Upsc Interview 10 Questions : असा कोणतं पाळीव प्राणी आहे, ज्या प्राण्याच्या दुधाचं कधीच दही होतं नाही ?
शेतीशिवार टीम, 6 जानेवारी 2022 : UPSC परीक्षा ही देशातील सर्वात कठीण परीक्षा आहे. जे उत्तीर्ण होण्यासाठी खूप मेहनत करावी लागते.आणि जो या परीक्षेत उत्तीर्ण होतो तो देशाचा (IAS) अधिकारी होतो. या परीक्षेचे एकूण तीन टप्पे आहेत. ज्यामध्ये लेखी बरोबर इंटरव्हिव्ह हि घेतला जातो. प्रत्येकजण लेखी परीक्षा पास तर होतो पण इंटरव्हिव्ह मध्ये अडकतात.
खरं तर असे अनेक प्रश्न या UPSC इंटरव्यू दरम्यान विचारले जातात. ज्याची उत्तरे प्रत्येकाच्या डोक्यात बसत नाहीत. हे प्रश्न खूप गुंतागुंतीचे आणि गुंफलेले असतात. भल्याभल्यांचं मन हेलावतं. तर आज आम्ही या पोस्टमध्ये तुमच्यासाठी असेच काही प्रश्न घेऊन आलो आहोत जे तुम्हाला इंटरव्हिव्ह मध्ये खूप मदत करू शकतात.
प्रश्न – वातावरणात ऑक्सिजनची लेव्हल जर दुप्पट झाली तर काय होईल ?
उत्तर – जर आपल्या वातावरणातील ऑक्सिजनचे प्रमाण दुप्पट झालं तर लहान कीटक, कोळी, झुरळे इत्यादींचा आकार खूप मोठा होईल. जंगलात जर आग लागली तर ती आग अधिक विनाशकारी होण्याची शक्यता वाढेल.
प्रश्न – ताजमहालचे बांधकाम कधी सुरू झालं अन् कधी संपलं ?
उत्तर – ताजमहालचे बांधकाम 1632 मध्ये सुरू झालं आणि 1653 मध्ये पूर्ण झालं. ही इमारत बांधण्यासाठी तब्बल 22 वर्षांचा कालावधी लागला.
प्रश्न – कोणत्या जीवनसत्वाला सौंदर्याचा जीवनसत्व म्हणतात ?
उत्तर – व्हिटॅमिन ईला (Vitamin E)
प्रश्न – डिप्लोमॅसी, फॉरेन पालिसी आणि स्ट्रॅटेजी मध्ये काय आहे फरक?
उत्तर – डिप्लोमॅसी ही एक मोठी संज्ञा आहे. हे आवश्यक नाही की, तुम्ही ते फक्त फॉरेन रिलेशनमध्येच वापराल. डिप्लोमॅसीचा वापर स्थानिक पातळीवरही होऊ शकतो. कोणालाही सांगण्यासाठी देखील वापरलं जाऊ शकतं. फॉरेन रिलेशनबद्दल असलेल्या मोठ्या पॉलिसीचा तो एक भाग. आपण आपल्या देशातून इतर देशांप्रती पॉलिसी बनवतो. याला फॉरेन रिलेशन म्हणतात. या पॉलिसीला कसं कसे पुढे घेऊन जायचं या संदर्भात जे योजना करतात. ती स्ट्रॅटेजी आहे.
प्रश्न – संस्कृतीकरण म्हणजे काय ?
उत्तर – जेव्हा समाजाच्या आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या भागात जन्मलेले लोकं काही वेगळ्या चालीरीतींचा अवलंब करतात जेणेकरून स्थानिक पातळीवर त्यांची परिस्थितीत सुधारणा होईल, यालाच संस्कृतीकरण म्हटलं जातं.
प्रश्न – एखादा पुरुष आपल्या विधवा पत्नीच्या बहिणीशी कायदेशीर विवाह करू शकतो का ?
उत्तर – कसा करू शकतो, कारण, तो जर जिवंत असता, तर त्याची पत्नी विधवा झाली असती का ?
प्रश्न – बैल हा कोणत्या देशाचा राष्ट्रीय प्राणी आहे?
उत्तर – स्पेन
प्रश्न – शरीराचा असा कोणता भाग आहे, जो भीतीमुळे कमजोर होतो ?
उत्तर – किडनी
प्रश्न – असा कोणतं पाळीव प्राणी आहे, ज्या प्राण्याच्या दुधाचं कधीच दही होतं नाही ?
उत्तर – उंट
प्रश्न – असा कोणता जीव आहे, तो डोळे बंद करूनही पाहू शकतो ?
उत्तर – स्किंक (Skink) सापसुरूळी