शेतीशिवार टीम,22 डिसेंबर 2021 :- गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे. मजबूत फंडामेंटल्स असलेले क्वॉलिटी स्टॉक्स देखील या पडझडीपासून स्वत:ला वाचवू शकले नाहीत.
परंतु, असे काही शेअर्स आहेत ज्यांनी शेअर बाजार घसरणीच्या काळातही आपल्या गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न्स दिले आहेत. असाच एक स्टॉक भिलवाडा स्पिनर्सचा (Bhilwara Spinners) आहे. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (BSE) वर लिस्टेड झालेल्या भीलवाडा स्पिनर्सच्या शेयर्सनी गेल्या एका आठवड्यात गुंतवणूकदारांना जोरदार रिटर्न्स दिले आहे. कंपनीच्या शेअरने 21 ते 41.10 रुपयांची आश्चर्यकारक लेव्हल गाठली आहे.
मागील 5 ट्रेडिंग सत्रांमधलं वरचं सर्किट :-
भिलवाडा स्पिनर्स (Bhilwara Spinners) हा 2021 च्या मल्टीबॅगर स्टॉकपैकी (Multibagger stock) एक आहे. कंपनीच्या शेअरने गेल्या आठवड्यात 95 टक्के रिटर्न्स दिले आहेत. गेल्या 5 ट्रेडिंग सत्रांमध्ये कंपनीचे शेअर्स वरच्या सर्किटमध्ये आहेत. जर आपण गेल्या एका महिन्याबद्दल बोललो तर बीएसई (BSE) मध्ये लिस्टेड असलेल्या या कंपनीचे शेअर्स 19.30 रुपयांवरून 41.10 रुपयांच्या पातळीवर पोहोचले आहेत. या कालावधीत कंपनीच्या शेयर्सनी गुंतवणूकदारांना सुमारे 115 % रिटर्न्स दिले आहेत. त्याच वेळी, 6 महिन्यांपूर्वी कंपनीचे शेअर्स 17.25 रुपयांच्या लेव्हलवर होते, जे आता 41.10 रुपयांवर आहेत. या कालावधीत कंपनीच्या शेअर्समध्ये सुमारे 140 % वाढ झाली आहे.
यावर्षी आत्तापर्यंत मिळाले 175 % रिटर्न्स :-
या वर्षी आतापर्यंत, भिलवाडा स्पिनर्सच्या (Bhilwara Spinners) शेयर्सने गुंतवणूकदारांना सुमारे 175 % रिटर्न्स दिले आहे. वर्षाच्या सुरुवातीला कंपनीचे शेअर्स 14.90 रुपयांच्या लेव्हलवर होते, ते आता 41.10 रुपयांवर पोहोचले आहेत.
भिलवाडा स्पिनर्स (Bhilwara Spinners) व्यतिरिक्त, सुरत टेक्सटाईल मिल्स (Surat Textile Mills) आणि Acme रिसोर्सेसने (Acme Resources) देखील गेल्या एका आठवड्यात गुंतवणूकदारांना उत्कृष्ट रिटर्न्स दिले आहेत.आहे. सुरत टेक्सटाईल मिल्सचे शेअर्स गेल्या एका आठवड्यात जवळपास 67% वाढले आहेत. तर, Acme Resources चे शेअर्स 60 % वाढले आहेत.
सुरत टेक्सटाईल मिल्सच्या शेअर्सने गेल्या एका महिन्यात 145% आणि गेल्या सहा महिन्यांत सुमारे 220% रिटर्न्स दिले आहे. तर Acme Resources च्या शेयर्सने या वर्षी आतापर्यंत गुंतवणूकदारांना 110 % रिटर्न्स दिले आहे.
या शेयर्सबद्द्दल अधिक माहिती साठी तुम्ही शेर्सचे नाव गूगल सर्च करूनही पाहू शकता…