बळीराजाला मोठा दिलासा । मराठवाड्यासह ‘या’ जिल्ह्यांना 3456 कोटींचा निधी वितरीत ; हेक्टरी 36,000 रु. मदत उद्या होणार खात्यात जमा !
शेतीशिवार टीम : 11 सप्टेंबर 2022 : सन 2022 मध्ये राज्यामध्ये अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदतीचे वितरण करण्याकरता 08 सप्टेंबर 2022 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून 3456 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. यांसंदर्भातील एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय 8 सप्टेंबर 2022 रोजी घेण्यात आलेला आहे.
जून ते ऑगस्ट,2022 या कालावधीत राज्यात झालेल्र्या अतिवृष्टीमुळे पूर परिस्थितीमुळे शेतीपिकांच्या नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याकरता राज्य आपत्ती प्रतिसाद निधी व राज्य शासनाच्या माध्यमातून निधीमधून जुलैमध्ये झालेल्या अतिवृष्टीने मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांसह बळीराजाला नुकसान भरपाई म्हणून राज्य सरकारने 3456 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास मंजुरी दिली आहे.
ही रक्कम सोमवारपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास प्रारंभ होणार आहे. याबाबतचा अध्यादेश गुरुवारी (दि .8 ) सायंकाळी जारी करण्यात आला. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
किती मिळणार मदत…
जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी :- मदतीचे दर रू. 13600 / – प्रति हेक्टर , 3 हेक्टरच्या मर्यादेत
बागायत पिकांच्या नुकसानीसाठी :- मदतीचे दर रु. 27,000 /- प्रति हेक्टर , 3 हेक्टरच्या मर्यादित
बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी :- मदतीचे दर रू. 36,000/- प्रति हेक्टर, 3 हेक्टरच्या मर्यादेत
कोणाला मिळणार लाभ, निवडीचे काय आहेत निकष :-
1) निधी खर्च करताना सर्व शासन निर्णयातील सुचनांचे व निकषांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे.
2) शासन निर्णयान्वये मदतीचे वाढीव दर मंजूर करण्यात आले आहेत. त्या वाढीव दरापैकी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या (SDRF) शासन निर्णयातील दराने मदत प्रदान करण्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या लेखाशीर्षाखाली वितरित करण्यात आलेला निधी खर्च करण्यात यावा आणि वाढीव मंजूर दर वजा राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे दर यातील फरकाच्या मदतीच्या खर्चाची रक्कम राज्य शासनाच्या निधीमधुन वितरित करण्यात आलेल्या निधीतून भागविण्यात यावा .
3) ज्या प्रयोजनासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे, त्याच प्रयोजनासाठी सदर निधी खर्च करण्यात यावा.
4) ही मदत देताना केंद्र शासनाने चक्रीवादळ, पूर इत्यादी नैसर्गिक आपत्तीकरिता विहित केलेल्या अटी व शर्तीची पूर्तता होत असल्याची खात्री सर्व संबंधितांनी करावी. तसेच राज्य शासनाने घोषित केलेल्या अतिवृष्टी या नैसर्गिक आपत्तीकरिता अतिवृष्टीच्या निकषानुसार मंडळामध्ये 24 तासात 65 मि.मी. पेक्षा जास्त नोंद झालेली असल्यास आणि त्यामुळे मंडळातील गावामध्ये 33 टक्केपेक्षा जास्त शेतीपिकांचे नुकसान झालेले असल्यास ही मदत अनुज्ञेय राहील.
5) ही मदत देताना ब्दिरुक्ती होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी.
6) त्याप्रमाणे, शेतजमिनीतील गाळ, डोंगराळ शेतजमिनीवरील मातीचा ढिगारा (मलबा) काढणे, मत्स्य शेती दुरुस्ती करणे / मातीचा थर काढणे / पुवर्वत करणे आणि दरड कोसळणे, जमिन खरडणे, खचणे व नदी पात्र / प्रवाह बदलल्यामुळे शेतजमीन वाहून जाणे यामुळे शेतजमीन व इतर नुकसानीसाठी दिली जाणारी मदत केवळ 2 हेक्टर मर्यादेपर्यंत जमीन धारण करणाऱ्या शेतकऱ्यांनाच अनुज्ञेय असून या लाभार्थ्यांनी इतर कोणत्याही शासकीय योजनेखाली मदत अथवा अर्थसहाय्य / अनुदान घेतलेले नसावे.
जिल्हानिहाय कोणत्या जिल्ह्याला किती निधी मिळाला पहा ‘हा’ शासन निर्णय
शासन निर्णय पाहण्यासाठी :- इथे क्लिक करा