DA Hike : कर्मचाऱ्यांना मिळणार सर्वात मोठं गिफ्ट ! महागाई भत्ता पोहचणार थेट 51% वर, पहा AICPI चेकॅल्क्युलेशन..
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी येणारं नववर्ष 2024 वर्षाची सुरुवात खूप गोड होणार आहे. ऑक्टोबरमध्ये महागाई भत्त्याची भेट मिळाल्यानंतर आता बहुप्रतिक्षित पुढील तारीख डीए वाढीची असणार आहे. येणारे नवीन वर्ष त्यांच्यासाठी आणखी चांगले ठरू शकते. विशेषत: महागाई भत्त्याबाबत चांगली बातमी त्यांची वाट पाहत आहे.
1 जुलै 2023 पासून कर्मचाऱ्यांना 46 टक्के महागाई भत्ता मिळत आहे. जानेवारी 2024 मध्ये महागाई भत्त्यात पुन्हा सुधारणा केली जाणार आहे. हे मोजण्याचे आकडेही यायला लागले आहेत. असे मानले जात आहे की, यंदा महागाई भत्त्यात पुढील वाढ खूप मोठी असणार आहे.
महागाई भत्त्यात (DA) होणार 5 टक्क्यांची मोठी वाढ..
महागाई भत्त्यात आतापर्यंतची सर्वात मोठी 5 टक्के वाढ होऊ शकते. AICPI निर्देशांकाने निर्धारित केलेला DA स्कोअर असेच काहीतरी सूचित करतो. सध्याच्या ट्रेंडनुसार महागाई भत्ता 51 टक्क्यांपर्यंत पोहोचू शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. असे झाल्यास 5 टक्क्यांची मोठी वाढ होईल. AICPI निर्देशांकावरून महागाई भत्ता मोजला जातो. निर्देशांकातील विविध क्षेत्रांमधून गोळा केलेल्या महागाईच्या आकडेवारीवरून कर्मचाऱ्यांचा भत्ता महागाईच्या तुलनेत किती वाढला पाहिजे हे दर्शविते…
सध्याची परिस्थिती काय आहे ?
जर आपण सध्याची परिस्थिती पाहिली तर, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरसाठी AICPI निर्देशांक जाहीर केले आहेत. सध्या निर्देशांक 137.5 अंकांवर आहे, तर महागाई भत्ता स्कोअर 48.54 टक्क्यांवर पोहोचला आहे.
ऑक्टोबरमध्ये हा आकडा 49 टक्क्यांहून अधिक होईल, असा अंदाज आहे. त्यानंतरही नोव्हेंबर आणि डिसेंबरची आकडेवारीही येणे बाकी आहे. डिसेंबर 2023 चे AICPI निर्देशांक आल्यानंतरच, एकूण महागाई भत्त्यात किती वाढ होईल हे अंतिम होणार आहे.
महागाई भत्त्यात होणार मोठी वाढ..
7 व्या वेतन आयोगांतर्गत, AICPI क्रमांक जुलै ते डिसेंबर 2023 पर्यंत केंद्रीय कर्मचार्यांचा महागाई भत्ता ठरवतील. महागाई भत्ता 48.50 टक्क्यांवर पोहोचला आहे. 3 महिन्यांचे आकडे येणे बाकी आहेत. त्यात आणखी 2.50 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. परंतु, हे पूर्णपणे निर्देशांकाच्या कॅल्क्युलेशनवर अवलंबून असेल. महागाई भत्ता कॅल्क्युलेटर उर्वरित महिन्यांत महागाई भत्ता 51 टक्क्यांपर्यंत पोहोचेल असे संकेत देत आहे.
खाली दिलेला चार्ट लक्ष देऊन पहा तुम्हाला आयडिया येईल..
महिना /वर्षे | CPI(IW) BY2016=100 | DA% मासिक वाढ |
जानेवारी 2023 | 132.8 | |
फेब्रुवारी 2023 | 132.7 | |
मार्च 2023 | 133.3 | |
एप्रिल 2023 | 134.2 | |
मे 2023 | 134.7 | |
जून 2023 | 136.4 | |
जुलै 2023 | 139.7 | |
ऑगस्ट 2023 | 139.2 | |
सप्टेंबर 2023 | 137.5 | |
ऑक्टोबर 2023 | ||
नोव्हेंबर 2023 | ||
डिसेंबर 2023 |