शेतीशिवार टीम : 26 मार्च 2022 : वाढत्या महागाईच्या काळात महाराष्ट्रातील जनतेसाठी दिलासादायक बातमी आहे. राज्यातील सीएनजी वाहनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे, कारण 1 एप्रिल 2022 पासून राज्यातील CNG च्या दरांत मोठी घट होणार असून या संदर्भातील एक महत्वपूर्ण आदेश / सूचना राज्याच्या वित्त विभागाने 25 मार्च 2020 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे. (CNG gas vat in maharashtra)

सध्या वाढतं प्रदूषण / वातावरणामधील बदल यामुळे संपूर्ण पर्यावरणावर याचा खूप मोठ्या प्रमाणात विपरीत परिणाम व्हायला लागला आहे. यामधील सर्वात जास्त प्रदूषण हे शहरी भागात पाहायला मिळतं आहे.

या सर्वांच्या पार्श्वभूमीवर प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी सीएनजी CNG गॅस हा वापरण्यासाठी प्रोत्साहन दिलं जात आहे. या वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी या आधीही महाराष्ट्रात इलेक्ट्रिक धोरण प्रभावीपणे राबवलं गेलं होतं. आणि याच पार्श्वभूमीवर CNG वाहनाच्या माध्यमातून सुद्धा प्रदूषणावर नियंत्रण केलं जाऊ शकतं.

परंतु महाराष्ट्रामध्ये सीएनजीची (CNG) उपलब्धता असेलेले दर व सीएनजी (CNG) वापरण्यासाठी वाहनधारक एवढे प्रोत्साहित ही होत नव्हते. या सर्वांचा विचार करता राज्यातील अर्थसंकल्प अधिवेशन 2022 मध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित दादा पवार (Deputy Chief Minister and Finance Minister Ajit Dada Pawar) यांच्या माध्यमातून महत्त्वाची घोषणा करण्यात आली होती.ती घोषणा म्हणजे CNG च्या VAT वरील कपात केली जाईल…

CNG चे दर किती होणार कमी…

महाराष्ट्रात CNG वरील VAT 13.5% वरून 3% करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनात घेतला होता. त्यामुळे 3% व्हॅटच्या आधारे प्रति किलो 5.75 रुपयाची कपात होणार आहे.

या आधी, महानगर गॅस लिमिटेडने जुलै 2021 मध्ये CNG च्या किमतीत 2.58 रुपये प्रति किलोने वाढ केली होती. तर जुलैमध्ये सीएनजीची (CNG) किंमत 50 रुपये किलोपेक्षा कमी होती. पण, त्यानंतर सीएनजीच्या (CNG) दरात वाढ होत राहिली. ऑक्टोबरमध्ये CNGच्या दरात दोन रुपयांनी वाढ करण्यात आली होती. यानंतर सीएनजीची किंमत 54.57 रुपये प्रति किलो झाली.

त्यानंतर नोव्हेंबरमध्ये सीएनजीमध्ये प्रतिकिलो 3.06 रुपयांची वाढ झाली. यानंतर 17 डिसेंबरला पुन्हा एकदा मुंबईत सीएनजीचा दर 63.50 रुपये प्रति किलोवर पोहोचला.

मात्र, आता पेट्रोल – डिझेलच्या वाढत्या किमतीत सीएनजीच्या (CNG) दरात प्रति किलो 5.75 रुपयाची कपात झाल्याने CNG वाहन धारकांना काहीसा दिलासा मिळाल्याचे दिसणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *