Steel Rate : अंदाज खरा ठरला, घर बांधण्याचं स्वप्न आणखी महागलं! नव्या वर्षात स्टीलच्या दरांत मोठी वाढ, पहा, आजचे काय आहेत भाव ?
नव्या वर्षात घराचं स्वप्न पूर्ण करणं दिवसेंदिवस महाग होत जाणार आहे. नवीन वर्षात बांधकाम साहित्याच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात होती आता तसंच काहीसं चित्र होताना दिसत आहे. डिसेंबर 2022 च्या तुलनेत जानेवारी 2023 च्या सुरुवातीलाच स्टिलच्या किमतीत जोरदार वाढ होऊ लागली आहे. परंतु, या तेजीच्या दरम्यान, आपल्या स्वप्नातील घर बांधण्यासाठी अद्यापही चांगली संधी आहे, स्टीलच्या किंमतीत आगामी काळात आणखी वाढण्याची शक्यता आहे.
स्टील बारच्या किंमतीत झपाट्याने वाढ..
स्टील बारच्या किमती ज्या वेगाने वाढत आहेत, ते पाहता हा वेग लवकरच थांबणार नाही, असे दिसते. अशा परिस्थितीत, घर बांधण्याच्या योजनेत आणखी विलंब झाल्यास घरबांधणीवरील तुमचा खर्च आणखी वाढू शकतो. 2022 च्या दरम्यान, जिथे एप्रिल महिन्यात स्टील बारच्या किमती गगनाला भिडल्या होत्या, त्यानंतर वर्षाच्या अखेरीस म्हणजे डिसेंबर महिन्यात देशातील अनेक शहरांमध्ये त्याच्या किमतीत लक्षणीय घट झाली होती. मात्र जानेवारी महिन्याच्या पहिल्याचं
आठवड्यापासून मोठी तेजी दिसू लागली आहे. कानपूरपासून हैदराबादपर्यंत आणि दिल्लीपासून मुंबईपर्यंत स्टील बारच्या किमतीत बरीच तफावत दिसून येत आहे.
भाव खाली येण्याची वाट पाहणं महागणार..
जर तुम्ही तुमच्या स्वप्नातील घर बांधण्याचा विचार करत आहात ? आणि जास्त खर्चामुळे ते पुढे ढकलत असाल, तर तुमच्यासाठी अजूनही ही चांगली संधी आहे. असं होऊ नये की, तुम्ही बांधकाम साहित्याच्या किंमती कमी होण्याची वाट पाहत बसाल अन् रेट्स दुप्पटीने वाढतील.
तसं पाहिलं तर याआधीच्या रिपोर्ट्समध्ये असाही अंदाज वर्तवण्यात आला होता की, नवीन वर्ष 2023 सोबत सिमेंट कंपन्या देखील किमतीत झपाट्याने वाढ करण्याच्या तयारीत आहे. वास्तविक, घरबांधणीसाठी होणाऱ्या खर्चाचा मोठा हिस्सा स्टील बार-सिमेंटचा आहे. स्टील बारची किंमत कमी झाली तर तुमच्या बांधकामाचा खर्चही कमी होतो.
तुमच्या शहराचे ऑनलाइन दर तपासा..
भारतातील प्रमुख शहरांमध्ये स्टीलबारच्या दरांत दररोज बदल होताना दिसतात. बारच्या किमतीतील बदलांची माहिती ayronmart.com या वेबसाइटवरून मिळू शकते. याद्वारे तुम्ही तुमच्या शहरातील स्टील बार ची किंमत सहज शोधू शकता. येथे हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की, येथे प्रति टन स्टील बार च्या किमती नमूद केल्या आहेत आणि सरकारने निश्चित केलेला 18% दराने GST (GST) स्वतंत्रपणे लागू आहे.
महाराष्टात काय आहे दर..
नागपुरमध्ये स्टीलबारचे दर डिसेंबरमध्ये 47,800 रुपये/टन होते ते नवं वर्ष जानेवरी 2023 मध्ये 52,200 रुपये/टन झाले आहे. म्हणजे जवळपास 4500 पर्यंत दार वाढले आहे.
मुंबईमध्ये स्टीलबारचे दर डिसेंबरमध्ये 52,800 रुपये / टन होते ते नवं वर्ष जानेवरी 2023 मध्ये 56,500 रुपये / टन झाले आहे. म्हणजे जवळपास 5000 पर्यंत दार वाढले आहे.
जालनामध्ये स्टीलबारचे दर डिसेंबरमध्ये 51,700 रुपये/टन होते ते नवं वर्ष जानेवरी 2023 मध्ये 56,500 रुपये / टन झाले आहे. म्हणजे जवळपास 5000 पर्यंत दार वाढले आहे.