शेतीशिवार टीम, 8 जानेवारी 2022 : शेयर मार्केटमध्ये असे काही Multibagger Penny Stock आहेत त्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना अगदी कमी कालावधीत बंपर रिटर्न्स दिले आहेत. असाच एक स्टॉक म्हणजे एके स्पिन्टेक्स AK Spintex. गेल्या वर्षभरात मार्केटमध्ये टेक्सटाइल इंडस्ट्रीच्या स्टॉकने गुंतवणूकदारांना मालामाल केलं आहे. आणि हा AK Spintex ही टेक्सटाइल इंडस्ट्रीचा आहे.
या आठवड्यात फक्त 5 ट्रेडिंग सत्रांमध्ये AK Spintex च्या शेयर्सने 100% रिटर्न्स दिले आहे.
गेल्या आठवड्यात म्हणजे 30 डिसेंबर 2021 रोजी, AK Spintex ची बंद किंमत फक्त 24.50 रुपये होती. ती आज 7 जानेवारी 2022 मध्ये 52.35 रुपयांवर अप्पर सर्किट लॉक केलं आहे.
अवघ्या सात दिवसात 114% चे मल्टीबॅगर रिटर्न्स दिले आहे. याचा अर्थ जर एखाद्याने आठवड्यापूर्वी 1 लाख रुपये गुंतवले असतील तर आतापर्यंत ते 2 लाखांपेक्षा जास्त झाले असते.
जाणून घेउयात AK Spintex चा इतिहास :-
बीएसई सेन्सेक्समध्ये ट्रेड होत असलेल्या या शेयर्सने 10 जुलै 2017 रोजी 84.35 रुपयांची रेकॉर्ड पातळी गाठली होती. तेव्हापासून हा AK Spintex शेअर सातत्याने घसरत होता. 30 एप्रिल 2020 रोजी तो 10 रुपयांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला.
तेव्हापासून हा समभाग रु. 10 च्या नीचांकी पातळी आणि रु. 30 च्या सर्वोच्च पातळीच्या दरम्यान जात होता. 30 डिसेंबर 2021 रोजी, या स्टॉकने 24.50 रुपयांवर बंद झाला.
31 डिसेंबर 2021 रोजी, म्हणजे वर्षाचा शेवटचा दिवस, AK Spintex शेअर 24 रुपयांवर उघडला, परंतु एका दिवसाच्या ट्रेडिंगनंतर 28.25 रुपयांवर बंद झाला. नवीन वर्ष 2022 जणू या स्टॉकसाठी चांगलं ठरलं. सध्या 8 जानेवारी 2022 रोजी हा शेयर्स 52.35 रुपयांवर आहे.
आठवडाभरात 1 लाखांचे झाले 2,14,000 रु. :-
या स्टॉकने फक्त 7 दिवसात 114% चा चांगले रिटर्न्स दिले आहे. यानुसार, जर एखाद्याने 1 आठवड्यापूर्वी ₹ 1,00,000 ची गुंतवणूक केली असेल, तर आतापर्यंत 1,14,000 रु. निव्वळ नफा झाला असता.
जर एखाद्याने एप्रिल 2020 मध्ये सुमारे 10 रु. च्या किमतीत गुंतवणूक केली असती, तर आजच्या रिटर्न्स नुसार, 424% नफा झाला असता. याचा अर्थ असा की आतापर्यंत ₹1,00,000 ₹5,24,000 झाले असते.