शेतीशिवार टीम, 18 जानेवारी 2022 : IPL 2022 चा मेगा लिलाव 12 आणि 13 फेब्रुवारी रोजी होणार आहे आणि लखनऊ आणि अहमदाबाद या दोन नवीन संघांनी 22 जानेवारीपर्यंत गव्हर्निंग कौन्सिलकडे ड्राफ्टद्वारे राखून ठेवलेल्या तीन खेळाडूंची नावे सादर करायची आहेत. ESPNcricinfo च्या वृत्तानुसार, मेगा लिलावापूर्वी अहमदाबादचा संघ अष्टपैलू हार्दिक पांड्या, रशीद खान आणि शुभमन गिल यांना खेळवणार असल्याचं सांगितलं आहे.
याशिवाय फ्रँचायझीने कोचिंग स्टाफचीही निवड केली आहे. भारताचा माजी वेगवान गोलंदाज आशिष नेहरा मुख्य प्रशिक्षक आणि दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज गॅरी किस्टर्नच्या भूमिकेत दिसणार आहे. इंग्लंडचे माजी फलंदाज आणि सरेचे सध्याचे मुख्य प्रशिक्षक विक्रम सोलंकी हे टीम डायरेक्टर असणार आहे. या तिघांनी यापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगलोरमध्ये एकत्र काम केलं आहे.
गव्हर्निंग कौन्सिलने तीन खेळाडूंची निवड करण्यासाठी फ्रेंचायझीने 15 कोटी, 11 कोटी आणि 7 कोटी रुपये राखून ठेवले आहेत. पण फ्रँचायझीने हार्दिक आणि रशीदला प्रत्येकी 15 कोटी रुपये आणि शुभमनला 7 कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला.
हार्दिक संघाच्या कर्णधाराच्या भूमिकेत दिसणार आहे. तो 2015 मध्ये मुंबई इंडियन्सशी अनकॅप्ड खेळाडू म्हणून जोडला गेला होता. फ्रँचायझीने त्याला 2018 च्या मेगा लिलावात 11 कोटी रुपयांमध्ये कायम ठेवलं होतं.
आता पर्यंत रशीद खानला सनरायझर्स हैदराबादकडून फक्त 6 कोटी रुपये मानधन मिळत होते परंतु आता त्यानेही मोठी भरारी घेतल्याचं पाहायला मिळत आहे.