Navi Mumbai Metro: नवी मुंबईकरांना खुशखबर..! मेट्रो लाईन – 2 वर 11 Km प्रवास होणार सुरु, पहा तिकीट दर स्टेशन्स अन् Route Maps..
नवी मुंबईत मेट्रोच्या प्रतीक्षेत लोकांचे डोळे भरून आले, मात्र अद्यापही सेवा सुरू झालेली नाही. मेट्रो लाईन – 2 तयार झाली असली, तरी अजूनपर्यंत उद्घाटनाची तारीख नेत्यांना मिळाली नाही.
दरम्यान, एप्रिलमध्ये ही सेवा सुरू होणार असल्याचे सिडको प्रशासनाने सांगितलं आहे. सिडकोने 2023-24 या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात मेट्रो सेवेसाठी 777 कोटींची तरतूद केली आहे. नवी मुंबई मेट्रोचे काम 12 वर्षांपूर्वी सुरू झालं. पेंढार ते बेलापूर दरम्यानच्या पहिल्या टप्प्याचे काम सुरू झालं होतं, मात्र विविध कारणांमुळे ते रखडलं. हे काम पूर्ण करण्यासाठी आणि चालवण्यासाठी सिडकोने नंतर महामेट्रोची नियुक्ती केली.
महामेट्रोची नियुक्ती झाल्यानंतर त्याच्या कामाला गती मिळाली आणि आता या महिन्यातच सेवा सुरू करण्याचा दावा सिडकोने केला आहे. सर्व तयारी करूनही नेत्यांना वेळ मिळत नाहीये. आता नवी मुंबईकरांना जास्त वाट पाहावी लागणार नसल्याचे सिडको प्रशासनाने सांगितलं आहे.
पहिली लाईन महामेट्रोकडे सोपवली..
नवी मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी सिडको नवी मुंबई मेट्रो अंतर्गत 4 एलिव्हेटेड रूट विकसित करत आहे. नवी मुंबई मेट्रोचा पहिला टप्पा हा बेलापूर ते पेंढार हा 11.1 किमीचा मार्ग असून, तळोजा येथे 11 स्टेशन्स आणि कार डेपो आहे. बेलापूर ते पेंढार या फेज – 1 च्या कामाचे कंत्राट महामेट्रोला देण्यात आलं होतं.
10 ते 40 रुपयांपर्यंत भाडे..
सिडकोचे एमडी डॉ. संजय मुखर्जी यांनी सांगितले की, नवी मुंबई मेट्रो -1 मध्ये प्रवास करताना 2 किमी चे भाडे 10 रुपये, तर 2 ते 4 किमीचे भाडे 15 रुपये, 4 ते 6 किमीचे भाडे 20 रुपये असणार आहे.
6 ते 8 किमीसाठी 25 रुपये तर 8 ते 10 किमीसाठी 30 रुपये आणि 10 किमीपेक्षा जास्तसाठी 40 रुपये..
मेट्रो लाईन -1 मध्ये हे आहेत 10 स्टेशन्स..
बेलापूर
सेंट्रल पार्क
पंचनंद
पेंढार टर्मिनल
पेठा पाडा
सायन्स पार्क
सेक्टर -7 बेलापूर
सेक्टर -11 खारघर
सेक्टर -14 खारघर
सेक्टर -34 खारघर
उत्सव चौक