शेतीशिवार टीम, 22 डिसेंबर 2022 : PM Kisan 10th Instalment LIVE : PM सन्मान निधीच्या 10व्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. खरं तर, PM किसान सन्मान निधीच्या नवीन हप्त्याची तारीख जाहीर झाली आहे. यासंदर्भात लाभार्थी शेतकऱ्यांना संदेशही देण्यात आला आहे.
कधी येणार 10वा हप्ता :-
संदेशात दिलेल्या माहितीनुसार, PM किसान सन्मान निधीचा 10वा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी 1 जानेवारी 2022 रोजी दुपारी 12 वाजता जारी करणार आहेत.
या दिवशी पीएम मोदी शेतकरी उत्पादक संघटनांना इक्विटी अनुदान जारी करतील, असंही संदेशात सांगण्यातआलं आहे. तुम्ही pmindiawebcast.nic.in किंवा दूरदर्शनच्या माध्यमातून या कार्यक्रमात सामील होऊ शकता…
किती लोकांना होणार फायदा :-
PM किसान योजनेअंतर्गत सुमारे 12 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2 हजार रुपये पाठवले जाणार आहेत. पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक 6 हजार रुपये दिले जातात. वर्षातील दर चार महिन्यांनी 2,000 रुपये दिले जातात. याचा अर्थ असा की, 1 जानेवारी रोजी येणारा नवीन हप्ता 2021 च्या शेवटच्या चार महिन्यांसाठी असणार आहे.
आतापर्यंत झाले नऊ हप्ते प्राप्त :-
AUG-NOV 2021-22 – 9व्या हप्त्याच्या लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या 11,12,88,002
APR-JUL 2021-22 – 8व्या हप्त्याच्या लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या 11,11,52,851
DEC-MAR 2020-21 – 7व्या हप्त्याच्या लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या 10,23,49,456
AUG-NOV 2020-21 – 6व्या हप्त्याच्या लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या 10,23,14,245
APR-JUL 2020-21 – 5व्या हप्त्याच्या लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या 10,49,31,270
DEC-MAR 2019-20 – चौथ्या हप्त्याच्या लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या 8,96,00,395
AUG-NOV 2019-20 – तिसऱ्या हप्त्याच्या लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या 8,76,21,282
APR-JUL 2019-20 – दुसऱ्या हप्त्याच्या लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या 6,63,27,601
DEC-MAR 2018-19 – पहिल्या हप्त्याच्या लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या 3,16,10,700