फोर्ड एंडेव्हर (Ford Endeavour) ही भारतातील बलाढ्य टोयोटा फॉर्च्युनरला टक्कर देणारी कार होती. फोर्डच्या पोर्टफोलिओमधील ही एकमेव कार होती जिने या सेगमेंटमध्ये चांगली विक्री केली. फोर्डने भारतातून आपला गाशा गुंडाळल्यानंतर, एंडेव्हर बंद करण्यात आली आणि तो कधीही भारतात परतणार नाही अशी अपेक्षा होती. पण गेल्या काही महिन्यांत गोष्टी बदलल्या आहेत आणि फोर्ड Endeavour पुन्हा भारतीय बाजारात दमदार कमबॅक तर करणारचं आहे तर ती तरुणांची पसंत Ford Mustang EV सेगमेंट मध्ये लॉन्च करणार आहे.
आकर्षक डिझाईन..
2024 च्या फोर्ड एंडेव्हरमध्ये, तुम्हाला पूर्वीपेक्षा अधिक आक्रमक आणि मस्क्युलर लूक पाहायला मिळणार आहे. या कारच्या फ्रंटला तुम्हाला नवीन ग्रिल पाहायला मिळेल. याशिवाय, तुम्हाला या कारमध्ये C आकाराचे एलईडी डीआरएल, एलईडी हेडलॅम्प आणि नवीन डिझाइन केलेले बंपर देखील पाहायला मिळतील.
या कारच्या साइड प्रोफाईलबद्दल सांगायचे तर, तुम्हाला प्रोमिनेन्ट व्हील आर्च, रूफ रेल आणि नवीन अलॉय व्हील पाहायला मिळतील. तुम्हाला या कारच्या बॅक साईडला एलईडी टेल लॅम्प, स्पॉयलर आणि स्किड प्लेट देखील पाहायला मिळतील.
दमदार परफॉर्मन्स..
2024 Ford Endeavour मध्ये तुम्हाला तीन प्रकारचे इंजिन ऑप्शन पाहायला मिळणार आहे. या कारमध्ये तुम्हाला 2 लीटर टर्बो चार्ज केलेले पेट्रोल इंजिन पाहायला मिळेल, जे तुम्हाला 240 एचपी पॉवर आणि 380 एनएमचा पीक टॉर्क देईल. याशिवाय या कारमध्ये तुम्हाला ट्विन टर्बो डिझेल इंजिन देखील पाहायला मिळेल. हे इंजिन या कारमध्ये 210 एचपी पॉवर आणि 500 Nm पीक टॉर्क निर्माण करेल. तुम्हाला फोर्ड एंडेव्हरमध्ये V6 डिझेल इंजिन देखील पाहायला मिळेल, हे इंजिन या कारमध्ये 250 एचपी पॉवर आणि 600 एनएमचा पीक टॉर्क जनरेट करेल..
किती असणार किंमत ?
सुरुवातीपासूनच, फोर्ड कंपनी अत्यंत कॉम्पेटेटिव्ह किमतीत आपली टफ आणि स्टायलिश डिझाइन केलेली वाहने भारतात लाँच करत आहे. भारत लवकरच 2024 Ford Endeavour ला अतिशय कॉम्पेटेटिव्ह आणि परवडणाऱ्या किमतीत लाँच करताना दिसणार आहे.
काही सूत्रांनुसार, भारतात या कारची किंमत 35 लाख ते 40 लाख रुपयांच्या एक्स – शोरूम दरम्यान असू शकते. ही कार भारतातील टोयोटाची फॉर्च्युनर, एमजीची ग्लोस्टर आणि स्कोडाची कोडियाक या वाहनांशी थेट स्पर्धा करणार आहे.