शेतीशिवार टीम, 8 जानेवारी 2022 : तुम्हाला एक छोटासा प्रयोग करण्यासाठी, तुमच्या आजूबाजूच्या पाच लोकांना विचारा की, तुम्ही काय करत आहेत आणि का करता ? OK ,तुम्हाला आश्चर्य वाटेल की, बहुतेक लोक तुमच्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकणार नाहीत.याचे कारण म्हणजे शंभरपैकी नव्यान्नव जणांना आयुष्यात काय करायचे आहे हे माहीत नसतं.
नजरेत असलेली ही छोटीशी गोष्ट तुमचे संपूर्ण भविष्य ठरवते, लोक जे काही करत आहेत, ते का करत आहेत? आणि त्यातून काय फायदा होईल? हे देखील त्यांना माहीत नसतं. म्हणूनच गोल मैनेजमेंटचा महत्त्वाचा धडा हा आहे की, जर तुम्हाला आयुष्यात पुढे जायचं असेल, तर रोज स्वत:ला विचारा,कशासाठी आणि का हे पुन्हा पुन्हा विचारा. याचा अर्थ तुम्ही काय करत आहात आणि का करत आहात ?
1 – आयुष्याला दिशा मिळेल :-
जेव्हा तुम्ही स्वतःला हे दोन प्रश्न वारंवार विचारता तेव्हा तुमच्या मनात गोष्टी स्पष्ट होऊ लागतात,तसेच तुम्हाला तुमच्या जीवनाचा उद्देश किंवा दिशा मिळते, जोपर्यंत तुमच्या जीवनात ध्येय नसेल,तर पाण्यात वाळू ओतल्यासारखे आहे, जेव्हा ध्येय समोर आहे तुम्हाला कळेल की तुम्ही काय करत आहात आणि का करताय .
२ – पराभवातून स्वतःला लवकर सावरा :-
संशोधन सांगते की, ज्या लोकांचे जीवनातील ध्येय स्पष्ट असते, त्यांना अपयश आलेलं सावरायला वेळ लागत नाही, ते हारण्याला यशाची पायरी म्हणूनही पाहतात, पण ज्यांचे जीवनात ध्येय स्पष्ट नसते त्यांना पराभव किंवा अपयशाचा सामना करावा लागतो. आणि निराश लोकं कमबॅकही लवकर करू शकत नाही.
३ – आत्मविश्वास वाढेल :-
आयुष्यात काय करायचं आहे हे जेव्हा तुम्ही स्वतःला पुन्हा पुन्हा विचाराल, तेव्हा हळूहळू तुमच्या मनातून योग्य उत्तर येऊ लागेल, जेव्हा तुम्हाला काय करायचं आहे ते कळेल, मग कसं करायचं याचं उत्तर शोधणं सोपं जाईल. तसेच गोष्टी त्याच पद्धतीने करू लागतील, ज्यामुळे इतर लोकांच्या तुलनेत तुमचा स्वतःचा आत्मविश्वास आपोआप वाढेल.
४ – स्पष्ट वृत्ती मिळवाल :-
जीवनातील प्रत्येक गोष्टीकडे स्पष्ट दृष्टी असणे सोपे नाही हे खरे आहे, परंतु आपण जगभरातील यशस्वी लोकांकडे पाहिले तर लक्षात येईल की कोणत्याही बाबतीत त्यांचा दृष्टीकोन किती स्पष्ट आहे.
कारण त्यांना आयुष्यातून काय हवंय ते माहीत असतं. तुम्हाला आयुष्यातून काय हवंय हे एकदा स्पष्ट झालं की आयुष्यातील अनेक गोष्टींकडे तुमचा दृष्टीकोनही स्पष्ट होईल, जो आयुष्यात पुढे जाण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे.