शेतकऱ्यांना मोठा दिलासा ! नवा GR आला, पुणे-औरंगाबादसह ‘या’ 10 जिल्ह्यांसाठी तब्बल 1200 कोटी 86 लाखांचा निधी वितरित, पहा जिल्हानिहाय यादी..
राज्यात परतीच्या पावसामुळे सप्टेंबर – ऑक्टोबर महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे खूप मोठं नुकसान झालेलं होतं. या नुकसान ग्रस्त झालेल्या बाधित शेतकऱ्यांना मदत वितरित करण्याकरता आज 17 नोव्हेंबर 2012 रोजी महत्वपूर्ण शासन निर्णय घेऊन 10 जिल्ह्यातील 12 लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांसाठी 1,2,86 कोटी रुपयांच्या निधीचे वितरण करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
या शासन निर्णयाच्या माध्यमातून जिरायत क्षेत्रासाठी 6,800 रुपये प्रति हेक्टर ऐवजी आता 13,600 (3 हेक्टरच्या मर्यादेत) तर बागायत पिकांच्या नुकसानीसाठी 13,500 रुपये ऐवजी आता 27,000 रुपये (3 हेक्टरच्या मर्यादेत) तर बहुवार्षिक म्हणजे फळबागांसाठी 18,500 रुपये प्रति हेक्टर ऐवजी आता 36,000 रुपये प्रति हेक्टर (3 हेक्टरच्या मर्यादेत) नुकसान भरपाई मदत मिळणार आहे.
या निधीच्या मागणीसाठी विभागीय आयुक्त औरंगाबाद आणि विभागीय आयुक्त पुणे यांच्या माध्यमातून 19 ऑक्टोबर 2022 याचबरोबर 4 नोव्हेंबर 2022 रोजी केलेल्या मागणीच्या अनुषंगाने 12,86,74,66,000 रुपये एवढा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे.
10 जिल्ह्यांची नावे पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
अतिवृष्टी नुकसान भरपाई : 2022