शेतीशिवार टीम, 6 जानेवारी 2022 : Omicron व्हेरियंटमुळे भारतात कोरोना रुग्णांचा मोठा स्फोट झाला आहे अन् देशात तिसरी लाट धडकली असल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे. गेल्या 24 तासांत देशात कोरोना संसर्गाचे 90 हजारांहून अधिक नवीन रुग्ण आढळले आहेत. हा आकडा मागील दिवसाच्या तुलनेत 56 टक्क्यांहून अधिक आहे.
यादरम्यान Omicron व्हेरियंटचा आकडा 2600 च्या पुढे गेला आहे. अँक्टिव्ह रुग्णांमद्येही मोठी वाढ झाली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, देशात कोरोनाचे 90 हजार 928 रुग्ण आढळले आहेत.
सध्या देशात कोरोनाचे 2 लाख 85 हजार अँक्टिव्ह रुग्ण आहेत. रिकव्हरी रेटही मागील दिवसाच्या तुलनेत 97.81 टक्क्यांवर आला आहे. Omicron व्हेरियंट च्या एकूण रुग्णांची संख्या आता 2630 झाली आहे. मात्र, यापैकी 995 रुग्ण बरे झाले आहेत.
गेल्या 24 तासांत कोरोनाचे केवळ 19 हजार 206 रुग्ण बरे झाले आहेत. दैनंदिन इन्फेक्शन रेट 6.43 टक्क्यांवर पोहोचला आहे. एकूण रुग्णांपैकी अँक्टिव्ह रुग्ण 0.81% झाली आहेत. आतापर्यंत देशात यापैकी 4.82 लाख नागरिकांचा मृत्यू झाला असून कोरोनातून बरे झालेल्यांची संख्या 3 कोटी 43 लाख 41 हजारांवर गेली आहे.
India reports 90,928 fresh COVID cases, 19,206 recoveries, and 325 deaths in the last 24 hours
Daily positivity rate: 6.43%
Active cases: 2,85,401
Total recoveries: 3,43,41,009
Death toll: 4,82,876Total vaccination: 148.67 crore doses pic.twitter.com/DGPBwfzQcG
— ANI (@ANI) January 6, 2022
कोरोनाच्या या वाढत्या रुग्णसंख्येमुळे उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या 5 ज्यांच्या विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत परंतु या निवडणूक होण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
आज या निवडणुकांवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण हे आज निवडणूक आयोगासमोर निवडणुका होणाऱ्या राज्यांतील स्थितीचा आढावा सादर करणार आहेत. त्यामुळे निवडणूक पुढे ढकलण्याची शक्यता वाढली आहे.