Take a fresh look at your lifestyle.

350cc सेगमेंटमधील या ब्रँडची भारतभर धूम ! फक्त 30 दिवसांत विकल्या 82 हजार युनिट्स, किंमतही स्वस्त, फीचर्स तर पहा…

0

परफॉर्मन्स सेगमेंटमध्ये एकमेव सगळ्यात मोठं नाव हे रॉयल एनफिल्ड (Royal Enfield) चं आहे. आता कंपनीने पुन्हा एकदा 350cc सेगमेंटमध्ये आपला दबदबा व्यक्त केला आहे. यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे नुकतीच लॉन्च केलेली कंपनीची सर्वात स्वस्त बाइक हंटर 350 (Hunter 350). या बाईकने बाजारात येताच बजेट खरेदीदारांना चांगली संधी दिली आहे आणि सेल्स चार्ट मध्येही टॉपमध्ये दिसत आहे.

नवीन महिन्याच्या सुरुवातीसह, रॉयल एनफिल्डने (Royal Enfield) गेल्या महिन्याचा सेल्स चार्ट सादर केला आहे, त्यानुसार कंपनीने या महिनाभरात एकूण 82,097 वाहनांची विक्री केली आहे आणि यामध्ये सर्वाधिक 350cc बाईकचा समावेश आहे. या सेगमेंटमधील कंपनीच्या वाहनांमध्ये हंटर, मेटिअर, क्लासिक आणि बुलेटचा समावेश आहे.

जर आपण सेल्स चार्टच्या आकडेवारीवर नजर टाकली तर, रॉयल एनफिल्डने सप्टेंबर महिन्यात एकूण 82,097 वाहनांची विक्री केली आहे, आणि यामध्ये एक्सपोर्ट वाहनांचा समावेश आहे. कंपनीने या कालावधीत एकूण 8,451 युनिट्सची निर्यात केली आहे. एकट्या सप्टेंबर महिन्यात350cc सेगमेंटमध्ये एकूण 74,206 वाहनांची विक्री झाली आहे, याशिवाय 350 cc पेक्षा जास्त वाहनांच्या 7,891 युनिट्सची विक्री झाली आहे. कंपनीने देशांतर्गत बाजारात एकूण 73,646 वाहनांची विक्री केली आहे.

Hunter 350 ने केलं सर्वाना आश्चर्य चकित…

कंपनीने काही 7 ऑगस्टला हंटर 350 मॉडेल लॉन्च केलं होतं.ही बाईक एकूण तीन व्हेरियंटमध्ये लॉन्च करण्यात आली आहे, ज्यामध्ये एंट्री-लेव्हल मॉडेल हंटर 350 रेट्रोची किंमत 1,49,900 रुपये, मेट्रोची किंमत 1,63,900 रुपये आणि टॉप-स्पेक मेट्रो रिबेलची किंमत आहे. 1,68,900. न्यू Hunter 350 कंपनीने त्याच्या अत्याधुनिक J-प्लॅटफॉर्मवर तयार केलं आहे, त्यात दिलेले इंजिन या आधी रॉयल एनफिल्डने Meteor 350 मध्ये वापरलं होतं.

हेच इंजिन नंतर न्यू -जनरल Classic 350 मोटरसायकलवर देखील देण्यात आलं. हंटरमध्ये दिलेलं इंजिन 20.4 PS पॉवर आणि 27 Nm पीक टॉर्क जनरेट करतं. हे इंजिन 5-स्पीड ट्रान्समिशनसह येतं.

Hunter 350 मध्ये ट्रिपर टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन सिस्टीम, ड्युअल-चॅनल ABS आणि डिजिटल-एनालॉग मीटर कन्सोल सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. तरुणांच्या गरजा लक्षात घेऊन कंपनीने हंटरचे डिझाईन केलं आहे. सीटची उंची 790mm आहे तर ग्राउंड क्लीयरन्स 150.5mm पर्यंत विस्तृत आहे. हंटर 350 चा व्हीलबेस 1370mm आहे, तर 181 किलोग्रॅमच्या बाईकला ट्विन-पिस्टन फ्लोटिंग कॅलिपरसह फ्रंटला 300mm डिस्क ब्रेक आणि बॅक साईडला 270mm डिस्क ब्रेक आहे.

बुलेट 350 चे नेक्स्ट जनरेशनही होणार लवकरच लॉन्च…

आता बुलेट 350 (Bullet 350) अपडेट करण्याची तयारी सुरू आहे. सध्याचे मॉडेल कंपनीच्या व्हीलसी लाइन-अपमधील सर्वात स्वस्त बाइक आहे. अशी अपेक्षा आहे की, बुलेट 350 च्या नेक्स्ट जनरेशनच्या मॉडेलमध्ये काही चांगले बदल दिसून येतील.

नुकतीच ही बाईक टेस्टिंग दरम्यान स्पॉट झाली आहे. टेस्टिंग मॉडेल पाहता, ही नवीन बाईक J-Series प्लॅटफॉर्म बेस्ड असणार आहे, ज्यावर नवीन Classic, Meteor आणि Hunter तयार करण्यात आले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.