शेतीशिवार टीम, 18 जानेवारी 2022 : श्रीगोंद्याचे मा. आमदार राहुलदादा जगताप यांनी आगोदर जिल्हा बँकेवर संचालकपद बिनविरोध मिळून अन् आता कर्मयोगी कुंडलिकराव रामराव जगताप सहकारी साखर कारखान्याची निवडणूक अनेक घडामोडीनंतर आपला करिष्मा दाखवत बिनविरोध करून कारखान्याची सत्ता पुन्हा आपल्या ताब्यात आबाधित ठेवली.
आज मंगळवार दि.18 रोजी कर्मयोगी कुंडलिकराव रामराव जगताप सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक कुकडी कारखान्याच्या मुख्य कार्यालयात अध्यासी अधिकारी दिग्विजय आहेर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
यानंतर सर्व संचालक मंडळाचे मत विचारात घेऊन सर्वानुमते पुन्हा एकदा अध्यक्षपदी मा. आमदार राहुलदादा कुंडलिकराव जगताप यांची निवड झाली आहे.
तर उपाध्यक्ष पदी विवेक पवार आणि संभाजी देविकर यांच्यात जोरदार रस्सीखेच झाली परंतु मा.आमदार राहुलदादा जगताप यांनी येळपणे गटातील विवेक सोपानराव पवार पाटील यांची बिनविरोध निवड केल्याने अध्यक्ष मा. आमदार राहुल जगताप यांच्या समर्थकांनी जल्लोष केला.
या आधी श्रीगोंदा सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी किसान क्रांती पॅनेलने प्रत्येक गटात हजार – दीड हजाराच्या अधिक मताधिक्याने 21-0 अशी आघाडी घेऊन कारखान्याच्या इतिहासातील सर्वांत मोठा विजय मिळविला आहे.