शेतीशिवार टीम, 8 जानेवारी 2022 : कोरोना काळात आहे काही स्टॉक्स आहेत जे मल्टीबॅगर्स ठरले आहेत. या काळात पेनी स्टॉकने जबरदस्त रिटर्न्स दिले आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांचा पैसा अनेक पटींनी वाढला आहे. असाच एक पेनी स्टॉक म्हणजे लॉयड्स स्टील्स इंडस्ट्रीज (Lloyds Steel Industries) .

लॉयड्स स्टील्सच्या (Lloyds Steel Industries) स्टॉकची किंमत :

10 जानेवारी 2020 रोजी, हा स्टील्स स्टॉक NSE वर 0.50 च्या किमतीवर होता. तर आता दोन वर्षांनंतर, 7 जानेवारी 2022 रोजी त्याची किंमत 24.95 रुपये झाली आहे. या दोन वर्षात या शेयर्सने सुमारे 4900% वाढ झाली आहे.

गेल्या 2 वर्षात कसा आहे स्टॉकचा प्रवास :-

गेल्या एका वर्षात, हा मल्टीबॅगर पेनी स्टॉक (Multibagger penny stock) रु.1.00 वरून रु.24.95 प्रति स्टॉक पर्यंत वाढला आहे. या कालावधीत सुमारे 2400% वाढ नोंदवण्यात आली आहे.

गेल्या 6 महिन्यांत लॉयड्स स्टील्स इंडस्ट्रीजच्या शेअरची किंमत 3.45 रुपयांवरून 24.95 रुपयांपर्यंत वाढली आहे. या कालावधीत सुमारे 625% वाढ झाली आहे. गेल्या एका महिन्यात, पेनी स्टॉकने रु.10.80 वरून रु.24.95 ची पातळी गाठली आहे. एका आठवड्यात, हा मल्टीबॅगर पेनी स्टॉक 20.65 रुपयांवरून 24.95 रुपयांपर्यंत वाढला आहे, ज्यामुळे गुंतवणूकदारांना सुमारे 21% रिटर्न्स मिळाले आहे.

1 लाखांचे झाले 50 लाख :-

जर एखाद्या गुंतवणूकदाराने एका आठवड्यापूर्वी म्हणजे 3 जानेवारी 2022 रोजी लॉयड्स स्टील्स इंडस्ट्रीजच्या (Lloyds Steel Industries) स्टॉकमध्ये 1 लाखाची गुंतवणूक केली असेल तर त्याची रक्कम 1.21 लाख रुपये झाली आहे.

जर गुंतवणूकदाराने महिन्यापूर्वी 1 लाख गुंतवले असते तर त्याची रक्कम 2.30 लाख रुपये झाली असती.

गेल्या 6 महिन्यांत 1 लाखाची रक्कम 7.25 लाखांवर गेली आहे,

तर वर्षभरापूर्वी ती 25 लाख रुपये झाली आहे. दोन वर्षांत ही रक्कम वाढून ५० लाख झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *