राज्यात 8,820 रुपयांचे तब्बल 5 लाख भांडी संचाचे होणार वाटप ! प्रत्येक संचात ‘ही’ असणार 30 भांडी, असा करा अर्ज..
राज्यात सन 2011 च्या जनगणनेनुसार, लोकसंख्येत 15.99% झालेली वाढ विचारात घेता सध्या बांधकाम कामगारांची संख्या 18 लाख इतकी संख्या अपेक्षित आहे. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाच्या वतीने नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी विविध प्रकारच्या योजनांद्वारे सुरक्षा तसेच आरोग्य व इतर कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्याच्या उद्देशाने बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्यात आली आहे..
या योजनेअंतर्गत आता राज्यभर गृहोपयोगी भांडी संच साहित्याचे वाटप करण्यात येत आहे. जिल्ह्यात 86 हजार कामगारांना या साहित्यांचे संच वाटप करणार असल्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितले.
ही योजना महाराष्ट्रभर लागू करण्यात आली असून शासनाकडे प्रत्येकी 8,820 रुपयांचे तब्बल 5 लाख भांडी संचाचा कोठा उपलब्ध झाला आहे. यवतमाळ जिल्ह्यात 1 लाख 41 हजार नोंदणीकृत बांधकाम कामगार आहे. त्यापैकी 86 हजार कामगारांची नोंदणी जिवीत असल्याने त्यांना भांडी संचाचे वाटप केले जात आहे. उर्वरीत कामगारांनी आपल्या नोंदणीचे नुतनीकरण केल्यास अशा कामगारांसह नवीन नोंदणी केलेल्या कामगारांना देखील गृहोपयोगी साहित्य संचाचा लाभ देण्यात येणार आहे.
वर्षात 90 दिवस कामगार म्हणून काम केल्यास त्यांची कामगार म्हणून नोंदणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशा कामगारांनी त्यांच्यासाठी असलेल्या योजनांचा लाभ घेण्यासाठी नोंदणी करुन घ्यावे व योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन शासनाकडून करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी आपल्या जिल्हा – तालुका बांधकाम कल्याणकारी मंडळाला भेट द्या..
भांडी संचात नेमकं काय – काय मिळणार ?
गृहपयोगी संचातील वस्तू | नग |
ताट | 04 |
वाटया | 08 |
पाण्याचे ग्लास | 04 |
पातेले झाकणासह (12 | 01 |
पातेले झाकणासह (13 | 01 |
पातेले झाकणासह (14 | 01 |
मोठा चमचा (भात वाटपाकरीता) | 01 |
मोठा चमचा (वरण वाटपाकरीता) | 01 |
पाण्याचा जग (1.5 लीटर) | 01 |
मसाला डब्बा (7 भाग) | 01 |
डब्बा झाकणासह (14 इंच) | 01 |
डब्बा झाकणासह (16 इंच) | 01 |
डब्बा झाकणासह (18 इंच) | 01 |
परात | 01 |
प्रेशर कुकर 5 लिटर (स्टेनलेस स्टील) | 01 |
कढई (स्टील) | 01 |
स्टीलची टाकी (मोठी) झाकणासह व वगराळासह | 01 |
एकूण | 30 |
अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे
आधार कार्ड
पॅन कार्ड
रहिवाशी दाखला
90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र
कायमचा पत्ता पुरावा
ई-मेल आयडी
मोबाईल नंबर
काम करत असलेल्या बांधकामाचा पत्ता
नोंदणी अर्ज
पासपोर्ट आकारातील 3 फोटो
बँक पासबुक झेरॉक्स
जन्माचा दाखला (शाळा सोडल्याचा दाखला)
घोषणापत्र
अर्ज कसा कराल ?
या योजनेकरिता तुम्ही ऑनलाईन / ऑफलाईन अर्ज करू शकता..
ऑनलाईन अर्ज लिंक साठी :- इथे क्लिक करा
ऑफलाईन अर्ज लिंक साठी :- इथे क्लिक करा
Mahabocw Safety Kit Form Pdf :- इथे क्लिक करा
बांधकाम कामगार नोंदणी फॉर्म PDF | येथे क्लिक करा |
बांधकाम कामगार नूतनीकरण फॉर्म | येथे क्लिक करा |
ग्रामसेवक / महानगरपालिका / नगरपरिषदेतर्फे बांधकाम कामगाराने मागील वर्षभरात 90 किंवा अधिक दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र नोंदणी व नुतणीकरण करण्यासाठी संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलेले |
येथे क्लिक करा |
बांधकाम कंत्राटदाराचे /ठेकेदाराचे बांधकाम कामगाराने मागील वर्षभरात 90 किंवा अधिक दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र |
येथे क्लिक करा |
ऑनलाइन नोंदणीसाठी आधार संमती फॉर्म | येथे क्लिक करा |
ऑनलाइन नोंदणीसाठी स्वयंघोषणापत्र | येथे क्लिक करा |