Take a fresh look at your lifestyle.

करमाळ्याच्या ‘या’ जातीच्या पेरूची महाराष्ट्रभर चर्चा ; फक्त 2 एकरातून कमावला 23 लाखांचा नफा ; वाचा ही भन्नाट यशोगाथा….

शेतीशिवार टीम : 19 सप्टेंबर 2022 :- पारंपारिक भात शेतीला फाटा देत आधुनिक शेतीची कास धरत शेतीमध्ये विविध प्रयोग करणारे सोलापूर जिल्ह्यातील शेटफळ (ता.करमाळा) येथील गावचे प्रगतशील शेतकरी दत्तात्रय लबडे यांचा प्रवास हा तरुणांना प्रेरणादायी ठरणारा आहे.

दत्तात्रय रामदास लबडे यांनी चार वर्षांपूर्वी आपल्या शेतामध्ये मध्यप्रदेशातील नर्सरीमधून रोपे आणून 2 एकर व्ही.एन.आर (VNR) जातीच्या पेरूची लागवड केली आहे. मार्केटचा अंदाज घेण्यासाठी पहिल्या वर्षी थोड्या प्रमाणात लागवड केली होती, मात्र त्यानंतर त्यांना दुसऱ्या वर्षी उत्पादन वाढवले परिणामी उत्पादकतेत वाढ झाली.

परंतु, मागील दोन वर्षात कोरोनामुळे उत्पादन चांगले मिळूनही अपेक्षित दर मिळू शकला नाही. त्यामुळे पेरू लागवडीचा आपला निर्णय चुकला र नाही ना ? असा प्रश त्याच्या पुढे पडला होता.

अखेर त्यांना या पेरू लागवडीतून कमालीचं यश मिळालं आहे. या पेरूला केरळमधील बाजारपेठेत 85 रूपये किलोचा दर मिळत असून यावर्षी त्यांना 2 एकर पेरू पिकापासून 17 लाख रूपयांपेक्षा जादा उत्पन्न अपेक्षित आहे.

आतापर्यंत त्यांनी दोन पिके घेतली आहेत. सध्या त्यांनी तिसऱ्यांदा आपल्या बागेतील पेरूची काढणी सुरू केली असून दोन एकरामध्ये 20 टन पेरूची विक्री करत आतापर्यंत सरासरी 70 रूपयाचा दर मिळवत 14 लाख रूपयांचे उत्पन्न मिळविले आहे.

आणखी 10 टनापर्यंत उत्पादन निघणार असल्याचा त्यांचा अंदाज असून सध्या त्यांच्या पेरूला केरळ येथील बाजारपेठेत चांगली मागणी असल्याने ते एका व्यापाऱ्याच्या मध्यस्थीने पेरू केरळ येथील बाजारपेठेत पाठवत आहेत. केरळला सध्या प्रतिकिलो 85 रुपये प्रमाणे दर मिळत आहे. यावर्षी त्यांना 2 एकर पेरू पिकापासून 23 लाखापेक्षा जादा रुपयांचे उत्पन्न मिळण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.

सचोटीने यश माझ्या 2 एकर क्षेत्रामध्ये मी पेरूचे पीक घेतले आहे. मागील दोन वर्षात कोरोनामुळे उत्पादन चांगले मिळूनही माझ्यासह अनेक शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळू शकला नाही. यामुळे वेगळे पीक घेण्यात आपण चुकली तर नाही ना, अशी मात्र, यावर्षी दरही चांगला मिळत असल्याने यत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे.

दत्तात्रेय लबडे , पेरू उत्पादक शेतकरी , शेटफळ

तुम्हालाही VNR पेरूच्या जातीची लागवड करायची असेल तर https://www.indiamart.com/proddetail/vnr-guava-plants-14254158088.html या लिंकवरून रेप खरेदी करू शकता…