शेतीशिवार टीम,22 डिसेंबर 2021 :- महिंद्रा XUV700 ला ऑगस्ट 2021 मध्ये लॉन्च झाल्यापासून भारतातील खरेदीदारांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. महिंद्राने कारची बुकिंग विंडो 7 ऑक्टोबर रोजी उघडली होती. या SUV ने पहिल्या दिवशीच दिवशी 25,000 युनिट्सची ऑर्डर एका तासात मिळाली आणि दुसऱ्या दिवशी 25,000 युनिट्सची बुकिंग दोनचं तासांत झाली होती.
महिंद्रा भारतीय कार निर्मात्यासाठी नवा विक्रम प्रस्थापित करत आहे. Mahindra XUV700 रु.11.99 लाखाला लाँच करण्यात आली होती, त्यानंतरच्या बुकिंगसाठी किमती रु.12.49 लाखांपर्यंत वाढवण्यात आल्या होत्या, तर टॉप मॉडेलची किंमत रु.22.99 लाख आहे. महिंद्राला आत्तापर्यंत 75,000 हून अधिक युनिट्सच्या ऑर्डर मिळाल्या आहेत आणि ऑटोमोटिव्ह क्षेत्रातील कच्च्या मालाची जागतिक कमतरता लक्षात घेता मागणी पूर्ण करण्याचे मोठं आव्हान कंपनीसमोर उभं आहे.
महिंद्राच्या या नवीन फ्लॅगशिप एसयूव्हीची डिलिव्हरी सुरू झाली असली तरी, अनेक लोक डिलिव्हरी न झाल्याच्या तक्रारी करत आहेत. SUV ची मागणी अशी आहे की, व्हेटिंग डिलिव्हरी75 आठवडे किंवा 525 दिवस म्हणजे सुमारे 18 महिन्यांपर्यंत पोहोचली आहे.
टॉप-ऑफ-द-लाइन XUV700 साठी, तुम्हाला डिलिव्हरीसाठी 1.5 वर्षे प्रतीक्षा करावी लागणार आहे. MX व्हेरियंट जो स्वस्त व्हेरियंट आहे त्याची डिलिव्हरी 25-27 आठवडे किंवा सुमारे 6 महिन्यांत मिळणार आहे.
महिंद्राने XUV700 चा पहिली पेट्रोल व्हेरियंट SUV ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात, तर पहिली डिझेल व्हेरियंट SUV नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात डिलिव्हरी केली.
ओव्हरबुकिंग आणि सेमी कंडक्टरच्या कमतरतेमुळे डिलिव्हरीस बराच विलंब झाला आहे. पहिल्या दिवशी केलेल्या बुकिंगसाठी, डिलिव्हरीची तारीख 2022 च्या सहाव्या महिन्यात असेल, तर काहींना डिलिव्हरीची मुदत जुलै 2023 पर्यंत वाढवण्यात आली आहेत.