अतिवृष्टी नुकसान भरपाई । राज्य शासनाकडून 248 कोटी वितरित, जिरायतीसाठी 10,000 हजार तर बागायतीसाठी 25,000 हेक्टरी अनुदान !
शेतीशिवार टीम : 17 जुलै 2022 :- राज्यात अतिवृष्टी आणि पुराने बाधित झालेल्यांना 247 कोटी 76 लाख 52 हजार इतका निधी तसेच जिरायतीसाठी 10,000 हजार तर बागायतीसाठी 25,000 हेक्टरी अनुदान वितरित करण्याचा शासन निर्णय बंडखोर – भाजप सरकारने शनिवारी जारी केला. महाविकास आघाडीनेच हा निर्णय घेतला होता. या निर्णयानुसार जून ते ऑक्टोबर 2022 या कालावधीत अतिवृष्टी व पुरामुळे पिकांचे 33 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे.
अशा बाधित शेतकऱ्यांना जिरायत व बागायती नुकसानीसाठी प्रति हेक्टर पन्नास हजार रुपयांप्रमाणे, तर बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी प्रति हेक्टर पंचवीस हजार रुपये या दराने 2 हेक्टरच्या मर्यादेत मदत देण्यात येणार आहे. त्याकरिता 2 शासन निर्णय घेऊन निधी वितरित करण्यास घेऊन मान्यता देण्यात आली आहे. ते शासन आपण पाहूया….
राज्यात माहे डिसेंबर, 2019 जानेवारी, 2022 या कालावधीत गारपीट व अवेळी पावसामुळे शेतीपिकांचे नुकसान झाल्याचे निर्दशनास आले होते. त्यामुळे शेतीपिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषानुसार व दरानुसार बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी आवश्यक असलेल्या मदतीचा तपशील कृषी आयुक्तांमार्फत पाठवण्यात आल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर आता राज्य सरकारने या बाधित शेतकऱ्यांच्या भरपाईसाठी जिरायतीसाठी 10,000 हजार तर बागायतीसाठी 25,000 हेक्टरी अनुदान
माहे फेब्रुवारी ते मे, 2022 या कालावधीत राज्यात झालेल्या गारपीट व अवेळी पावसामुळे शेतीपिकांचे व बहुवार्षिक पिकांचे नुकसान झाल्याने बाधित शेतकऱ्यांना शासन निर्णयान्वये एकूण 247 कोटी 76 लाख 52 हजार इतका निधी सर्व विभागीय आयुक्तांमार्फत वितरीत करण्यासाठी मान्यता दिली आहे.
शेतीपिके व बहुवार्षिक पिकाच्या नुकसानीसाठी मदतीचे वाटप करताना खालील दक्षता घेण्यात यावी : –
प्रचलित नियमानुसार शेती / बहुवार्षिक फळपिकाच्या नुकसानीकरीता मदत 33% अथवा त्याहून अधिक नुकसान झालेल्यांना अनुज्ञेय राहील.
प्रचलित पध्दतीनुसार कृषी सहायक, तलाठी व ग्राम सेवक यांच्या संयुक्त स्वाक्षरीने पूर्ण करण्यात आलेल्या पंचनाम्यानुसार बाधित शेतकऱ्यांना मदतीचे वाटप जिल्हाधिकारी यांनी करावे.
बाधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मदतीची रक्कम थेट जमा करण्यात यावी.
कोणत्याही बाधित शेतकऱ्यास रोखीने किंवा निविष्ठा स्वरुपात मदत देवू नये.
मदतीची रक्कम खातेदारांच्या बँक खात्यावर थेट जमा करताना मदतीच्या रक्कमेमधून कोणत्याही बँकेने कोणत्याही प्रकारची वसुली करु नये. याकरिता सहकार विभागाने योग्य ते आदेश निर्गमित करावेत.
मदतीचे वाटप करताना मदतीची व्दिरुक्ती होणार नाही याची दक्षता घ्यावी.
कोणत्या जिल्ह्यांत होणार या निधीचे वाटप :-
अमरावती, बुलडाणा, हिंगोली, नाशिक, जळगाव,अहमदनगर, सातारा सांगली सोलापूर, कोल्हापूर या जिल्ह्यांत होणार निधीच वाटप..
किती मिळणार नुकसान भरपाई :-
शेतीपिके व बहुवार्षिक पिकांचे नुकसानीसाठी मदत :-
SDRF च्या दराने जिरायत, बागायत शेतीपिके (रू.6800 ) व बहुवार्षिक पिकांसाठी ( रू18000 / – प्रति हेक्टर )
शेतीपिकांसाठी रू 3200 / – व बहुवार्षिक पिकांसाठी रू 7000 / – प्रति हेक्टर ) मदत अनुदान देण्यासाठी..