महाअपडेट टीम 22 डिसेंबर 2021 :- छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्यामुळे नगर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 9 मधील श्रीपाद छिंदमचे महापालिकेतील नगरसेवकपद रद्द करण्यात आले. 

या रिक्त जागेवर झालेल्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीला धक्का देत भाजपचे भाजपचे प्रदीप परदेशी यांचा मोठा विजय झाला आहे.

या पोटनिवडणुकीत चौथ्या फेरीपर्यंत मनसेचे पोपट पाथरे परंतु त्यांची आघाडी पाचव्या फेरीनंतर तुटली.

मनसे : पोपट पाथरे – 1751 मते
महा विकास आघाडी : सुरेश तिवारी – 2589
भाजप : प्रदीप परदेशी – 3106

प्रदीप परदेशी यांनी शिवसेना-राष्ट्रवादी महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश तिवारी यांचा 617 मतांनी पराभव केला.

मतदारांचा उत्साह नव्हता :-

छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान केल्यामुळेराज्यभर निंदेचा विषय ठरलेल्या श्रीपाद छिंदमचे नगरसेवक पद नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी रद्द केलं होतं.

अहमदनगर महापालिकेच्या प्रभाग 9 क मध्ये पोटनिवडणूक प्रक्रिया काळ पार पडली होती. परंतु मतदारांनी मात्र या निवडणूक प्रक्रियेला उत्साह दाखविला नसल्याने या जागेवर फक्त 44.61 टक्केच मतदान झालं होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *