शेतीशिवार टीम, 8 जानेवारी 2022 : गुडगावस्थित ओकिनावा ऑटोटेक (Okinawa Autotech) कंपनीने हिरो इलेक्ट्रिकला मागे टाकून प्रथम क्रमांकाची इलेक्ट्रिक स्कूटर बनली आहे. गेल्या महिन्यात ओकिनावाने (Okinawa) सर्वाधिक इलेक्ट्रिक वाहने विकली.

जेएमके रिसर्चच्या (JMK Research) रिपोर्टनुसार, ओकिनावाने (Okinawa) डिसेंबर 2021 मध्ये एकूण 6,098 इलेक्ट्रिक स्कूटर विकल्या तर हिरो इलेक्ट्रिकने एकूण तर हिरो इलेक्ट्रिकने एकूण 6,058 युनिट्स विकल्या.

सात महिन्यांत ओकिनावाने (Okinawa) विक्रीच्या चार्टवर प्रथम क्रमांक पटकावण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी एप्रिल आणि मे 2021 मध्ये देखील ओकिनावाने (Okinawa) हिरो इलेक्ट्रिकला पराभूत केलं होतं. सध्या, ओकिनावाकडे (Okinawa) हाय-स्पीड रेंजमध्ये 71,000 ते रु. 1.06 लाख (एक्स-शोरूम) च्या किमतींसह. रिज, प्रेझ प्रो आणि आय प्रेझ प्लस (Ridge, Prez Pro and I Prez Plus ) 3 इलेक्ट्रिक स्कुटर आहे.

इलेक्ट्रिक स्कुटरच्या टॉप 4 कंपन्या :-

रिपोर्टनुसार, डिसेंबर 2021 मध्ये इलेक्ट्रिक दुचाकींच्या विक्रीत ओकिनावा अव्वल स्थानावर आहे आणि हिरो इलेक्ट्रिक दुसऱ्या क्रमांकावर आहे. यासह, Ampere व्हायकल्स आणि एथर एनर्जी (Ather Energy) डिसेंबर 2021 मध्ये तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *