शेतीशिवार टीम : 24 जुलै 2022 :- भारतीय बाजारपेठेत लहान आणि कॉम्पॅक्ट SUV वाहनांची डिमांड वेगाने वाढत आहे, बहुतेक लोक हॅचबॅक कारऐवजी या SUV कार्सला पसंती देतात. दरम्यान, भारतीय बाजारात अनेक कंपन्यांनी या सेगमेंटमध्ये एकापेक्षा एक मॉडेल लॉन्च केले आहेत.

तुम्‍हीही परवडणारी कॉम्पॅक्ट SUV खरेदी करण्‍याचा विचार करत असाल आणि बजेट कमी असेल असेल तर, Renault तुमच्‍यासाठी एक चांगली संधी घेऊन आले आहे. कंपनी त्यांच्या स्वस्त SUV Renault Kiger च्या खरेदीवर आकर्षक फायनान्स स्कीम ऑफर करत आहे, शिवाय जुलै महिन्यात खरेदीवर डिस्काउंट देखील मिळत आहे.

काय आहे, कंपनीची ऑफर :-

Renault च्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, जर तुम्ही या SUV साठी फायनान्स केलं तर कर्जाची रक्कम 4.38 लाख रुपये असेल तर तुम्हाला 84 महिन्यांसाठी 6,999 रुपयांचा मासिक हप्ता (EMI) भरावा लागेल. येथे असेही नमूद केले आहे की, कर्जाची रक्कम किंवा कालावधी बदलल्यामुळे EMI देखील बदलू शकतो. ही फायनान्स ऑफर फक्त कंपनीच्या Renault Finance कडून उपलब्ध आहे.

ऑफर पाहण्यासाठी :- इथे क्लिक करा

या महिन्यात मिळत आहे बंपर डिस्काउंट :-

– रु. 55,000 पर्यंत स्पेशल लॉयल्टी लाभ
– रु. 10,000 पर्यंत कॉर्पोरेट डिस्काउंट किंवा ग्रामीण ग्राहकांसाठी स्पेशल ऑफर
– स्क्रॅपेज प्रोग्राम अंतर्गत रु. 10,000 पर्यंतचे फायदे

एकूण 5 व्हेरियंटमध्ये उपलब्ध असलेल्या या छोट्या SUV ची किंमत 5.99 लाख ते 10.62 लाख रुपये आहे. कंपनीने ही SUV ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आणि जबरदस्त फीचर्स नी सुसज्ज करून बाजारात आणली आहे. केवळ पेट्रोल इंजिन ऑप्शन्ससह येत असलेली ही SUV छोट्या कुटुंबासाठी चांगली सिद्ध होईल. केबिनमधील 5-सीटिंग लेआउटसह स्पोर्टी डिझाइन या SUV आणखीणच आकर्षक बनवते.

Renault KIGER चे एडव्हान्स फीचर्स याच्या इंटीरियरला अधिक स्मार्ट बनवतं, SUV ला नवीन क्रूझ कंट्रोल फीचर्स तसेच Android Auto Apple कार प्ले कनेक्टिव्हिटी आणि ARKAMYS 3D साउंड (4 स्पीकर + 4 tweeters) तुमचा प्रवास अधिक आनंददायी बनवतात.

याशिवाय स्मार्टफोन चार्जर, पुश स्टार्ट / स्टॉप स्मार्ट ऍक्सेस कार्ड, रियर व्ह्यू कॅमेरा आणि ऑटोमॅटिक एअरकंडिशन (AC) यासारख्या ॲडव्हान्स फीचर्सचाही यात समावेश करण्यात आला आहे.

ही SUV दोन वेगवेगळ्या पेट्रोल इंजिन ऑप्शन्ससह येते, एका व्हेरियंटमध्ये 1 लिटर क्षमतेचे नॅच्युरल एस्पिरेटेड इंजिन आहे, जे 72PS पॉवर आणि 96Nm टॉर्क जनरेट करते. तर, दुसऱ्या व्हेरिएंटमध्ये 1 लीटर टर्बो पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे, जे 100PS पॉवर आणि 160Nm टॉर्क जनरेट करते. या दोन्ही इंजिनांना 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन गिअरबॉक्स देण्यात आला आहे.

तसेच, टर्बो इंजिन 5-स्पीड सीव्हीटी ट्रान्समिशन गिअरबॉक्ससह येते. कंपनीचा दावा आहे की, या SUV ची मेंटनेंस कॉस्ट फक्त 40 पैसे प्रति किलोमीटर आहे, ज्यामुळे ती या सेग्मेंट मध्ये खूप किफायतशीर ठरते. सर्वसाधारणपणे, ही SUV 20 kmpl पर्यंत मायलेज देते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *