सणासुदीच्या काळात केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी पुन्हा एक आनंदाची बातमी आली आहे. आगामी नवंवर्षाचे नियोजन सुरू झालं आहे. यासंबंधीचे आकडे आता हाती येत असून हे सूचित करते की, नवीन वर्षात त्यांच्यासाठी आणखी चांगलं गिफ्ट मिळणार आहे. विशेषत: महागाई भत्ता वाढीबाबत विशेष आनंदाची बातमी 1 जुलै 2023 पासून महागाई भत्ता 46 टक्के करण्यात आला आहे.
आता यापुढील रिव्हिजन जानेवारी 2024 मध्ये होणार आहे. जर आपण अंदाजे आकडेवारी पाहिली तर, ही रिव्हिजन आजपर्यंतची सर्वात मोठं रिव्हिजन असू शकते..
महागाई भत्त्यात होणार 5 टक्क्यांची वाढ..
केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 2024 हे वर्ष अनेक अर्थाने महत्त्वाचे असणार आहे. महागाई भत्ता (DA) 50 टक्क्यांच्या पुढे जाऊ शकतो. तसेच, जर आपण ट्रेंड पाहिला तर, गेल्या 4 वेळा केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (DA) 4 टक्क्यांनी वाढ झाली आहे. परंतु, नवीन वर्षात महागाई भत्त्यात आतापर्यंतची सर्वात मोठी 5 टक्के वाढ होऊ शकते..
AICPI इंडेक्सद्वारे ठरवला जाणार DA स्कोअर..
सध्याच्या ट्रेंडनुसार महागाई भत्ता 51 टक्क्यांपर्यंत पोहोचू शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. असे झाल्यास 5 टक्क्यांची मोठी वाढ होणार आहे. महागाई भत्ता केवळ AICPI निर्देशांकावरून मोजला जातो. निर्देशांकातील विविध क्षेत्रांमधून गोळा केलेल्या महागाईच्या आकडेवारीवरून कर्मचाऱ्यांचा भत्ता महागाईच्या तुलनेत किती वाढला पाहिजे हे दर्शविते..
आता किती पोहोचला महागाई भत्ता ?
सध्याची परिस्थिती पाहिल्यास, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरसाठी AICPI निर्देशांक जारी करण्यात आले आहेत. निर्देशांकाचा नवीनतम आकडा 137.5 अंकांवर आहे, ज्यामुळे महागाई भत्ता 48.54 टक्क्यांवर पोहोचला आहे. ऑक्टोबरमध्ये हा आकडा 49.30 टक्क्यांच्या पुढे जाईल असा अंदाज आहे. यानंतर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबरचा डेटा जानेवारी 2024 मध्ये किती DA वाढेल हे ठरवेल. परंतु, यासाठी डिसेंबर 2023 च्या AICPI निर्देशांकांची प्रतीक्षा करावी लागेल..
महागाई भत्त्यात मोठी वाढ..
7 व्या वेतन आयोगांतर्गत, AICPI नंबर जुलै ते डिसेंबर 2023 पर्यंत केंद्रीय कर्मचार्यांचा महागाई भत्ता ठरवतील. महागाई भत्ता 48.54 टक्क्यांवर पोहोचला आहे. अजून 3 महिन्यांचा आकडा यायचा आहे. त्यात आणखी 2.50 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. जानेवारी 2024 मध्ये महागाई भत्त्यात 5 टक्के वाढ दिसू शकते. महागाई भत्ता कॅल्क्युलेटर (DA Calculator) उर्वरित महिन्यांत 1-1 पॉइंटची वाढ दर्शवत आहे, त्यामुळे महागाई भत्त्यात 5 टक्के वाढ दिसून आली आहे..
खाली दिलेल्या तक्त्यावरून पहा अंदाज..
महिना / वर्षे | CPI(IW) BY2016=100 | DA% मासिक वाढ |
जानेवारी 2023 | 132.8 | |
फेब्रुवारी 2023 | 132.7 | |
मार्च 2023 | 133.3 | |
एप्रिल 2023 | 134.2 | |
मे 2023 | 134.7 | |
जून 2023 | 136.4 | |
जुलै 2023 | 139.7 | |
ऑगस्ट 2023 | 139.2 | |
सप्टेंबर 2023 | ||
ऑक्टोंबर 2023 | ||
नोव्हेंबर 2023 | ||
डिसेंबर 2023 |