पश्चिम बंगालसह ‘या’ 7 शहरांचे नामांतर झालं, पण छत्रपती संभाजीनगर, धाराशीवच्या नामांतराचं घोडं आडलं कुठं ? पहा संसदेत काय घडलं…

0

शेतीशिवार टीम : 25 जुलै 2022 :- महाराष्ट्रातील औरंगाबाद व उस्मानाबादच्या बहुचर्चित नामांतराबाबतचा उल्लेख वगळून केंद्र सरकारने पश्चिम बंगालसह देशातील 7 शहरांच्या नावांत बदल करण्यास मंजुरी दिल्याची माहिती केंद्र सरकारकडून संसदेत देण्यात आली आहे.

याबाबत राज्य सरकारकडून आधी प्रस्ताव यावा लागतो . महाराष्ट्रातील शिंदे सरकारकडून तसा प्रस्ताव अद्याप आलेलाच नाही, असे सूत्रांकडून सांगण्यात आले. महाविकास आघाडी सरकारने 28 जून रोजी औरंगाबादेचे नाव छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नाव धाराशीव करण्याबाबतचा निर्णय अखेरच्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर केला..

त्यानंतर त्या प्रस्तावाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळ बैठकीत नुकत्याच झालेल्या पुन्हा मान्यता दिली. मात्र, याला अधिकृत स्वरूप मिळण्यासाठी केंद्राची मान्यता गरजेची असते. त्यासाठी राज्याकडून निर्णय झाल्यांनतरही रितसर प्रस्ताव पाठवावा लागतो. राज्यातील नवीन सरकारने तो पाठवलेला नसल्याचे केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राव यांनी संसदेत दिलेल्या उत्तरात म्हटले आहे.

राज्याने दोन्ही शहरांचा व नवी मुंबई विमानतळाच्या नाव बदलांचे प्रस्ताव पाठवल्यावर केंद्राकडून त्यांना त्वरित मान्यता मिळण्यात काही अचडणी दिसत नाही, असही गृहमंत्रालय सूत्रांकडून सांगितले जाते.

दरम्यान, संसदेचे कामकाज गदारोळामुळे दिवसभर स्थगित करण्यात आल्यानंतर एका लेखी प्रश्नाच्या उत्तरात गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी शहरांच्या नाव बदलांबाबत माहिती दिली आहे.

त्यांनी सांगितले की, पश्चिम बंगाल राज्याचे नाव ‘बांग्ला’ असे करून तसा बदल शासकीय व्यवहारांत करण्यास केंद्राने मंजुरी दिली. मागील 5 वर्षांत देशातील 7 शहरे व गावांचही नाव बदलण्याच्या राज्यांच्या निर्णयांना केंद्राने मंजुरी दिली आहे.

यात अलाहाबादचे – प्रयागराज, फैजाबादचे – अयोध्या, जेथे गोदावरी नदी समुद्राला मिळते त्या आंध्र प्रदेशातील राजमुंद्रीचे राजा महेंद्रवरम, झारखंडमधील उंटारीचे – श्री बन्सीधर नगर, मध्य प्रदेशातील वीर सिंहपूर पालीचे – ‘माँ बिरासिनी धाम’, होशंगाबादचे – नर्मदापुरम व बाबईचे नाव माखननगर करण्याबाबतच्या व नवीन नावांच्या प्रस्तावांना केंद्राने मान्यता दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.