Take a fresh look at your lifestyle.

कृषी सिंचन अनुदान योजना : 2022 । राज्य शासनाकडून 55% अनुदानासाठी 31.60 कोटींचा निधी वितरीत!

0

शेतीशिवार टीम : 26 मार्च 2022 : प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना – (प्रति थेंब अधिक पीक घटक) अंतर्गत अर्ज केलेल्या शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक आणि महत्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आला आहे. प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेंतर्गत प्रति थेंब अधिक पीक घटकाची राज्यात सन 2015-16 पासून अंमलबजावणी करण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत केंद्र व राज्य हिश्श्याच्या निधीचे प्रमाण 60 : 40% असा आहे.

केंद्र शासनाने अनुसूचित जाती प्रवर्गासाठी केंद्र हिश्श्याचा उपलब्ध करुन दिलेला रु. 36 कोटी निधी व त्या समरूप रु . 24 कोटी असा एकूण रु .60 कोटी निधी वितरित करणे अभिप्रेत होते.

सन 2020-21 मध्ये रु. 24.40 कोटी निधी (केंद्र हिस्सा रु. 14.40 कोटी व राज्य हिस्सा रु .10 कोटी) संदर्भाकित शासन निर्णय दि. 22 मार्च, 2021 अन्वये वितरित करण्यात आला होता व सदर निधीपैकी रु. 35.60 कोटी निधीचे (केंद्र हिस्सा रु. 21.60 कोटी व राज्य हिस्सा रु. 14 कोटी) वितरण अद्याप बाकी होते.

प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना – प्रति थेंब अधिक पीक घटकाचा अनुसूचित जाती प्रवर्गाचा सन 2020-21 साठी केंद्र हिश्याचा अखर्चित निधी रु. 21.60 कोटी व राज्य हिश्याचा रु.10 कोटी असा एकूण रु.31.60 कोटी अखर्चित निधीला पुनर्जीवित करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्यात आली आहे.

त्यामुळे आता उर्वरित निधी मंजूर झाल्याने ज्या शेतकऱ्यांनी या योजनेसाठी अर्ज केला होता त्यांना निधी मजूर झाला असून खात्यात वितरित करण्यास सुरुवात झाली आहे.

काय आहे, ही प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना तुम्ही लाभ घेऊ शकता का ?

या ‘शेतीशिवार’ माध्यमातून आपण, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेबद्दलची (PMKSY 2022 ) सर्व माहिती देणार आहोत. जसे की लाभ, कागदपत्रे, अनुदान, ऑनलाईन अर्ज पद्धती जाणून घेऊ.त्यामुळे आमचा लेख शेवटपर्यंत वाचा…

अन्नधान्यासाठी शेती ही सर्वात महत्वाची आहे आणि सिंचन योग्य प्रकारे केले तरच शेती अधिक चांगली होईल हे तुम्हाला माहीत आहे. शेतात सिंचनासाठी जास्त पाणी लागते. पिकांना पाणी नीट न मिळाल्यास शेतकऱ्यांच्या शेतात नासाडी होते. या PMKSY 2022 अंतर्गत शेतकऱ्यांची ही अडचण दूर करून शेतकऱ्यांच्या शेतीसाठी पाण्याची व्यवस्था केली जाईल. या योजनेंतर्गत बचत गट, ट्रस्ट, सहकारी संस्था, निगमित कंपन्या, उत्पादक शेतकरी गटांचे सदस्य आणि इतर पात्र संस्थांच्या सदस्यांनाही लाभ दिला जाईल. (Pradhanmantri Krishi Sinchayee Yojana 2022) अंतर्गत या योजनेअंतर्गत केंद्र सरकारने 50000 कोटी रुपयांची रक्कम निश्चित केली आहे.

पिकांच्या झाडाच्या मुळाशी लहानशा नळीद्वारे थेंबथेंब पाणी देण्याची आधुनिक पद्धत म्हणजे ठिबक सिंचन. या पद्धतीत, जमिनीत पाणी जिरण्याचा जो वेग असतो, त्यापेक्षा कमी वेगाने पिकास पाणी दिले जाते. मुख्यत्वे करून पाणी थेंबाथेंबाने दिले जाते. ठिबक सिंचनात महाराष्ट्र अग्रेसर असून संपूर्ण भारताच्या 60 टक्के ठिबक सिंचन एकटय़ा महाराष्ट्रात केले जाते.

तुषार सिंचन (ज्यात पाणी शिंपडणारे म्हणून ओळखले जाते) हे एक असे साधन आहे जे शेती पिके, लॉन्स, भूदृश्य, गोल्फ अभ्यासक्रम आणि इतर भागात सिंचन करण्यासाठी वापरली जाते. ते थंड करण्यासाठी आणि वायूच्या धूळ नियंत्रणासाठी देखील वापरली जाते. तुषार सिंचन ही पावसासारख्याच प्रकारे नियंत्रित पद्धतीने पाण्याचा वापर करण्याचा मार्ग आहे.

पाणी एका नेटवर्कद्वारे वितरीत केले जाते ज्यामध्ये पंप, वॉल्व्ह , पाईप्स आणि स्पिंकलर्स असू शकतात. या सिंचनाचा वापर निवासी, औद्योगिक आणि कृषी वापरासाठी केला जाऊ शकतो. जेव्हा पंपच्या मदतीने मुख्य पाईपद्वारे दाबून पाणी वाहू दिले जाते तेव्हा फिरणाऱ्या नोझल मधून बाहेर पडते आणि ते पिकावर शिंपडले जाते.

पंतप्रधान कृषी सिंचन योजनेची (PMKSY 2022) वैशिष्ट्ये :-

या योजनेच्या माध्यमातून सर्व शेतात सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार आहे.
या योजनेअंतर्गत सरकारला जलसंचय, भूजल विकास इत्यादी जलस्रोत मिळणार आहेत.
यासोबतच शेतकऱ्याने सिंचनाची साधने खरेदी केल्यास त्यालाही अनुदान दिले जाणार आहे.

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेच्या माध्यमातून वेळ आणि पैसा दोन्हीची बचत होणार आहे.
ठिबक सिंचन, तुषार सिंचन इत्यादींनाही शासन या योजनेद्वारे प्रोत्साहन देणार आहे.
पिकांना योग्य प्रकारचे सिंचन मिळाल्यास उत्पादनातही वाढ होते.

या योजनेचा लाभ अशा सर्व शेतकऱ्यांना घेता येईल ज्यांची स्वतःची शेती आणि पाण्याचे स्त्रोत आहेत.
याशिवाय जे शेतकरी कंत्राटी शेती करत आहेत किंवा सहकारी सभासद आहेत तेही या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
बचत गटांनाही प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेचा लाभ मिळू शकतो.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करावा लागेल.
या योजनेंतर्गत सरकारकडून सिंचन उपकरणे खरेदीवर 80% ते 90% पर्यंत अनुदान दिलं जाणार आहे.

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेचे (PMKSY 2022) लाभ :-

या योजनेंतर्गत देशभरात शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात सिंचनासाठी पुरेसे पाणी उपलब्ध करून दिले जाईल आणि त्यासाठी शासनाकडून सिंचन उपकरणांसाठी अनुदान दिले जाईल.
ही पाणीटंचाई पूर्ण करण्यासाठी प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सिंचन करता येणार आहे.
या योजनेचा विस्तार शेतीसाठी योग्य असलेल्या जमिनीपर्यंत केला जाणार आहे.

या योजनेचा लाभ देशातील अशा शेतकऱ्यांना दिला जाईल ज्यांच्याकडे स्वतःची शेतीयोग्य जमीन आहे आणि ज्यांच्याकडे जलस्रोत आहेत.
प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना 2022 द्वारे, शेतीचा विस्तार होईल, उत्पादकता वाढेल, ज्यामुळे अर्थव्यवस्थेचा संपूर्ण विकास होईल.
योजनेसाठी केंद्राकडून 60% अनुदान दिले जाणार असून 40% खर्च राज्य सरकार करणार आहे.

त्यामुळे ठिबक / स्प्रिंकलरसारख्या सिंचन योजनेचा लाभही शेतकऱ्यांना मिळतो.

नवीन उपकरण प्रणालीच्या वापरामुळे 40-50% पाण्याची बचत होईल आणि त्यासोबतच कृषी उत्पादनात 35-40% वाढ होऊन उत्पादनाचा दर्जा वाढेल.
2018 – 2019 या काळात केंद्र सरकार सुमारे 2000 कोटी रुपये खर्च करणार आहे आणि पुढील आर्थिक वर्षात या योजनेवर आणखी 3000 कोटी रुपये खर्च केले जातील…

पंतप्रधान कृषी सिंचन योजना 2022 साठी पात्रता :-

1) या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे शेतीयोग्य जमीन असावी.
2) या योजनेचे पात्र लाभार्थी देशातील सर्व विभागातील शेतकरी असावे.
3) पीएम कृषी सिंचाई योजनेअंतर्गत, बचत गट, ट्रस्ट, सहकारी संस्था, निगमित कंपन्या, उत्पादक शेतकरी गटांचे सदस्य आणि इतर पात्र संस्थांच्या सदस्यांनाही लाभ प्रदान केले जातील.
4) शेतकरी SC, ST जातिवर्गाचा असेल तर जात प्रमाणपत्र आवश्यक आहे.
5) शेतकऱ्याकडे विद्युत पाण्याच्या पंपासाठी कायमचे विद्युत जोडणी संच आवश्यक आहे. त्यासाठी शेतक-यांना वीज बिलची ताजी प्रत सादर करावी लागेल.
6) सूक्ष्म सिंचन प्रणाली फक्त कंपनीच्या प्रतिनिधींनी तयार केलेली असावी.
7) शेतकऱ्यांना ५ हेक्टर क्षेत्राच्या मर्यादेत लाभ देण्यात येईल.
8) शेतकऱ्याला पूर्व-मंजुरी मिळाल्यानंतर, त्याने अधिकृत विक्रेता आणि वितरकांकडून सूक्ष्म-सिंचन संच विकत घ्यावे, ते शेतामध्ये स्थापित करावे आणि पूर्व-
मंजुरी मिळाल्यानंतर 30 दिवसांच्या आत खरेदी केलेल्या पावत्या अपलोड कराव्यात…

प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना 2022 ची कागदपत्रे :-

अर्जदाराचे आधार कार्ड
ओळखपत्र
7/12 – 8A प्रमाणपत्र
बँक खाते पासबुक
पासपोर्ट आकाराचा फोटो
मोबाईल नंबर
वीज बिल
खरेदी केलेल्या संचाचे बिल

अनुदान :-

केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सादर योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना देय असलेले अनुदान खालीलप्रमाणे :-

1) अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी – 55 %
2) इतर शेतकरी – 45 %

किती एकर शेतीला किती अनुदान मिळेल :- PDF डाउनलोड करून पाहू शकता !

 

प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना 2022 मध्ये अर्ज कसा करायचा ? 

या योजनेची माहिती प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि अर्ज करण्यासाठी राज्य सरकारने एक ऑफिशियल पोर्टल तयार केलं आहे.

1) सर्व प्रथम ‘एक शेतकरी एक अर्ज’ म्हणजेच महाडीबीटी पोर्टल वर वर आपला युजर आयडी आणि पासवर्ड किंवा आपला आधार कार्ड आणि ओटीपी टाकून लॉगिन करावे.

2) होम पेज वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ऑप्शनमध्ये अर्ज करा यावर क्लिक करा.

 

3) 3) ‘अर्ज सादर करा’ यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला कृषी यांत्रिकीकरण नंतर दुसऱ्या नंबरला ‘सिंचन साधने व सुविधा’ हा ऑप्शन दिसेल. त्याच्यासमोरच प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना (प्रति थेंब अधिक पीक घटक (सूक्ष्म सिंचन घटक) समोरील बाबी निवड वर क्लिक करा.

4) यानंतर तुम्हाला सिंचन ‘सिंचन स्रोत’ हा ऑप्शन दिसेल. यामध्ये तुम्हाला तुमचं शेतावरील ‘सिंचन स्रोत’ / ‘ऊर्जा स्रोत’ / तसेच तुमच्याकडे कोणतं सिंचन उपकरण आहे, त्यावर सिलेक्ट करा.यानंतर खाली ‘जोडा’ या शब्दावर क्लिक करा. तुमचा फॉर्म यशस्वीरीत्या जतन होईल..

5) आता तुम्हाला तुमचं स्रोत ऍड झालेलं दिसेल. आता तुम्ही मुख्यपृष्ठ वर या. आणि पुन्हा ‘अर्ज करा’ या ऑप्शनवर क्लिक करा. आणि पुन्हा ‘सिंचन साधने व सुविधा’ वरील बाबी निवडा वर क्लिक करा.

6) आता तुमच्यासमोर मेन अर्ज खुलेल जसे की, गाव / तालुका / गट क्रमांक / मुख्य घटक / घटक निवडा / परिणाम / काल्पर व्यास या सर्व बाबी काळजीपूर्वक भरा.

7) यानंतर खाली तुमचं क्षेत्र हंगाम / (हेक्टर आणि आर) / पीके / ही माहिती भरा.

8) यानंतर तुमचा अर्ज ‘Succes ‘ होईल.

10) क्लिक केल्या नंतर पुढे आपणाला दुसऱ्या पेज वर redirect केले जाईल या पेज वर आपणाला make payment चे ऑपशन दाखवला जाईल. इथे आपण 23.60 रुपयांचं payment करू शकता.

11) payment करण्यासाठी आपणाला बरेच ऑपशन दाखवले जातील UPI , Wallet , net banking , IMPS यापैकी आपल्याला ज्या प्रकारे payment करायची आहे ते ऑपशन निवडून तुम्ही payment करू शकता…

Leave A Reply

Your email address will not be published.