केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ झाली आहे. या वाढीमुळे त्यांचा डीए 42 टक्क्यांवर पोहोचला आहे. 1 जानेवारी 2023 पासून त्याची अंमलबजावणी करण्यात आली. मात्र, एप्रिलच्या पगारात महागाई भत्ता पगारासह खात्यावर जमा केला जाणार आहे. म्हणजे त्यांना 3 महिन्यांची (जानेवारी, फेब्रुवारी, मार्च) थकबाकीही मिळणार आहे.
परंतु, थकबाकीची रक्कम केवळ महागाई भत्त्यात जोडून दिली जात नाही. तर यात इतर भत्तेही जोडले जातात. त्यामुळेच थकबाकीच्या रकमेचे कॅल्क्युलेशन करणे सोपे नाही. आज आपण जाणून घेणार आहोत, की केंद्रीय कर्मचार्यांच्या खिशात त्यांच्या पे – बँडनुसार किती पैसे येतील. आणि त्यांच्या पगारात किती वाढ होईल ?
संपूर्ण तीन महिन्यांची मिळणार थकबाकी..
सरकारने केंद्रीय कर्मचार्यांच्या महागाई भत्त्यात 4% वाढ केली असून आता नवीन दर 42% करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत आता त्यांच्या पगारात मोठी वाढ करण्यात आली आहे. सामान्यतः असे दिसून येते की, कर्मचाऱ्यांच्या पगाराचे कॅल्क्युलेशन त्यांच्या बेसिकमध्ये DA जोडून केली जाते. पण तसे नाही. इतर भत्ते देखील पगारात जोडले जातात आणि डीए वाढीसह, प्रवास भत्त्यात जोडल्यास अंतिम रक्कम देखील जास्त असते. कर्मचार्यांच्या डीएमध्ये 1 जानेवारीपासून वाढ करण्यात आली आहे. अशा स्थितीत त्याला 3 महिन्यांची थकबाकी दिली जाईल. आता 3 महिन्यांची थकबाकी मोजणे आवश्यक आहे.
DA Arrears कॅल्क्युलेटर : किती मिळणार थकबाकी..
केंद्रीय कर्मचाऱ्याच्या 7 व्या CPC लेव्हल – 1 मध्ये, मूळ वेतन GP 1800 वर रु. 18000 पासून सुरू होते. या बँडमध्ये असलेल्यांना DA+TA सह 9477 रुपये मिळतील. परंतु, पूर्वीच्या महागाई भत्त्याच्या तुलनेत 774 रुपये अधिक मिळतील. म्हणजे 3 महिन्यांत त्यांना एकूण 2322 रुपये थकबाकी म्हणून दिले जातील. हे असे 3 महिने आहेत ज्यात वाढीव डीए भरलेला नाही..
महिना | एकूण DA + TA @ 42% | एकूण DA + TA @ 38% | थकबाकी |
---|---|---|---|
जानेवारी 2023 | 9477 | 8703 | 774 |
फेब्रुवारी 2023 | 9477 | 8703 | 774 |
मार्च 2023 | 9477 | 8703 | 774 |
एकूण थकबाकी | 2322 |
लेव्हल – 2 वर किती मिळणार थकबाकी ?
आता केंद्रीय कर्मचार्यांसाठी 7 व्या CPC लेव्हल – 2 मध्ये, GP 1900 वर मूळ वेतन 19900 रुपयांपासून सुरू होते. या कर्मचाऱ्यांना DA + TA सह 10275 रुपये मिळतील. मात्र, मागील महागाई भत्त्याच्या तुलनेत 850 रुपये अधिक येतील. त्यानुसार 3 महिन्यांची थकबाकी रु.2550 मिळेल.
महिना | एकूण DA + TA @ 42% | Total DA + TA @ 38% | थकबाकी |
---|---|---|---|
जानेवारी 2023 | 10275 | 9425 | 850 |
फेब्रुवारी 2023 | 10275 | 9425 | 850 |
मार्च 2023 | 10275 | 9425 | 850 |
एकूण थकबाकी | 2550 |
Top Pay Band Level -14 वर किती मिळणार थकबाकी ?
आता केंद्रीय कर्मचार्यांसाठी 7 व्या CPC मध्ये एकूण लेव्हल -14 करण्यात आलं आहे. या लेव्हल -14 मध्ये GP 10,000 रुपये आहे. यावरील मूळ वेतन रु.1,44,200 पासून सुरू होते. या कर्मचाऱ्यांना DA +TA सह 70,788 रुपये मिळतील. मात्र, मागील महागाई भत्त्याच्या तुलनेत 6,056 रुपये अधिक येतील. त्यानुसार 3 महिन्यांची थकबाकी 18,168 रुपये मिळेल.
महिना | एकूण DA + TA @ 42% | Total DA + TA @ 38% | थकबाकी |
---|---|---|---|
जानेवारी 2023 | 70788 | 64732 | 6056 |
फेब्रुवारी 2023 | 70788 | 64732 | 6056 |
मार्च 2023 | 70788 | 64732 | 6056 |
एकूण थकबाकी | 18168 |
लेव्हल -14 च्या टॉप बेसिक पगारावर किती मिळणार थकबाकी ?
केंद्रीय कर्मचार्यांसाठी 7 व्या CPC लेव्हल -14 मध्ये कमाल वेतन 2,18,200 रुपये आहे. या वेतनश्रेणीत थकबाकीचे कॅल्क्युलेशन सर्वाधिक आहे. लेव्हल-14 मध्ये GP रु. 10,000 आहे. यावर मूळ वेतन रु.2,18,200 आहे. या कर्मचाऱ्यांना DA+TA सह 101,868 रुपये मिळतील. मात्र, मागील महागाई भत्त्याच्या तुलनेत 9,016 रुपये अधिक येतील. त्यानुसार 3 महिन्यांची थकबाकी 27,048 रुपये मिळेल.
महिना | Total DA + TA @ 42% | Total DA + TA @ 38% | Arrears |
---|---|---|---|
जानेवारी 2023 | 101868 | 92852 | 9016 |
फेब्रुवारी 2023 | 101868 | 92852 | 9016 |
मार्च 2023 | 101868 | 92852 | 9016 |
Total arrears | 27048 |
प्रवास भत्ता (Travel allowance) कोणत्या श्रेणीत उपलब्ध आहे ?
प्रवास भत्ता पे मॅट्रिक्स स्तराच्या आधारावर 3 श्रेणींमध्ये विभागलेला आहे. शहरे आणि गावे दोन वर्गात विभागली गेली आहेत. शहरांच्या लोकसंख्येच्या आधारे हे वर्गीकरण करण्यात आलं आहे. पहिली श्रेणी – उच्च वाहतूक भत्ता शहरासाठी असून इतर शहरांना इतरांच्या श्रेणीत ठेवण्यात आलं आहे. एकूण वाहतूक भत्ता = TA + [(TA x DA% )\/100] कॅल्क्युलेशन करण्याचे सूत्र आहे.
किती आहे प्रवास भत्ता..
TPTA शहरांमधील TPTA लेव्हल 1-2 साठी रु.1350, स्तर 3 – 8 कर्मचार्यांसाठी रु.3600 आणि स्तर 9 वरील कर्मचार्यांसाठी रु.7200 आहे. कोणत्याही एका श्रेणीतील कर्मचार्यांना मिळणाऱ्या वाहतूक भत्त्याचा दर सारखाच आहे. फक्त त्यांना मिळणारा महागाई भत्ता त्यात जोडला जातो.
जास्त वाहतूक भत्ता असलेल्या शहरांसाठी, लेव्हल 9 आणि त्यावरील कर्मचाऱ्यांना 7,200 रुपये + DA परिवहन भत्ता मिळतो. इतर शहरांसाठी, हा भत्ता रु.3,600 + DA आहे. त्याचप्रमाणे, स्तर 3 ते 8 मधील कर्मचाऱ्यांना 3,600 अधिक DA आणि 1,800 अधिक DA मिळतो. लेव्हल 1 आणि 2 बद्दल बोलायचं झाल्यास, या श्रेणीमध्ये, प्रथम श्रेणीतील शहरांसाठी रुपये 1,350 + DA उपलब्ध आहे, तर इतर शहरांसाठी रुपये 900+ DA उपलब्ध आहे.