Take a fresh look at your lifestyle.

महाराष्ट्रात शाळा होणार पुन्हा बंद ? शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले संकेत

0

शेतीशिवार टीम,22 डिसेंबर 2021 :- कोरोना संक्रमणामुळे गेली दीड वर्षाहून अधिक काळ बंद असलेल्या शाळा प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर आता खुल्या शाळा झाल्या होत्या परंतु आता एक मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रातील शाळा पुन्हा एकदा बंद होण्याची शक्यता आहे. असे संकेत राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले आहे.

सध्या महाराष्ट्रात ओमिक्रॉन (omicron ) व्हेरियंटचे रुग्ण झपाटाने वाढत असून ही रुग्णसंख्या वाढत राहिली तर सरकार पुन्हा शाळा बंद करण्याचा निर्णय घेऊ शकते.

देशातील एकूण 224 ओमिक्रॉन रुग्णांपैकी 54 महाराष्ट्रातील आहेत. मात्र, राष्ट्रीय राजधानी दिल्लीत 57 रुग्ण वाढले आहेत. यासह ओमिक्रॉनच्या बाबतीत महाराष्ट्र राज्य देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे.

राज्याच्या शिक्षणमंत्र्यांनी सांगितले की, ओमिक्रॉनचे (omicron ) रुग्ण वाढत राहिल्यास आम्ही पुन्हा शाळा बंद करण्याचा निर्णय घेऊ शकतो. सध्या आम्ही सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत.

काही दिवसांपूर्वीच नुकत्याच राज्यात ग्रामीण भागात पाचवी ते बारावी आणि शहरी भागात आठवी ते बारावी शाळा सुरू झाल्या होत्या. मुंबईतही 16 डिसेंबरपासून प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांना शाळेत येण्याची परवानगी देण्यात आली होती. परंतु आता पुन्हा एकदा शाळा बंद झाल्या तर विद्यार्थ्यांचं शौक्षणिक नुकसान होण्याची शक्यता आहे.

यापूर्वी ओमिक्रॉनच्या वाढत्या प्रभावामुळे चंदिगड राज्यानेही शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय महाराष्ट्रात 2022 बोर्डाच्या परीक्षांच्या तारखाही जाहीर झाल्या आहेत. अशा परिस्थितीत कोरोनाच्या धोक्यामुळे शाळा बंद राहिल्यास मुलांच्या शिक्षणाला फटका बसण्याची शक्यता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.