शेतीशिवार टीम, 5 जानेवारी 2022 : मधुमेह ही जगभरात झपाट्याने वाढणाऱ्या गंभीर आरोग्य समस्यांपैकी एक आहे. आरोग्य तज्ञ याला अतिशय धोकादायक आजारांच्या श्रेणीत ठेवतात कारण त्यामुळे इतर अनेक रोगांचा धोका वाढत असतो.
सामान्यत: जीवनशैली आणि आहारातील विचित्र खाणंपिणं हे मधुमेहाचे मुख्य कारण मानले गेले आहे, याशिवाय ज्या लोकांना हा आजार त्यांच्या कुटुंबात आधीपासून आहे त्यांनाही हा आजार होण्याची शक्यता जास्त असते.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, त्याची लक्षणे वारंवार लघवी होणे, जास्त तहान लागणे, वजन कमी होणे, हात-पाय बधिर होणे किंवा मुंग्या येणे आणि खूप थकवा जाणवणे यांचा समावेश असू शकतो. दरम्यान, संशोधकांनी मधुमेहाच्या काही लक्षणांबद्दल देखील सांगितले आहे जे हात आणि बोटांवर दिसतात, त्याला ”डायबेटिक न्यूरोपॅथी” म्हणतात. तज्ञांच्या मते, सर्व लोकांनी या लक्षणांची विशेष काळजी घेतली पाहिजे.
डायबिटिक न्यूरोपॅथी म्हणजे काय ?
आरोग्य तज्ञांच्या मते, ‘डायबेटिक न्यूरोपॅथी’ हा मज्जातंतूंच्या नुकसानाचा एक प्रकार आहे ज्याचा सहसा पाय आणि बोटांवर परिणाम होतो. मेयो क्लिनिकच्या अहवालानुसार, सुमारे 50 % मधुमेहींमध्ये हे दिसून येते . डायबेटिक न्यूरोपॅथीच्या गंभीर लक्षणांना ”मोनोयुरोपॅथी” म्हणतात. मोनोयुरोपॅथीमुळे हातांना मुंग्या येणे आणि बधीरपणा येतो. याशिवाय हाताच्या बोटांवरही याचा परिणाम होतो.
मोनोयुरोपॅथीची लक्षणे जाणून घ्या :-
आरोग्य तज्ञांचे म्हणणे आहे की, हात बधिर किंव्हा मुंग्या येण्याव्यतिरिक्त, या स्थितीत इतर अनेक लक्षणे देखील दिसतात ज्यांची लोकांना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
चला तर मग जाणून घेऊया:-
1) हातापायांमध्ये अशक्तपणा.
2) चेहरा जरासा तिरका होणे.
3) डोळ्याच्या मागे वेदना.
4) दुहेरी दृष्टी.
5) एखादी गोष्ट फोकस करण्याची समस्या.
मधुमेहाची लक्षणे जाणून घ्या :-
इंग्लंडमधील नॅशनल हेल्थ सर्व्हिसच्या तज्ज्ञांच्या मते, मधुमेह असलेल्या सर्व व्यक्तींनी अत्यंत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. ज्या लोकांना आधीच याचा हाय रिस्की धोका आहे त्यांनी मधुमेहाच्या सर्व लक्षणांबद्दल सावध असले पाहिजे.
वजन कमी होणे, भूक वाढणे आणि तहान लागणे, जखमा लवकर बऱ्या न होणे, अंधुक दिसणे, गुप्तांगाभोवती (प्रायव्हेट ठिकाणी) खाज येणे, जास्त थकवा येणे किंवा निम्या रात्री वारंवार लघवी होणे यांसारख्या समस्या जाणवत असाल तर याबद्दल तुमच्या डॉक्टरांशी बोला. सल्ला घ्या.