शेतीशिवार टीम, 6 जानेवारी 2022 : PM Kisan Latest Update 6th Jan : PM नरेंद्र मोदी यांनी 1 जानेवारीलाच पंतप्रधान किसान सन्मान निधीचा (Prime Minister Kisan Sanman Nidhi) डिसेंबर-मार्चचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवला आहे.
डिसेंबर-मार्चसाठी 2000-2000 हप्ते देशातील 10,47,33,864 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचले आहेत. तुम्हाला अजून मेसेज मिळाला नसेल, तर काळजी करू नका. प्रथम स्टेटस तपासा, अन् थोडा वेळ प्रतीक्षा करा ! आज सकाळी पीएम किसान पोर्टलवर (PM Kisan Portal) स्टेटस तपासण्यासंदर्भात मॅसेज येत आहे.
स्टेटस तपासण्यासाठी या स्टेप्स करा फॉलो…
सर्वप्रथम पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in/ वर जा.
येथे तुम्हाला उजव्या बाजूला ‘Farmers Corner’चा ऑप्शन दिसेल.
येथे ‘Beneficiary Status’ या ऑप्शनवर क्लिक करा. येथे एक नवीन पेज उघडेल.
आता जे पेज उघडेल तिथे असं लिहिलेलं आलं असेल..
जर ही समस्या काही काळानंतर ठीक झाली असेल तर तुम्ही पुढील स्टेप्स अशा करा फॉलो..
नवीन पेजवर,आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक किंवा मोबाइल क्रमांक यापैकी कोणताही एक ऑप्शन निवडा.
या तीन क्रमांकांद्वारे तुम्ही तुमच्या खात्यात पैसे आले आहेत की नाही हे तपासू शकता.
तुम्ही निवडलेल्या ऑप्शनची संख्या एंटर करा. त्यानंतर ‘Get Data’ वर क्लिक करा.
येथे क्लिक केल्यानंतर, तुम्हाला आत्तापर्यंतच्या सर्व ट्रॅन्जेक्शनची माहिती मिळेल.
याप्रमाणे मंत्रालयाशी संपर्क साधा :-
पीएम किसान टोल फ्री क्रमांक : 18001155266
पीएम किसान हेल्पलाइन क्रमांक : 155261
पीएम किसान लँडलाइन क्रमांक : 011-23381092, 23382401
पीएम किसानची नवीन हेल्पलाइन : 011-24300606
पीएम किसानची आणखी एक हेल्पलाइन आहे : 0120-6025109
ई-मेल आयडी: pmkisan-ict@gov.in