया…
ड्रॅगन फ्रूटच्या फळाचे वजन 300 ते 400 ग्रॅम पर्यंत असतं. बाजारात ड्रॅगन पीस फळाचा दर 80 ते 100 रुपयांपर्यंत आहे. हे फळ एका खांबावर 10 किलो ते 12 किलोपर्यंत येते…
जात / varieties |
बाजारभाव
|
सफेद ड्रॅगन फ्रूट (White Dragon Fruit) | 100 – 200 |
लाल ड्रॅगन फ्रूट (Red Dragon Fruit) | 150-300 |
पीला ड्रॅगन फ्रूट (Yellow Dragon Fruit) | 400-800 |
ड्रॅगन फ्रूटची रोपे कुठून खरेदी कराल ?
गुजरातमध्ये त्याची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. ड्रॅगन फ्रूटच्या लागवडीसाठी शेतकरी बांधव गुजरातमधून हे रोप घेऊ शकतात. गुजरातमध्ये एका रोपाची किंमत 70 रुपये आहे. याशिवाय शेतकरी बांधवांना अमेझॉन सारख्या ऑनलाइन साइटवरूनही ड्रॅगन फ्रूटची रोपे मिळू शकतात. एक एकर शेतात लागवडीसाठी जास्तीत जास्त 1700 ड्रॅगन फ्रूट रोपे लागतात.
जर तुम्हाला लागवडीसाठी रोपे किंवा अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही www.exportersindia.com Ankush farmer या डिलरशी संपर्क साधू शकता …
खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा..
[…] […]