Take a fresh look at your lifestyle.

पेट्रोल – डिझेल च्या दरांत 5 दिवसांत 3.20 रु.वाढ ; तर एप्रिल पासून औषधांच्या किमतीत होणार ‘इतकी’ वाढ !

0

शेतीशिवार टीम : 26 मार्च 2022 : सरकारी तेल कंपन्यांनी (IOCL) पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत. आज, शनिवारी पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. शनिवार 26 मार्च रोजी दिल्लीसह बहुतांश शहरांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या दरात 70-80 पैशांनी वाढ झाली आहे. आज पेट्रोल 70 पैशांनी, तर डिझेल 80 पैशांनी महागलं आहे.

गेल्या पाच दिवसांतील ही चौथी वाढ आहे. तेल कंपन्यांनी 22 मार्चपासून (24 मार्च वगळता) पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ सुरूच ठेवली आहे. अशाप्रकारे 5 दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 3.10 रुपयांनी वाढ झाली आहे.

महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर :-

या वाढीनंतर आज राष्ट्रीय राजधानी दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत 98.61 रुपये झाली आहे, तर डिझेलची किंमत 89.87 रुपये झाली आहे.

मुंबईत पेट्रोल 84 पैशांनी महाग होत असून 113.35 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे, तर डिझेल 97.55 रुपये आहे.

कोलकात्यात आज पेट्रोल 83 पैशांनी महागलं असून ते ₹107.18 वरून 108.01 रुपये प्रति लिटर झाले आहे. कोलकात्यात डिझेल 93.01 रुपये प्रति लिटरने विकले जाते.

चेन्नईत एक लिटर पेट्रोलच्या दरात 76 पैशांची वाढ नोंदवण्यात आली असून ते 104.43 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.47 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे.

एप्रिल पासून औषधांच्या किमतीत होणार ‘इतकी’ वाढ…

जागतिक महागाई आणि रशिया-युक्रेन युद्धामुळे आपल्या देशातही महागाई वाढू लागली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींदरम्यान आता औषधांच्या किमतीही वाढणार आहे.

एप्रिलपासून पेन किलर, अँटीबायोटिक्स, अँटी-व्हायरससह अत्यावश्यक औषधांच्या किमती वाढणार आहेत. सरकारने शेड्यूल्ड औषधांसाठी 10 टक्क्यांहून अधिक वाढ करण्याची परवानगी दिली आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, 23 मार्च रोजी, नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटी (NPPA), भारतातील औषधांच्या किमतींवर नियंत्रण ठेवणारी सरकारी नियामक संस्था, कंपन्यांना घाऊक किंमत निर्देशांक (WPI) वर आधारित किंमती वाढवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे सादर करण्यास सांगितले होते. त्यानंतर 1 एप्रिलपासून सर्व जीवनावश्यक औषधांच्या किमती सुमारे 2 टक्क्यांनी वाढणार असल्याचं सांगितलं आहे.

कोणती औषधे महागणार… 

अत्यावश्यक औषधांच्याराष्ट्रीय लिस्ट मध्ये मधुमेह, कॅन्सरवरील औषधे, हिपॅटायटीस, हाय ब्लड प्रेशर , किडनी रोग इ. उपचार करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या अँटीरेट्रोवायरलसह 875 हून अधिक औषधांचा यामध्ये समावेश आहे.

किराणा सामानातील सर्वच वस्तूत 10 ते 15 % वाढ…

गेल्या काही दिवसांत खाद्यतेल, तुप, पीठ, रवा, मैदा, बेसनपिठ, किराणा सामानातील सर्वच वस्तू 10 ते 15 टक्क्यांनी महागल्या. त्यामुळे एका मध्यमवर्गीय कुटुंबाचे किराणा सामानाचे बजेट एक हजार रुपयांनी महागलं आहे.

किराणा वस्तू :- 

वस्तू      फेब्रुवारी     मार्च
बेसनपीठ :- 78 रु.   80 रु.
राजमा :- 100 रु.  110 रु.
आटा 5 किलो :-  170 रु. 190 रुपये
रवा :-  28 रु. 32 रु.
सूरजमुखी  :- 165 रु. 180 रु.
पाम तेल  :- 144 रु. 160 रु.
सोयाबीन तेल  :- 158 रु. 165 रु.

Leave A Reply

Your email address will not be published.