शेतीशिवार टीम : 14 सप्टेंबर 2022 :- शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी त्यांना शेतीसोबतच पशुसंवर्धन, कुक्कुटपालन आणि मत्स्यपालन या व्यवसायांशी जोडलं जात आहे. दरम्यान, पशुपालन आणि कुक्कुटपालन हा अनेक शतकांपासून ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग आहे, परंतु भारतातील मत्स्यपालन केवळ नद्या, तलाव आणि समुद्रापुरतेच मर्यादित राहिलं. पण आता आधुनिकतेच्या युगात प्रवेश करत शासनाच्या योजनेंमार्फत शेतकऱ्यांनी मत्स्यपालन व्यवसायही सुरु केला आहे.
कृत्रिम तलाव बनवून मासे संवर्धन करणे असो किंवा कमी खर्चात हॅचरी उभारून जलचरांचे संगोपन करणे असो. आज या भागात शेतकरी, ग्रामस्थ आणि आदिवासींनी विशेष यश मिळवलं आहे. या कामात माशांच्या काही खास जाती (Top Fish Varieties) देखील शेतकऱ्यांना भरघोस नफा मिळवून देत आहेत.
अशा उत्कृष्ट जातींमध्ये अलीकडेच चितळ मत्स्यपालनाची (Chital Fish Farming) डिमांड वाढली आहे. ही एक दुर्मिळ प्रजाती आहे, परंतु आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तिला मोठी मागणी आहे. शेतकरी आणि मत्स्यपालकांची इच्छा असल्यास ते चितळ मासळीचे संगोपन करून चांगले पैसे कमवू शकतात…
चितळ मत्स्यपालन तुम्ही कसे कराल ?
चितळ माशांना दुर्मिळ प्रजातीचा मासा देखील म्हणतात, जो फक्त अमेरिका, बांगलादेश आणि भारतातील ब्रह्मपुत्रा नदीत आढळतो. तलाव आणि हॅचरीमध्ये त्याला वाढवणं आणखी सोपं आहे, कारण त्या माशाचे ताज्या पाण्यात चांगले संगोपन होतं. हा मासा मुख्यतः तलाव आणि नद्यांच्या तळाशी किंवा जमिनीशी जोडलेला असतो आणि तेथील कोळंबी, गोगलगाय खातो. या माशात भरपूर पोषक तत्वे असतात, त्यामुळे जगभरात त्याची डिमांड वाढली आहे.
शासनाच्या अनुदानातून स्वतः बनना तलाव :-
चितळ माशांच्या संगोपनासाठी सामान्य हंगाम सर्वात योग्य असतो. भारतात एप्रिल ते मे महिन्यात चितळ मत्स्य तलाव तयार केला जातो.
शेतकर्यांना हवे असल्यास ते एक एकर शेतजमिनीत तलाव खोदून चितळ मासे देखील वाढवू शकतात.
चितळ मत्स्य तलाव तयार करताना गाईचे किंवा म्हशीचे शेण, 400 किलो कोंबडी खत आणि 50 किलो चुनाही टाकावा.
साहजिकच चितळ मासे तलावाच्या तळाशी राहतात, त्यामुळे तलावात 3 फुटांपेक्षा कमी आणि 4 फुटांपर्यंत पाणी पुरेसे राहते.
मत्स्यपालनासाठी शासनाकडून प्रशिक्षण आणि अनुदान हवे असेल तर https://fisheries.maharashtra.gov.in/ या व्हेबसाईला अवश्य भेट द्या…
या पद्धतीने करा चितळ माशाचे पालन :-
चितळ मासे जगण्यासाठी कोळंबी आणि गोगलगाय यांसारखे प्राणी खातात. हा एक मांसाहारी मासा आहे, त्यामुळे तलावात मासे टाकण्यापूर्वी 3 ते 5 हजार तिलापिया मत्स्यबीज टाकण्याचा सल्ला दिला जातो, जेणेकरून ते चितळ माशांचे खाद्यही बनवता येईल. याशिवाय मत्स्य तज्ज्ञांचा वेळोवेळी सल्ला घेऊन त्याची काळजी घेऊ शकता, त्यामुळे दर्जेदार उत्पादन मिळण्यास मदत होते.
चितळ माशापासून किती मिळेल उत्पन्न :-
चितळ मत्स्यपालनाची योग्य काळजी घेतली तर त्याचे वजन 2.5 किलोपर्यंत जाते, त्यामुळे एका तलावातून 1000 ते 2000 किलो चितळ मासे तयार होऊ शकतात. देशभरासह अमिरिकेत चितळ माशाला चांगली मागणी आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात चितळ मासे विकले जातात. त्यामुळे ते चांगल्या दरात विकले जाते. भारतात त्याची किंमत 250 रुपये ते 400 रुपये प्रति किलो आहे. त्याचबरोबर हा मासा विदेशात 900 ते 2000 या दराने विकला जातो, ज्यामुळे निश्चितच शेतकऱ्यांच्या / मच्छीमारांच्या उत्पन्नाचे साधन बनू शकतं….
चितळ मत्स्यबीज (Chital Fish Seed) खरेदी करण्यासाठी तुम्ही https://www.indiamart.com/proddetail/chital-fish-seed-22478955955.html लिंकवर क्लिक करू शकता…