CRPF Recruitment 2023 : गृह विभागाची 1.3 लाख पदांची सर्वात मोठी भरती; 69,000 हजारांपर्यंत पगार, पहा पात्रता अन् अर्ज प्रोसेस..
CRPF कॉन्स्टेबल भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी बातमी आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने केंद्रीय राखीव पोलीस दलात कॉन्स्टेबल रँकच्या पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. ANI या वृत्तसंस्थेच्या अपडेटनुसार, CRPF कॉन्स्टेबल भरतीसंदर्भातील अधिसूचना मंत्रालयाने बुधवार, 5 एप्रिल 2023 रोजी जारी केली होती.
CRPF कॉन्स्टेबल भरती 2023 च्या अधिसूचनेनुसार, गट C अंतर्गत वेतन – स्तर 3 (रु. 21,700- रु. 69,100) च्या वेतनश्रेणीवर कॉन्स्टेबलच्या रिक्त पदांवर भरती केली जाणार आहे.
तसेच, एजन्सी अपडेटनुसार, CRPF मध्ये 1.3 लाख कॉन्स्टेबल पदांची घोषणा केली जाणार असून त्यापैकी 1,25,262 पदे पुरुष उमेदवार आणि 4467 पदे महिला उमेदवारांसाठी आहेत. याबाबत, उमेदवारांना CRPF कॉन्स्टेबल भरती 2023 ची अधिसूचना आणि CRPF च्या अधिकृत वेबसाइट crpf.gov.in आणि rect.crpf.gov.in या भरती पोर्टलवर अर्ज प्रक्रिया सुरू झाल्याबद्दल माहिती पाहता येणार आहे.
CRPF भर्ती 2023 : CRPF कॉन्स्टेबल भरतीसाठी पात्रता..
गृह मंत्रालयाच्या CRPF कॉन्स्टेबल भर्ती 2023 नियमांशी संबंधित अधिसूचनेनुसार, केवळ तेच उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत ज्यांनी मान्यताप्राप्त बोर्डातून मॅट्रिक (वर्ग 10) परीक्षा उत्तीर्ण केली आहे, किंवा इतर कोणतीही समकक्ष पात्रता आहे.
तसेच, विहित कट – ऑफ तारखेनुसार उमेदवारांचे वय 18 वर्षांपेक्षा कमी आणि 23 वर्षांपेक्षा जास्त नसावे. परंतु, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना केंद्र सरकारच्या नियमांनुसार उच्च वयोमर्यादेत सवलत दिली जाणार आहे.
Ministry of Home Affairs has issued a notification regarding recruitment for around 1.30 lakh posts of constables in CRPF pic.twitter.com/XgyaOzj9GL
— ANI (@ANI) April 6, 2023
CRPF कॉन्स्टेबल भरतीसाठी निवड प्रक्रिया..
CRPF कॉन्स्टेबल भर्ती 2023 मॅन्युअलमध्ये निवड प्रक्रियेबद्दल माहिती दिलेली नाही. परंतु, CRPF द्वारे सध्या सुरू असलेल्या 9712 कॉन्स्टेबल भरती अधिसूचनेनुसार, उमेदवारांची निवड लेखी चाचणी आणि शारीरिक मानक चाचणी (PST) च्या आधारे केली जाईल. लेखी परीक्षा 2 तास कालावधीची असेल आणि प्रत्येकी 25 प्रश्न सामान्य बुद्धिमत्ता आणि तर्क, सामान्य ज्ञान आणि सामान्य जागरूकता, सामान्य गणित आणि इंग्रजी / हिंदीमधून विचारले जातील.
प्रत्येक बरोबर उत्तरासाठी 1 गुण विहित केला जाईल आणि प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.25 गुण वजा केले जातील. उमेदवार भरती अधिसूचनेत अभ्यासक्रमाची माहिती पाहू शकतील.