Take a fresh look at your lifestyle.

पुणे-बंगळूर ग्रीनफिल्ड महामार्ग : पुणे, सांगली, सातारच्या शेतकऱ्यांना भूसंपादनातून मिळणार ‘इतका’ मोबदला ; पहा गावांची नावे अन् रोड मॅप

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) भारतमाला प्रकल्पांतर्गत ग्रीनफिल्ड महामार्गासाठीच्या बांधकामाचा प्रस्ताव मंजूर केला असून भूसंपादनाची प्रक्रिया सुरू केली आहे. हा ग्रीनफिल्ड एक्स्प्रेस वे सध्याच्या राष्ट्रीय महामार्ग 48 (जुना NH 4) चा एक जलद पर्याय असणार आहे. आणि त्यामुळे वाहतूक आणि गर्दी कमी होईल अशी अपेक्षा आहे. 120 किमी / तास या वेगाला सपोर्ट करणारा, नवीन पुणे बंगळुरू ग्रीनफिल्ड महामार्ग हा आठ लेनचा प्रवेश नियंत्रित एक्सप्रेस – वे असणार आहे.

यामुळे पुणे ते बंगळुरू हे अंतर 95 किलोमीटरने कमी होणार आहे. यामुळे पुणे आणि बंगळुरू दरम्यानचा प्रवास सध्याच्या 11 ते 12 तासांच्या तुलनेत 7 ते 8 तासांपर्यंत कमी होणार आहे. विमानाची धावपट्टी (Airplane runway) असलेला हा राज्यातील पहिला राष्ट्रीय महामार्ग ठरणार आहे.

पुणे बंगलोर एक्सप्रेस-वे हा आठ पदरी डांबरी ग्रीनफिल्ड महामार्ग वारवे बुद्रुक येथून सुरू होईल. महाराष्ट्रातील हा पुणे जिल्ह्यातून सातारा आणि सांगली जिल्ह्यांतील दुष्काळी भागातून – सातारा जिल्ह्यातील खंडाळा, फलटण आणि खटाव आणि सांगली जिल्ह्यातील खानापूर, तासगाव आणि कवठेमहांकाळ मिरज तालुक्यातून जाईल. कर्नाटकात, पुणे बंगलोर द्रुतगती मार्ग बेलगावी, बागलकोट, गदग, कोप्पल, बल्लारी, दावणगेरे, चित्रदुर्ग, तुमकूर या मार्गे जाईल आणि नंतर बंगळुरूला जोडला जाणार आहे.

याबाबत सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी याबाबतची नोटीस नुकतीच जारी केली आहे. त्यानुसार खानापूर आणि मिरजेच्या उपविभागीय अधिकार्‍यांची या कामी भूसंपादन अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून भूसंपादन प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.

4 तालुक्यातील 38 गावांमध्ये भूसंपादनाची प्रक्रिया सुरु झाली असून या महामार्गाबाबत अफवांचे पेव फुटले आहे. अशी चर्चा रंगू लागली आहे की, या भूसंपादन प्रक्रियेतून शेतकऱ्यांना मोबदला न देताच भूसंपादन होणार आहे ? या महामार्ग बाधित असलेले शेतकरी या अफवेमुळे अस्वस्थ झाले असून यामधील बऱ्याच शेतकऱ्यांनी जमीन विकण्याचा निर्णय घेतला आहे, काहींनी तर जमिनी विकल्याचा घटनाही घडल्या आहे.

या पार्श्वभूमीवर सांगली मतदारसंघाचे खासदार संजय काका पाटील यांनी अधिग्रहण बाधित शेतकऱ्यांना एक दिलासा देणारं विधान केलं आहे. त्यांनी सांगितलं की, या महामार्गासाठी अधिग्रहित केल्या जाणाऱ्या जमिनीच्या मोबदल्यात शेतकऱ्यांना रेडीरेकनरच्या चार पट मोबदला दिला जाणार असून महामार्गालगत अशी नोंद असणाऱ्या जमिनीला दुप्पट मोबदला मिळणार असल्याचीही त्यांनी माहिती दिली.

मार्कासाठी अधिग्रहित केल्या जाणाऱ्या शेत जमिनीच्या मोबदल्यात अधिग्रहण कायद्याअंतर्गत मोबदला दिला जाणार असून अशा अफवांवर विश्वास न ठेवण्याचा सल्लाही त्यांनी बाधित शेतकऱ्यांना दिला आहे. त्यामुळे आता सांगली जिल्ह्यात हा महामार्ग 74 किलोमीटर लांबीचा राहणार असून जिल्ह्यातील 38 गावांतील शेतकऱ्यांना नक्कीच याचा फायदा होणार आहे.

पहा, सांगली जिल्ह्यातील गावे आणि अंतर :-

मिरज :- 120.570Km ते 150.100 Km :- माहुली, वलखड, वेजेगाव भेंडवडे, साळशिंगे, जोंधळखिंडी, माधळमुठी, वासुंबे, रेणावी, रेवणगाव, घोटी बुद्रुक आणि घोटी खुर्द . या रस्त्याच्या भूसंपादानासाठी उपविभागीय अधिकारी विटा, उपविभाग खानापूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

तासगाव :- 150.100 Km ते 176.740 Km :- कचरेवाडी, नरसेवाडी, किंदरवाडी, विजयनगर, पेड, मोराळे, मांजर्डे, शिरगाव, हातनोली, बस्तवडे, सावळज, वज्रचौंडे, मणेराजुरी आणि गव्हाण. या रस्त्याच्या भूसंपादानासाठी उपविभागीय अधिकारी मिरज, उपविभाग मिरज यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

कवठे महांकाळ :- 176.740 Km ते 196.035 Km :- बोरगाव, मळणगाव, हारोली, देशिंग, बनेवाडी, शिंदेवाडी, कुकटोळी, रामपूरवाडी आणि कोगनोळी. या रस्त्याच्या भूसंपादानासाठी उपविभागीय अधिकारी मिरज, उपविभाग मिरज यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मिरज :- 196.035 Km ते 201.200 Km :- सलगरे, बेळंकी आणि संतोषवाडी. या रस्त्याच्या भूसंपादानासाठी उपविभागीय अधिकारी मिरज, उपविभाग मिरज यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पुणे :-  बंगळूर ग्रीनफिल्ड महामार्गाबाबत सांगली जिल्ह्याप्रमाणे पुणे, सातारा जिल्ह्यातही लवकरच भूसंपादन सुरु होणार असून याबाबत Road Map Alignment म्हणजेच हा महामार्ग या तिन्ही जिल्ह्यांतून कसा जाणार त्याचा संपूर्ण नकाशा ही उपलब्ध झाली आहे. तसेच आपण तसेच शेतकऱ्यांची नावे गट नंबर / सर्व्हे नंबर, बाबत माहिती येत्या काळात जाणून घेणार आहोत…

त्यामुळे तुम्हाला संपूर्ण Road Map Alignment पाहायची असेल तर आमच्या व्हॉट्स अँप ग्रुपला जॉईन व्हा त्या ग्रुप वर तुम्हाला Alignment मिळेल

लिंक :- https://chat.whatsapp.com/GMVgJ3y1WAN9DJ95cbHK9N