शेतीशिवार टीम, 6 जानेवारी 2022 : टाटा ग्रुपची कंपनी Tata Teleservices Maharashtra Limited गेल्या एक वर्षापासून आपल्या गुंतवणूकदारांना श्रीमंत बनवत आहे, परंतु 10 सत्रांपासून या शेयर्सने मोठी उडी घेतली आहे. Tataचा हा शेअर सलग 11व्या दिवशीही वरच्या सर्किटमध्ये आहे. आज सकाळीच (4.98%) वाढ झाली असून दिवसभरात ट्रेडिंगमध्ये राहू शकतो.

आज टीटीएमएलचा शेअर 4.99 टक्क्यांनी वाढून 250.70 रुपयांवर पोहोचला आहे. 23 डिसेंबर रोजी तो 154.10 रुपयांवर बंद झाला. त्याच वेळी, 2 डिसेंबर रोजी शेअर 124.05 रुपयांवर बंद झाला. मागील वर्षी 2 जुलै रोजी हा स्टॉक 49.10 रुपयांवर होता आणि आता 250.70 रुपयांवर पोहोचला आहे. म्हणजेच अवघ्या 6 महिन्यांत या शेयर्सने आपल्या गुंतवणूकदारांना सुमारे 486% रिटर्न्स दिले आहे.

गुंतवणूकदारांना देत आहे मल्टीबॅगर रिटर्न्स :-

टाटा टेलिसर्व्हिसेसच्या स्टॉकच्या 1 आणि 5 वर्षांच्या कामगिरीवर नजर टाकल्यास, गुंतवणूकदारांसाठी तो मल्टीबॅगर असल्याचे सिद्ध झालं आहे. गेल्या वर्षभरात या कंपनीच्या शेअरमध्ये सुमारे 3022% वाढ झाली आहे. एका वर्षात हा शेयर्स 7.90 रुपयांवरून 250.70 रुपयांवर गेला आहे. म्हणजेच, एखाद्या गुंतवणूकदाराने वर्षभरापूर्वी त्यात एक लाख रुपये गुंतवले असते, तर त्याचे एक लाख आता सुमारे 31 लाख रुपयांपेक्षा जास्त झाले असते.

TTML कंपनीचा काय आहे बिझिनेस ?

TTML ही Tata Teleservices ची उपकंपनी आहे. ही कंपनी तिच्या सेगमेंटमध्ये मार्केट लीडर आहे. कंपनी व्हॉईस, डेटा सेवा पुरवते. कंपनीच्या ग्राहकांच्या यादीत अनेक मोठी नावे आहेत. बाजारातील जाणकारांच्या मते, गेल्या महिन्यात कंपनीने कंपन्यांसाठी स्मार्ट इंटरनेट आधारित सेवा सुरू केली आहे. कंपन्यांना जलद इंटरनेट आणि ऑप्टिमाइझ्ड नियंत्रणासह क्लाउड आधारित सुरक्षा सेवा मिळत असल्याने याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.

क्लाउड आधारित सुरक्षा हे त्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे, जे डेटा सुरक्षित ठेवेल. जे व्यवसाय डिजिटल तत्त्वावर चालत आहेत, त्यांना ही लीज लाइन खूप मदत करेल. यामध्ये सर्व प्रकारच्या सायबर फसवणुकीपासून सुरक्षितता अंतर्भूत करण्यात आली असून, त्यासोबतच वेगवान इंटरनेट सुविधाही देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *