देशातली सर्वात मोठी कंपनी मारुती सुझुकीला (Maruti Suzuki) आता छोट्या गाड्यांसहित आता SUV सेगमेंटमध्येही मजबूत झाली आहे.याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे 26 सप्टेंबर रोजी लॉन्च करण्यात आलेली ग्रँड विटारा (Grand Vitara).
या SUV ची डिमांड सातत्याने वाढत आहे. रिपोर्टनुसार, ग्रँड विटाराला (Grand Vitara) आतापर्यंत 60 हजारांहून अधिक बुकिंग मिळालं आहे आणि ही प्रक्रिया सातत्याने वाढत आहे. दिवसेंदिवस वाढत असलेल्या बुकिंगमुळे, आता त्याच्या डिलिव्हरीसाठी दीर्घ प्रतीक्षा करावी लागणार आहे, काही डीलरशिप्सने तर 4 महिन्यांचा व्हेटिंग पिरियड दिला आहे.
न्यू ग्रँड विटाराची थेट स्पर्धा ह्युंदाई क्रेटाशी असल्याचं मानलं जाते आणि बुकिंग वाढत असल्याने आता क्रेटालाही मागे टाकण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मारुतीने गेल्या महिन्यात ग्रँड विटाराच्या सुमारे 4,800 युनिट्सची विक्री केली आहे. मारुती ग्रँड विटाराची शोरूम किंमत 10.45 लाख ते 19.65 लाख रुपये आहे.
28kmpl मायलेज :-
इंजिनबद्दल बोलायचं झालं तर, न्यू ग्रँड विटारा (Grand Vitara) 1.5-लीटर TNGA पेट्रोल इंजिनद्वारे समर्थित आहे जे 91bhp पॉवर आणि 122Nm टॉर्क जनरेट करतं. तसेच, यात इंटेलिजेंट इलेक्ट्रिक हायब्रिड नावाची मजबूत-हायब्रिड मोटर आहे, जी 114bhp पॉवर आणि 141Nm टॉर्क जनरेट करते. हे 5-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर अँटोमॅटिक युनिटशी जोडलेलं आहे.
तसेच, ऑलग्रिप AWD सिस्टीम मॅन्युअल व्हर्जनसह ऑफर केली जात आहे. यामध्ये ECVT युनिट जोडण्यात आलं आहे, जे 27.97 KMPL मायलेज देते. या मायलेजसह, ती त्या सेगमेंटमध्ये सर्वाधिक मायलेज देणारी SUV बनली आहे.
स्ट्रॉंग हायब्रिड e-CVT – 27.97kmpl मायलेज
माईल्ड हायब्रिड 5-स्पीड MT – 21.11kmpl मायलेज
माईल्ड हायब्रिड 6-स्पीड AT – 20.58kmpl मायलेज
माईल्ड हायब्रिड 5-स्पीड MT ऑल ग्रिप – 19.38kmpl मायलेज
जबरदस्त सेफ्टी फीचर्स :-
ग्रँड विटारामध्ये (Grand Vitara) सेफ्टीचीही काळजी घेण्यात आली आहे. यामध्ये 6 एअरबॅग्ज, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टीम, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्रॅम, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम, हिल डिसेंट कंट्रोल, 360 डिग्री कॅमेरा, हिल होल्ड असिस्ट, रिअर आणि -पॉइंट ईएलआर सीट बेल्टचा समावेश आहे. याशिवाय वाहनाच्या सर्व टायरमध्ये किती हवा आहे याचीही माहिती उपलब्ध असून ही माहिती तुम्ही कारच्या स्क्रीनवर पाहू शकता.