Take a fresh look at your lifestyle.

अतिवृष्टी नुकसान भरपाई 2021 : नवा GR आला ; शासनाकडून अतिरिक्त 125.7 कोटी निधीला मंजुरी

0

शेतीशिवार टीम, 8 मार्च 2022 : अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. जुलै 2021 मध्ये अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत वितरित करण्यासाठी काल 7 मार्च 2022 रोजी शासन निर्णय घेऊन राज्यातील 22 जिल्ह्यांसाठी 125.7 कोटी एवढा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे.

शासन निर्णयाच्या माध्यमातून कोणत्या जिल्ह्याला मदत केली जाणार आहे कोणत्या शेतकऱ्याला मिळणार मदत मिळेल ? या सर्वांबद्दल माहिती आपण शेतीशिवार च्या माध्यमातून जाणून घेणार आहोत…

या आधी 6 ऑक्टोबर 2021 रोजी एक शासन निर्णय घेतला होता. या निर्णयाच्या माध्यमातून जुलै 2021 मध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत करण्याकरता 365.67 कोटी रुपये एवढा निधी वितरित करण्यात आला होता. 

परंतु 21 ऑक्टोबर 2021 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून एक शासन निर्णय घेऊन जिरायती क्षेत्रासाठी 10 हजार रुपये / बागायती क्षेत्रासाठी 15 हजार रुपये / आणि फळबागासाठी 25 हजार रुपये मदत या ठिकाणी वितरित करण्याचा निर्णय घेतला होता.

याच अनुषंगाने जुलै 2021 मध्ये बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदतीचे वाटप करण्यासाठी हा अतिरिक्त 125.7 कोटी निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. ते जिल्हे खालीलप्रमाणे…

कोकण विभाग 
ठाणे
पालघर
रायगड
रत्नागिरी
सिंधुदुर्ग
या जिल्ह्यांसाठी 4 कोटी 10 लाख रुपये.

नाशिक विभागासाठी 38 लाख रुपये

पुणे विभाग
पुणे
सातारा
सांगली
कोल्हापूर
या 4 जिल्ह्यांसाठी मिळून 24.34 कोटी रुपये.

अमरावती विभाग
बुलढाणा
अकोला
वाशिम
अमरावती
यवतमाळ
या 5 जिल्ह्यांमध्ये 55.26 कोटी रुपये.

औरंगाबाद विभाग
जालना
उस्मानाबाद
नांदेड
परभणी
या 5 सर्व जिल्ह्यांसाठी मिळून 36. 39 कोटी रुपये

नागपूर विभाग
चंद्रपूर
गडचिरोली
या 3 जिल्ह्यांसाठी 4.96 कोटी रुपये. असा सर्व राज्यातील 22 जिल्ह्यांसाठी मिळून 125 57 कोटी एवढा निधी वितरित केला जाणार आहे.

जुलै 2021 मध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या बाधित शेतकऱ्यांना ज्यांना पहिल्या हप्त्याचे वितरण झालेलं आहे अशा शेतकऱ्यांना य दुसऱ्या हप्त्याचे वितरण या निधीच्या माध्यमातून होणार आहे

ज्याच्या मध्ये अतिरिक्त 6 हजार 800 रुपये प्रतिहेक्‍टर ज्या शेतकऱ्यांना मदतीचे वाटप झाले आहे, अशा शेतकऱ्यांना उर्वरित 3 हजार 200 रुपयांचा फरक प्रती हेक्टर वाटप केलं जाईल.

हा मदतीचा निधी वाटप झाल्यानंतर ज्या लाभार्थ्यांनी मदत वाटप केलेली आहे त्या लाभार्थ्याची यादी मदतीचा तपशील हा जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात यावा अशा प्रकारची सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली आहे.

अशा प्रकारचा महत्वपूर्ण शासन निर्णय तुम्हाला पाहायचा असेल तर तुम्ही या maharashtra.gov.in लिंकवर क्लिक करून पाहू शकता.

Leave A Reply

Your email address will not be published.