7th Pay Commission Latest Update : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. महागाई भत्त्यात (DA) 4 टक्क्यांची वाढ झाल्यानंतर आता केंद्र सरकारने परिवर्तनीय महागाई भत्त्यातही (Variable dearness allowance) वाढ झाली आहे.
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी हे दिवाळी गिफ्ट सरकारने एक नोटिफिकेशनद्वारे जारी केलं आहे. सप्टेंबरच्या पगारात केंद्रीय कर्मचाऱ्यांना वाढीव महागाई भत्ता आणि डीए थकबाकी (DA) 4 टक्क्यांनी वाढली आहे. तसेच, आता केंद्र सरकारने इतर कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या महागाई भत्त्यातही वाढ केली आहे. कामगार मंत्रालयाने ही घोषणा केली आहे. त्याचा लाभ 1 ऑक्टोबर 2022 पासून लागू होणार आहे.
कृषी कर्मचाऱ्यांच्या व्हेरिएबल महागाई भत्त्यात झाली वाढ :-
केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालय, (Ministry of Labour & Employment) भारत सरकार ने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी (Agriculture) परिवर्तनीय
(Variable) महागाई भत्त्यात वाढ जाहीर केली आहे. आता या केंद्रीय कर्मचाऱ्यांना दरमहा व्हेरिएबल डिअरनेस अलाऊन्स (Variable DA) मिळेल. व्हेरिएबलमधील ही वाढ 1 ऑक्टोबर 2022 पासून लागू होणार आहे. या वाढीमुळे कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनात वाढ होणार आहे.
नोटिफिकेशन केलं जारी…
कामगार मंत्रालयाच्या मुख्य कामगार आयुक्तांनी यासंदर्भात नोटिफिकेशन जारी केलं आहे. यामध्ये परिवर्तनीय महागाई भत्त्यात (Variable dearness allowance) वाढ करण्याची घोषणा करण्यात आली आहे. अधिसूचनेत असं लिहिलं आहे की, केंद्र सरकारच्या 19 जानेवारी 2017 च्या अधिसूचनेची दखल घेऊन, कामगार मंत्रालयाने परिवर्तनीय महागाई भत्त्यात वाढ केली आहे. इंडस्ट्रियल व्हर्कर्सच्या अव्हरेज कंज्यूमर प्राइस इंडेक्सने झेप घेतली आहे. 30 जून 2022 पर्यंत इंडेक्स 357.65 वरून 365.76 अंकांवर (आधारभूत वर्ष 2016-100) वाढला आहे. त्यात 8.11 अंकांची वाढ झाली आहे. त्यामुळे 1 ऑक्टोबरपासून सुधारित चल महागाई भत्ता (Revised Variable Dearness Allowance) दिला जाणार आहे.
कोणत्या कॅटेगरीमध्ये किती वाढला व्हेरिएबल महंगाई भत्ता ?
Category of worker | Rates of V. D.A. Area wise per day (in Rupees) | ||
‘A’ | ‘B’ | ‘C’ | |
Unskilled | 121 | 111 | 109 |
Semi- Skilled/ Unskilled Supervisory | 131 | 121 | 112 |
Skilled/ Clerical | 144 | 131 | 121 |
Highly Skilled | 158 | 147 | 131 |
व्हेरिएबल महंगाई भत्ता वाढवल्यानंतर, बेसिक रेट्स आणि VDA मिळून 1 ऑक्टोबर 2022 पासून कृषी कामगारांना चांगले पैसे मिळतील. खाली दिलेल्या तक्त्यानुसार कॅटेगरी VDA देण्यात येईल…
Category of worker | Rates of V. D.A. Area wise per day (in Rupees) | ||
‘A’ | ‘B’ | ‘C’ | |
Unskilled | 333+121=454 | 303+111=414 | 300+109=409 |
Semi-Skilled/ Unskilled Supervisory | 364+131=495 | 335+121=456 | 307+112=419 |
Skilled/ Clerical | 395+144=539 | 364+131=495 | 334+121=455 |
Highly Skilled | 438+158=596 | 407+147=554 | 364+131=495 |
किमान वेतन सल्लागार मंडळाच्या निर्णयानंतर, VDA पुढील उच्च रुपयावर (next higher rupee) कॅल्कुलेट केला जाईल.