शेतीशिवार टीम, 8 जानेवारी 2022 : लोकसभा निवडणुकीची सेमीफायनल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उत्तर प्रदेशसह 5 राज्यांच्या निवडणुका निवडणूक आयोगाने जाहीर केल्या आहेत. 403 विधानसभा जागा असलेल्या उत्तर प्रदेशात 7 टप्प्यात मतदान होणार आहे. याशिवाय उत्तराखंड, गोवा आणि पंजाबमध्ये 14 फेब्रुवारीला एकाच फेरीत मतदान होणार आहे.

मणिपूरमध्ये 27 फेब्रुवारी आणि 3 मार्चला दोन टप्प्यात मतदान होणार आहे. उत्तर प्रदेशमध्ये 10 फेब्रुवारीला पहिल्या फेरीचे मतदान होणार आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील मतदान 14 फेब्रुवारीला होणार आहे. 20 फेब्रुवारीला तिसरी आणि चौथी फेरी 23 तारखेला होणार आहे. 27 फेब्रुवारीला 5वी, 3 मार्चला 6वी आणि 7वी फेरी 7 मार्चला होणार आहे. तर पाचही राज्यांचे निकाल 10 मार्चला जाहीर होणार आहे. अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांनी दिली आहे.

रॅली, रोड शोवर बंदी, फक्त आभासी प्रचाराला परवानगी :-

यूपीसह पाचही राज्यांमध्ये मतदानाची वेळ एक तासाने वाढवण्यात आली आहे. याशिवाय 15 जानेवारीपर्यंत सर्व राज्यांमध्ये कोणत्याही प्रकारची रॅली, रोड शो, बाइक रॅली, रस्त्यावरील मेळाव्यावर बंदी घालण्यात आली आहे.

केवळ आभासी मोहिमांना परवानगी असणार आहे. 15 जानेवारीनंतर परिस्थितीचा आढावा घेतला जणार आहे. जर कोरोना आटोक्यात आला तर थोडी शिथिलता दिली जाऊ शकते. निवडणूक संपल्यानंतर कोणत्याही प्रकारच्या विजयी मिरवणुकीवर बंदी घालण्यात आली आहे.

सर्व निवडणूक अधिकाऱ्यांसाठी कोरोनाचे दोन्ही डोस घेतलेले असावेत…

प्रत्येक कार्यक्रमाचे व्हिडिओग्राफी, 1620 मतदान केंद्रांवर महिला कर्मचारी :-

सर्व कार्यक्रमांचे व्हिडिओग्राफी करण्यात येणार असल्याचे मुख्य निवडणूक आयुक्तांनी सांगितले. कोरोनाच्या काळात निवडणुका घेणे आव्हानात्मक आहे. यूपीसह 5 राज्यांच्या निवडणुकीत 690 जागांवर मतदान होणार आहे. आम्ही सर्व राज्यांचे डीजीपी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला आहे. असं मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *