Maruti च्या Swift, WagonR नाही तर ‘या’ Car ला लोकांची पसंती ; महिन्यात 18,398 युनिट्सची विक्री, 6 एयरबॅग्स अन् 360 व्ह्यू कॅमेरा…
शेतीशिवार टीम : 10 सप्टेंबर 2022 : ऑगस्ट (August 2022) महिन्यात सर्वाधिक विक्री होणाऱ्या टॉप 10 कारची लिस्ट जाहीर करण्यात आली आहे. या 10 गाड्यांमुळे ऑटो सेक्टर सुस्थितीत आहे, याचा पुरावा ही लिस्ट आहे. यावेळीही या 10 सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या कारमध्ये मारुती सुझुकीच्या (Maruti Suzuki) गाड्या सर्वात जास्त आहेत. या वर्षी जुलैमध्ये (जुलै 2022), WagonR, Baleno आणि Swift ने टॉप 5 मध्ये आपले स्थान बनवलं होतं.
ज्यात WagonR ने पहिला नंबर पटकवला होता, परंतु यावेळी आणखी एका कारने WagonR ला मागं टूल पहिला नंबर पटकवला आहे. तुम्हीही या फेस्टिव्हलमध्ये स्वत:साठी नवीन कार घेण्याचा विचार करत असाल, तर ही लिस्ट नक्की पहा…
मारुती वॅगनआर (Maruti WagonR) :-
मारुती वॅगनआर (Maruti WagonR) ही भारतीय कुटुंबाची आवडती कार आहे, कंपनीने गेल्या महिन्यात 18,398 युनिट्सची विक्री केली आहे. तर गेल्या वर्षभरात हा आकडा महिनाभरात 9,628 मोटारींच्या विक्रीचा होता. त्यामुळे यावेळी ती पहिल्या क्रमांकावरून घसरून दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक विक्री होणारी कार बनली आहे. या कारची एक्स-शोरूम किंमत 5.44 लाख रुपयांपासून सुरू होते.
मारुती स्विफ्ट (Maruti Swift) :-
स्विफ्ट या वर्षी जुलैमध्ये तिसरी सर्वाधिक विक्री होणारी कार बनली होती, परंतु गेल्या महिन्यात ती 10 व्या क्रमांकावर घसरली आहे. जुलै महिन्यात या कारच्या 17,539 युनिट्सची विक्री झाली होती, परंतु ऑगस्ट 2022 मध्ये म्हणजे गेल्या महिन्यात एकूण 11,275 युनिट्सची विक्री झाली, जी गेल्या वर्षी या महिन्यात 12,483 युनिट्स होती.
सर्वाधिक विकली जाणाऱ्या कारमध्ये मारुती बलेनो (Maruti Baleno) बनली नंबर 1 :-
या वर्षी जुलैमध्ये, मारुती सुझुकीने नवीन बलेनोच्या 17,960 युनिट्सची विक्री करून तिसरं स्थान पटकावलं होतं, तर या वेळी ऑगस्टमध्ये तिने 18,418 युनिट्सची विक्री करून पहिले स्थान मिळवलं आहे. ही देशातील सर्वाधिक विकली जाणारी कार बनली आहे. तर गेल्या वर्षभरात जर या महिन्यात या कारच्या एकूण 15,646 युनिट्सची विक्री झाली.
Maruti Baleno ची किंमत आणि फीचर्स :-
पॉवरट्रेनबद्दल बोलायचे झाले तर या कारमध्ये 1.2-लिटर क्षमतेचे 4 सिलेंडर असलेले ‘K12N’ पेट्रोल इंजिन दिलं आहे. जे इंटिग्रेटेड स्टार्टर जनरेटर (ISG) टेक्नोलॉजीने सुसज्ज आहे, ज्यामुळे कारला ऑटो इंजिन स्टॉप / स्टार्ट फीचर मिळालं आहे. यामुळे कारचे मायलेजही वाढण्यास मदत होते.
या इंजिनमध्ये CVT ऐवजी 5 स्पीड मॅन्युअल आणि AMT गिअरबॉक्स देण्यात आलं आहे . नवीन अपडेट्सनंतर या कारची किंमत थोडी वाढली आहे. इतर फीचर्समध्ये इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्रॅम (ESP), हिल होल्ड असिस्ट (HHA), अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS) विथ इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रिब्युशन (EBD), टॉप-एंड व्हेरियंटला 6 एअरबॅग्ज, USB-C आणि USB-A पोर्ट्स यांचा समावेश आहे. त्याची एक्स-शोरूम किंमत 6,48,948 लाख ते 11,70,948 लाखांपर्यंत जाते.