शेतीशिवार टीम, 11 जानेवारी 2022 : देशभरात ज्या वेगाने कोरोनाची प्रकरणे वाढत आहेत त्यामुळे सर्वांच्याच चिंता वाढल्या आहेत. आतापर्यंत बॉलिवूडमधील अनेक स्टार्स तिसऱ्या लाटेच्या विळख्यात सापडले आहेत. आता ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांचीही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली असून, त्यांना हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

92 वर्षीय लता मंगेशकर यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांना सौम्य लक्षणे आहेत. लता मंगेशकर यांची भाची रचना हिने याला दुजोरा दिला आहे. त्यांनी चाहत्यांना दीदींसाठी प्रार्थना करण्याचे आवाहन केलं आहे.

सध्या प्रकृती आहे ठणठणीत :-

एएनआय (ANI) या वृत्तसंस्थेशी बोलताना रचना यांनी लता मंगेशकर यांच्या प्रकृतीबाबत माहिती देताना सांगितले की, ‘दीदी आता ठीक असून त्यांचं वय लक्षात घेता खबरदारी घेण्यात आली असून त्यांना आयसीयूमध्ये (ICU) ठेवण्यात आलं आहे.

2019 मध्येही केलं होतं हॉस्पिटल मध्ये दाखल :- 

यापूर्वी नोव्हेंबर 2019 मध्ये लता मंगेशकर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांना छातीत व्हायरल इन्फेक्शन झालं होतं, त्यामुळे त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. संसर्गातून ठीक झाल्यानंतर त्या घरी परतलया होत्या.

स्वर – कोकिळा नावाने प्रसिद्ध…

1929 मध्ये जन्मलेल्या लता मंगेशकर यांना भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरविण्यात आलं आहे. त्या भारतीय चित्रपटसृष्टीतील महान गायकांपैकी एक आहे. त्यांना स्वर – कोकिळा या नावाने ओळखलं जातं. लता मंगेशकर यांना पद्मभूषण, पद्मविभूषण आणि दादासाहेब फाळके पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *