Take a fresh look at your lifestyle.

मधुमेहाने ग्रस्त असाल तर गव्हाच्या पिठात फक्त ‘हे’ पीठ मिसळून खा ; एकाच हप्त्यात शुगर लेव्हल कायमची कन्ट्रोलमध्ये राहील !

0

शेतीशिवार टीम : 25 मार्च 2022 : जागतिक स्तरावर मधुमेहाची समस्या एक मोठा धोका म्हणून उदयास आला आहे. मागील काही काळापासून भारतातील परिस्थिती अतिशय चिंताजनक झाल्याचं दिसून येत आहे. आकडेवारी दर्शवते की, जगातील प्रत्येक सहा मधुमेह रुग्णांपैकी एक भारतीय आहे. इतकंच नाही तर भारताला ‘डायबेटिस कॅपिटल’ म्हणूनही ओळखलं जातं आहे.

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, मधुमेह हा सायलेंट किलर आजारांपैकी एक आहे, ज्यामुळे इतर अनेक आरोग्य समस्यांचा धोकाही वाढू शकतो. त्यामुळेच या गंभीर आजारापासून बचाव करण्यासाठी सर्वांनीच उपाययोजना करत राहण्याची गरज आहे. विशेषत: ज्यांना अनुवांशिकदृष्ट्या मधुमेह होण्याची शक्यता आहे त्यांनी अधिक सावधगिरी बाळगली पाहिजे.

मधुमेह हे असा आजार आहे तो कोणत्याही वयात होऊ शकतो आणि तो मुळापासून नष्ट करणे कठीण आहे. खराब जीवनशैलीमुळे हा आजार झपाट्याने पसरत आहे. अशा स्थितीत जगभरातील शास्त्रज्ञ यावर नियंत्रण ठेवण्यासाठी किंवा थांबवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मधुमेहामध्ये रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी अनेक प्रकारच्या आहाराची आवश्यकता असली तरी काही गोष्टींचा वापर करून रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवता येते हे सिद्ध झालं आहे.

नेचर जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात संशोधकांनी मधुमेह नियंत्रित करण्याचा एक उत्तम मार्ग सांगितला आहे. संशोधकांचे म्हणणे आहे की, टाईप-2 मधुमेहामध्ये हिरव्या फणसाच्या पिठाचे (Jackfruit Powder) सेवन करणे खूप फायदेशीर ठरू शकतं. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी त्याचे जबरदस्त परिणाम दिसून आले आहेत. अमेरिकन डायबिटीज असोसिएशननेही हे प्रमाणित केलं आहे.

अमेरिकन डायबिटीज असोसिएशनमध्ये नुकत्याच झालेल्या संशोधनानंतर, हे मान्य करण्यात आलं आहे की, जॅकफ्रूट पिठाचा वापर HbA1c ‘ग्लायकोसिलेटेड हिमोग्लोबिन’, FBG-फास्टिंग ब्लड ग्लुकोज आणि PPG-पोस्टप्रँडियल ग्लुकोजची पातळी कमी करण्यास मदत करतं. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने देखील याची पुष्टी केली आहे की साखर रुग्णांसाठी फणसाचे पीठ (Jackfruit Flour) फायदेशीर ठरत आहे .

परंतु फणसाचे पीठ कसं बनवलं जातं, याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. तर आपण फणसाचे पीठ नेमकं बनवतात कसं ? जर बनवायचं नसलं तर ऑनलाईन मागवायचं कुठून, किंमत? खाण्याची पद्धत या बद्दल सर्वकाही माहिती जाणून घेऊयात…

फणसाचे पीठ कसं तयार कराल ?

बाजारातून स्वच्छ हिरवे फणस आणा. त्याचे चार भाग करा आणि बिया काढा. या बिया चांगल्या प्रकारे सुकवून घ्या, हव्या असल्यास उन्हात ठेऊनही वाळवू शकता. सुकल्यानंतर या बियांवरील पांढर्‍या रंगाची त्वचा काढून टाकावी. बिया कापून मिक्सरमध्ये बारीक करा. जॅकफ्रूट पीठ तुम्हाला खाण्यासाठी तयार आहे.

लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे एका वेळी फक्त 250 ग्रॅम पीठ तयार करा. पीठ जास्त तयार ठेवल्याने ते खराब होऊ शकतं. त्यामुळे जेवढे पीठ वापरायचे आहे तेवढेचं तयार करा.

कसा कराल USE….

1. फणसाच्या पिठापासून थेट रोटी बनवू नका. गव्हाच्या पिठात थोडेसे फणसाचे पीठ (एक चतुर्थांश) मिसळून चांगले मळून घ्यावे व नंतर रोटी करून खावे…

2. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ब्रेड म्हणजेच फणसाच्या पिठाचे ब्रेड बनवून ती ब्रेड बेक करून खाऊ शकता. हे पीठ इडली आणि डोसा पिठातही मिसळता येतं.

3. एवढेच नाही तर ग्रीन टीमध्येही तुम्ही जॅकफ्रूट पावडर वापरता येते…

4. जॅकफ्रूटचे पीठ लापशीमध्ये मिसळूनही खाता येतं.

एवढी खटपट करण्यापेक्षा जर तुम्ही जॅकफ्रूटचे पीठ ऑनलाईन खरेदी करू इच्छित असाल तर तुम्ही https://cutt.ly/9S5wOZg या लिंकवरून मागवू शकता…

Leave A Reply

Your email address will not be published.