Take a fresh look at your lifestyle.

सदनिका खरेदी – विक्रीसंदर्भात मुद्रांक शुल्क विभागाचा मोठा निर्णय ! मुंबई – पनवेलनंतर आता राज्यभर लागू होणार ही सुविधा..

0

सदनिका खरेदी केल्यानंतर खरेदीदाराचे नाव आता येथून पुढे करदाता म्हणून आणि ते देखील स्वयंचलित पद्धतीने लागणार आहे. त्याकरिता महापालिकेत जाऊन स्वतंत्र अर्ज करण्याची गरज नाही. प्राथमिक स्तरावर या सुविधेची अंमलबजावणी राज्यात मुंबई महापालिकेनंतर आता पनवेल महापालिकेतही लवकरच करण्यात येणार आहे.

त्यानंतर लवकरच महाराष्ट्रातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ही सुविधा लागू करण्यात येणार आहे. व्यवसायसुलभता (इज ऑफ डुइंग बिझनेस) उपक्रमांतर्गत जागतिक बँकेकडून दिल्ली आणि मुंबई ही दोन शहरे निवडण्यात आली होती. त्याअंतर्गत नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून सुविधा सुरू करण्यात आली आहे.

त्यानुसार मुंबई महापालिका क्षेत्रात ही सुविधा सन 2019 पासून सुरू आहे. त्यानंतर राज्यातील कोणत्याही महापालिकेने स्वतःहून पुढाकार घेऊन ही सुविधा सुरू केली नाही. मात्र, पनवेल महापालिकेने पुढाकार घेऊन ही सुविधा सुरू केली आहे. लवकरच ही सुविधा सुरू केली जाणार आहे.

प्रचलित पद्धतीनुसार सदनिका खरेदी केल्यानंतर खरेदीदाराला संबंधित महापालिका किंवा तत्सम नगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थकर्ड करदाता म्हणून आपले नाव लावण्यासाठी स्वतंत्र अर्ज करावा लागत होता. मात्र, जागतिक बँकेच्या सूचनेनुसार व्यवसायपूरकतेमध्ये या सर्व सुविधांचे एकत्रिकरण करण्यात आल आहे.

याबाबत बोलताना नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचे उपमहानिरीक्षक (संगणक) अभिषेक देशमुख म्हणाले, ‘पनवेल महापालिकेने पुढाकार घेऊन ही सुविधा सुरू करण्याची विनंती केली होती. त्यानुसार दस्त झाल्यानंतर महापालिकेकडील आणि दस्तातील माहिती 100 टक्के जुळल्यानंतर तातडीने नव्या खरेदीदाराचे नाव करदाता म्हणून लागेल. अन्यथा महापालिकेकडून खरेदीदाराशी संपर्क केला जाईल.

मालमता खरेदीबाबत नोंदणी झाल्यानंतर त्यांचे ऑटो म्युटेशन होणे आवश्यक आहे. एखाद्या मालमत्तेची खरेदी – विक्री झाल्यानंतर मिळकत पत्रिका (प्रॉपर्टी कार्ड) आणि करदाता अभिलेख (टॅक्स पे रेकॉर्ड) यांवर त्याची नोंद होते. या दोन्ही ठिकाणी नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून आता स्वयंचलित माहिती पाठवण्याची सुविधा आहे.

म्हणजे मिळकत पत्रिका अद्यायावत करण्यासाठी सर्व्हर ते सर्व्हर माहिती पुढे पाठवता येऊ शकते. विभागाचा सर्व्हर आणि संबंधित महापालिकेचा सर्व्हर यांचे एकत्रिकरण करण्याची सुविधा आहे. त्यामुळे सदनिका खरेदी करणाऱ्यांना महापालिकेत जाऊन स्वतःचे नाव मिळकतीवर लावण्यासाठी स्वतंत्र अर्ज करण्याची गरज नाही.

अभिषेक देशमुख, नोंदणी उपमहानिरीक्षक (संगणक)

Leave A Reply

Your email address will not be published.