शेतीशिवार टीम,22 डिसेंबर 2021 :- Tata Motors जानेवारी 2022 मध्ये Tiago हॅचबॅक आणि Tigor sedan च्या CNG व्हर्जन लॉन्च करणार आहे. टाटा डीलर्सनी नवीन व्हेरियंटसाठी प्री-ऑर्डर घेणे सुरू केलं आहे, तरीही याबाबत अजून अधिकृत घोषणा होणे बाकी आहे.

टाटा मोटर्स Punch सबकॉम्पॅक्ट एसयूव्हीचे CNG व्हर्जनची देखील तयारी सुरु आहे. लहान SUV सध्या 1.2-लीटर पेट्रोल इंजिनसह येते जी 85bhp आणि 113Nm टॉर्क निर्माण करते.

ट्रान्समिशन ऑप्शनमध्ये 5-स्पीड मॅन्युअल आणि 5-स्पीड AMT समाविष्ट आहे. टाटाने Punch CNG टेस्ट देखील सुरू केली आहे आणि हे मॉडेल 2022 मध्ये कोणत्याही महिन्यात लॉन्च केलं जाण्याची शक्यता आहे.

Tata Punch CNG 1.2 लिटर 3-सिलेंडर रेव्होट्रॉन इंजिन असणार आहे. यामुळे पॉवर आणि टॉर्कमध्ये थोडी घट होणार आहे. ही छोटी SUV 70-75bhp पॉवर आणि 100Nm टॉर्कसह दिली जाऊ शकते. हे केवळ मॅन्युअल व्हर्जनमध्ये ऑफर केलं जाईल. पंच CNG सुमारे 30 kmpl चा मायलेज देऊ शकते.

पंच सीएनजीचे (Punch CNG) डिझाईन आणि इंटीरियरमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता आहे. कंपनी फेंडर आणि मागील बाजूस CNG बॅज देईल. पंच CNG ह्युंदाई सॅन्ट्रो (Hyundai Santro) , मारुती वॅगनआर (Maruti WagonR) आणि आगामी स्विफ्ट सीएनजीशी (Swift CNG) स्पर्धा करू शकते.

सीएनजी व्हेरियंट आणि मिडल व्हेरियंटसह Punch येण्याची अपेक्षा आहे. Punch च्या बेस व्हेरियंटमध्ये ड्युअल एअरबॅग्ज, EBD सह ABS, टिल्ट- अँडजस्टेबल स्टीयरिंग, सेंट्रल लॉकिंग, फ्रंट पॉवर विंडो आणि 15-इंच स्टील व्हील आहेत.

मिड-व्हेरियंटमध्ये 4-इंचाचा डिस्प्ले आणि 4 स्पीकर, मल्टी-फंक्शनल स्टीयरिंग व्हील, रिमोट की लॉक/अनलॉक, पॉवर्ड ORVM, पॉवर विंडो, फॉलो मी होम हेडलॅम्प, यूएसबी चार्जिंग सॉकेट आणि ऑडिओ सिस्टम आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *