शेतीशिवार टीम, 8 जानेवारी 2022 : भारत देशात Coronavirus ने पुन्हा एकदा धुमाकूळ घातला असून या व्हायरस विरुद्ध युद्ध लढायला सामोरं जावं लागणार आहे. अशा परिस्थितीत Coronavirus पुन्हा एकदा महाराष्ट्र तार्डेत केल्याचं पाहायला मिळत आहे.
राज्यात दिवसेंदिवस कोरोनाची भयावह रुग्णवाढ झाल्याचं दिसून येत असून गेल्या 24 तासांत राज्यात कोरोनाचे तब्बल 40,925 नवे रुग्ण आढळले आहेत. मात्र दिलासादायक बाब म्हणजे, गेल्या 24 तासांत राज्यात एकही Omicron व्हेरियंटचा रुग्ण आढळून आला नाही.
यादरम्यान 20 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात नव्या रुग्णांची संख्या मागील दिवसात आढळलेल्या रुग्णांपेक्षा 4,700 अधिक आहे. राजधानी मुंबईत 20,971 नवे रुग्ण आढळले आहेत. राज्यात Covid-19 मुळे आणखी 20 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी 6 मृत्यूंची नोंद मुंबईत झाली आहे.
मुंबईचे महापौर किशोर पेडणेकर यांनी कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रकरणांमध्ये जनतेने कोरोनाशी संबंधित आवश्यक प्रोटोकॉलचे पालन करण्याचे आवाहन केलं आहे. महापौर म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लॉकडाऊन लागू करण्याच्या बाजूने नाहीत, परंतु लोक अजूनही नियमांचे गांभीर्याने पालन करताना दिसून येत नसल्यामुळे विकेंड लॉकडाऊन लावलं जाण्याची शक्यता आहे.
गेल्या 24 तासांत राज्यातील 14,256 रुग्णही कोरोनामधून पूर्णपणे बरे झाले आहेत. आतापर्यंत राज्यात कोविडमधून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 65,47,410
वर पोहोचली आहे. पॉझिटिव्हिटी रेट 95.8% आहे. सध्या राज्यात 7,42,684 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून 1,463 लोकांना संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे.
दरम्यान, राज्याचे गृहराज्यमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या 20 कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. मंत्र्यांच्या निवासस्थानी राहणाऱ्या लोकांची नमुना चाचणी घेण्यात आली आहे, अशी माहिती महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांच्या कार्यालयाने शुक्रवारी दिली.
तसेच राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या ‘रामटेक’ या शासकीय निवासस्थान्यातील 22 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.