शेतीशिवार टीम, 6 जानेवारी 2022 : पेनी स्टॉकमध्ये गुंतवणुकीचा धोका तर असतोच परंतु मोठा नफा देण्याच्या बाबतीत त्या शेयर्सनां तोडही नाही.रिटर्न्सच्या बाबतीत आदित्य व्हिजन (Aditya Vision) ही अशीच एक कंपनी आहे. आदित्य व्हिजनने अवघ्या 2 वर्षात गुंतवणूकदारांना मालामाल केलं आहे.
आदित्य व्हिजनच्या (Aditya Vision) शेअर्सने 2 वर्षांत इनवेस्टर्सला सुमारे 3200 % रिटर्न्स दिले आहे. चला तर मग जाणून घेऊया की, ज्या गुंतवणूकदारांनी 2 वर्षांपूर्वी कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली होती, सध्या त्याची किंमत किती आहे.
1 लाखांचे झाले 33 लाख रुपये :-
26 डिसेंबर 2019 रोजी आदित्य व्हिजन (Aditya Vision) चे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) वर 19.20 रुपयांच्या लेव्हलवर होते. 4 जानेवारी 2022 रोजी कंपनीचे शेअर्स 635.80 रुपयांवर स्टॉप झाले. कंपनीच्या शेअर्सने 2 वर्षात गुंतवणूकदारांना सुमारे 3200 % रिटर्न्स दिले आहे.
जर एखाद्या व्यक्तीने 2 वर्षांपूर्वी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर सध्या त्याचे मूल्य 33 लाख रुपयांपेक्षा जास्त झाले असते. म्हणजेच गुंतवणूकदारांना थेट 32 लाख रुपयांचा फायदा झाला असता…
एका वर्षात 1 लाखांचे झाले 16 लाख:-
जर एखाद्या गुंतवणूकदाराने एका वर्षापूर्वी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असतील तर ती रक्कम आजच्या तारखेनुसार 16.60 लाख रुपये झाली असती. आदित्य व्हिजनचे (Aditya Vision) शेअर्स 2021 च्या मल्टीबॅगर स्टॉकपैकी एक आहे.
मात्र, गेल्या काही महिन्यांपासून आदित्य व्हिजनच्या शेअर्समध्ये मोठी विक्री झाली आहे. जुलै 2021 मध्ये कंपनीचे शेअर्स 1,564.10 रुपयांच्या पातळीवर पोहोचले होते. गेल्या एका महिन्यात कंपनीचे शेअर्स सुमारे 18 टक्क्यांनी घसरले आहेत.