शेतीशिवार टीम :18 जुलै 2022 :- उन्हाळा असो किंवा हिवाळा, इन्व्हर्टर (Inverter) हे घरातील अत्यंत महत्त्वाचे उपकरण आहे. विशेषत: ज्या भागात वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण अधिक आहे, तेथे हे अधिक महत्त्वाचे आहे. तुमच्या घरी चांगला इन्व्हर्टर असल्यास, तुमची इलेक्ट्रॉनिक उपकरणे वीज खंडित झाल्यानंतरही कार्यरत राहतील. जर तुम्ही इन्व्हर्टर विकत घेण्याचा विचार करत असाल पण बजेट जास्त नसेल, तर बाजारात परवडणाऱ्या रेंजमध्ये अनेक इन्व्हर्टर यूपीएस आहेत. चांगली गोष्ट अशी आहे की तुम्ही ते EMI वर देखील खरेदी करू शकता, त्यामुळे तुमच्या खिशावर लगेच जास्त भार पडणार नाही. 5,000/- च्या रेंजमधील काही सर्वोत्कृष्ट इन्व्हर्टर पाहू या, जेणेकरून तुम्ही तुमची खरेदी आरामात करू शकता…

Luminous Eco Volt Neo 850 Sine Wave Inverter :-

हा किफायतशीर इन्व्हर्टर आहे. डिझाईनबद्दल बोलायचे तर ते स्लीक, स्टायलिश, टिकाऊ आहे. हे अडॅप्टिव्ह बॅटरी चार्जिंग कंट्रोल (ABCC) टेक्नॉलॉजीसह येते, जे जलद बॅटरी चार्जिंग सुनिश्चित करते. शिवाय,यामुळे बॅटरीच लाईफ देखील सुधारते. याव्यतिरिक्त, कमी इनपुट व्होल्टेजवर पूर्ण चार्जिंग करंट बॅटरी चार्जिंगची वेळ कमी करते. विशेषतः ते कमी व्होल्टेज क्षेत्रांसाठी आयडियल आहे. इन्व्हर्टर ECO मोड आणि UPS मोडसह येतो, जेथे ECO मोड विस्तृत व्होल्टेज बँडमध्ये चालतो, ज्यामुळे ऊर्जेचा वापर कमी होतो आणि बॅटरीचे लाईफ वाढते, तर UPS मोड स्थिर आउटपुट प्रोव्हाइड करते. व्होल्टेज सुनिश्चित करते.

हे 80Ah-220Ah क्षमतेच्या 12V इन्व्हर्टर बॅटरीच्या 1 युनिटला सपोर्ट करते. सेफ्टीच्या फीचर्सबद्दल बोलायचे तर, इन्व्हर्टर ओव्हरलोड प्रोटेक्शन, शॉर्ट-कट प्रोटेक्शन इत्यादींनी सुसज्ज आहे. त्याच्या मदतीने तुम्ही रेफ्रिजरेटर, एलईडी टीव्ही, पंखा आणि एलईडी ट्यूब लाईट इत्यादी चालवू शकता. बॅटरी बॅकअप वेळ 5 तास आहे. फ्लिपकार्टवर या इन्व्हर्टर बॅटरीची किंमत सध्या 5,500 रुपये आहे. कंपनी या उत्पादनावर 2 वर्षांची वॉरंटी देत ​​आहे. तुम्ही ते Rs 191 च्या मासिक EMI वर खरेदी करू शकता.

Genus Challenger 1100 | Modern Pure Sine Wave Home Inverter :-

जीनस चॅलेंजर 1100 हे 4-स्टार रेट केलेले, शक्तिशाली आणि स्टायलिश इन्व्हर्टर आहे. हे ऑटो सेन्स इंटेलिजेंट कंट्रोल (ASIC) तंत्रज्ञानासह येते, जे बॅटरीचे लाईफ आणि परफॉर्मन्स वाढवते. तसेच,प्युअर साइन वेव्ह तंत्रज्ञान संवेदनशील उपकरणांचे संरक्षण करते. याव्यतिरिक्त, DFP आधारित तंत्रज्ञान तुम्हाला ग्रीडशी जुळणारे पॉवर आउटपुट प्रदान करते.

यामध्ये तुम्हाला बॅटरी रिव्हायव्हल मोडची सुविधा मिळते, ज्यामुळे बॅटरीचे आयुष्य वाढू शकते. याशिवाय, हा इन्व्हर्टर 4 बॅटरी चार्जिंग मोडसह येतो. हे IS प्रमाणित आहे, जे तुमची आणि तुमच्या कुटुंबाची सुरक्षितता सुनिश्चित करते. Amazon वर त्याची किंमत 6,200 रुपये आहे. तुम्ही ते रु. 292 च्या मासिक EMI वर देखील घरी आणू शकता.

Microtek Inverter UPS EB 900 (800Va) Digital Inverter :-

जर तुम्हाला कमी किमतीत इन्व्हर्टर घ्यायचे असतील तर तुम्ही मायक्रोटेक च हे इन्व्हर्टर वापरून पाहू शकता. जर तुम्हाला घरगुती वापरासाठी इन्व्हर्टर घ्यायचे असेल तर तुम्ही ते ट्राय करू शकता. हे अर्गोनॉमिक डिझाइनसह ऊर्जा बचत करणारे इन्व्हर्टर आहे. या इन्व्हर्टरच्या मदतीने तुम्ही ट्यूबलाइट, बल्ब, छतावरील पंखे, रेफ्रिजरेटर इत्यादी चालवू शकता.

इन्व्हर्टरचा जास्तीत जास्त वीज वापर 672 वॅट्स आहे. इन्व्हर्टर त्याच्या साइन वेव्हद्वारे संवेदनशील घरगुती उपकरणांची सुरक्षा सुनिश्चित करतो. याव्यतिरिक्त, इन्व्हर्टरमध्ये डिजिटल डिस्प्ले आहे, जो त्याची स्थिती दर्शवितो. हे वापरकर्त्यांना पॉवर बॅकअपबद्दल अपडेट करते. या इन्व्हर्टरची किंमत सध्या Amazon वर 5,499 रुपये आहे. तुम्ही ते Rs 259 च्या EMI वर खरेदी करू शकता. या उत्पादनावर 2 वर्षांची वॉरंटी आहे.

Exide Technologies 850 Va Pure Sinewave Home Ups Inverter :-

Exide Technologies मधील हा इन्व्हर्टर घरच्या वापरासाठी बेस्ट ऑप्शन ठरू शकतो.हा ऑटो सेन्स इंटेलिजेंस कंट्रोल फीचरसह येतो. हे फीचर वापरकर्त्याला इन्व्हर्टर बॅटरीची स्थिती समजून अलर्ट करते. हे उच्च-गुणवत्तेच्या संरक्षणासाठी पीसीबी वापरून बनवले जाते. या मॉडेलची लोड क्षमता 580 वॅट्स आहे. इन्व्हर्टरमध्ये उच्च गती आणि उच्च गुणवत्तेचा मायक्रोप्रोसेसर आहे, जो मेन्सप्रमाणेच ग्रिड गुणवत्तेची उर्जा वितरीत करतो.

AISC तंत्रज्ञान वॉटर टॉपिंग कमी करण्यात मदत करते आणि त्यानुसार चार्जिंग करंट समायोजित करते. हे वापरण्यासाठी सुरक्षित इन्व्हर्टर आहे. Amazon वर त्याची किंमत 6,096 रुपये आहे. तुम्ही ते रु. 287 च्या मासिक EMI वर खरेदी करू शकता. कंपनी त्यावर 2 वर्षांची वॉरंटी देते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *