सुट्टीचा विषय निघाला की पहिली पसंती असते ती गोव्याला.. पण प्रत्येकवेळी आठवडाभराची सुट्टी टाकून गोव्याला जाणं सर्वांनाच जमत नाही; पण गोव्याची छाप मुंबईच्या जवळचं ठिकाण म्हणजे वसई, ब्रिटिशांच्याही आधी पोर्तुगीजांनी ज्या विविध प्रांतात आपल्या वसाहती उभारल्या, त्या भारतातील काही महत्त्वाच्या प्रातांमध्ये वसईचाही समावेश होतो. त्यामुळे वसईत अनेक ठिकाणी गोव्यात असल्याचाच भास होतो. अशा मुंबईजवळच्या गोव्यात घर घेण आता सोप्प झालय..
वसईतील मुख्य आकर्षण म्हणजे वसईचा किल्ला. एकेकाळी मोठे व्यापारी बंदर असलेल्या या प्रदेशामध्ये हा किल्ला आजही दिमाखात उभा आहे. अकराव्या शतकात बांधल्या गेलेल्या या किल्ल्याने अनेक सत्ताबदल पाहिले. किल्ल्यातून फिरताना त्याच्या खाणाखुणा जागोजागी पाहायला मिळतात. किल्ल्यामध्ये जमीन आणि बंदर अशा दोन्ही बाजूंनी प्रवेश करता येतो.
किल्ल्याच्या प्रवेशद्वारावरूनच त्याच्या भव्यतेचा अंदाज येतो. वसई किल्ल्याचे वेगळेपण म्हणजे इथे एकूण सात चर्च आणि चार मंदिरे आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने मंदिरे आणि चर्च असणारा हा बहुदा एकमेव किल्ला असावा. या सर्व चर्च आणि मंदिराला भेट देऊन त्यांची रचना आणि इतिहास जाणून घ्यायचा ठरवल्यास एक दिवस फक्त किल्ला पाहण्यात सहज निघून जाईल.
किल्ल्याच्या एका बाजूला वसईची खाडी; तर दुसऱ्या बाजूला स्थानिक मच्छीमारांची वस्ती आणि विस्तीर्ण किनारपट्टी किल्ल्याच्या बुरूजांवरून पाहता येते. व्यापाराच्या दृष्टीने या बंदराचे महत्त्व आता कमी झाले असले, तरी स्थानिक कोळी बांधव आजही या बंदरात मासेमारी करतात. किल्ल्यावरून मासेमारीच्या या बोटी लक्ष वेधून घेता.
वसईत केळी व नारळी – पोफळीच्या सहवासात अनेक चर्च, मंदिरं उभी आहेत. चर्चच्या आवारातील मनोरे आणि मंदिरातील घंटांचे नाद आजूबाजूच्या गावापर्यंत ऐकू जात असतात. त्यामुळे वसईच्या रस्त्यांवरून फिरताना कायम पार्श्वसंगीत सुरू असते. नाताळच्या काळात तर अख्खी वसई प्रकाशामध्ये न्हाऊन निघते. जागोजागी असणाऱ्या चर्चवर केलेली रोषणाई डोळे दीपवून टाकतात. धार्मिक वास्तूंसोबतच दगडी आणि लाकडी बांधकाम असलेली जुन्या पद्धतीची घरंही लक्ष वेधून घेत राहतात. घरांची कलात्मक रचना, आवार, बगिचा पाहून निवृत्तीनंतरचे आयुष्य अशाच एखाद्या घरात व्यतीत करण्यासाठीचे विचार मनात घर करू लागतात. ही कलात्मकता अनुभवायची असले , तर वसई – भेट लांबणीवर टाकता कामा नये.
नायगाव – वसई – विरार परिसरात अनेक समुद्रकिनारे आहेत. त्यापैकी वसईतील सुरु भुईगाव आणि या समुद्रकिनाऱ्यांवर काय पर्यटकांची गर्दी असते. प्रत्येक समुद्रकिनाऱ्याचं खास वैशिष्ट्य आहे. सुरुच्या समुद्रकिनाऱ्यावर नावाप्रमाणेच सुरूची उंचच उंच झाड असून, त्याच्या सावलीत वाळूतून चालण्याची मजा लुटता येते. रानगाव समुद्रकिनान्याचा रस्ता गावागावातून जातो, त्यामुळे इथ मुख्यतः सायकल आणि बाईकस्वार पाहायला मिळतात आणि निवांतपणे बसून सूर्यास्त अनुभवाचा असेल तर भुईगाव समुद्रकिनारा गाठायला हवा. किनारी प्रदेशातील कोळी लोकांच्या वस्तीला भेट देणं, हा कायमच एक वेगळा अनुभव असतो. म्हणूनच पाचू बंदराला भेट देण्यासाठी स्थानिक कोळी बांधवांच्या छोट्या लाकडी बोटीतून केलेला प्रवास वसई भेट संस्मरणीय करून टाकतो.
बंदरातील मासेमारी, मासळी बाजार, सुकत घातलेली मासळी, पारंपरिक वेशातील कोळी लोक आणि किनाऱ्यालगतच्या छोट्या रेस्टॉरंटमधील माशांचे जेवण वसई भेटीचे वर्तुळ पूर्ण करतात. वसई हे पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि एनएच -48 या महामार्गाद्वारे जोडले गेले आहे.
बहुसंख्य प्रवासी मुंबई आणि ठाणे या प्रमुख ठिकाणी पोहोचण्यासाठी पश्चिम मार्गाचा वापर करतात. मुंबईच्या उपनगरीय रेल्वे नेटवर्कच्या पश्चिम मार्गावर असलेले वसई रोड रेल्वे स्थानकही प्रवास सुकर करते. दादर, लोअर परळ, मालाड, गोरेगाव आणि अंधेरी या दक्षिणेकडील सुप्रसिद्ध भागांशी वसई अगदी सहजपणे जोडलेली आहे. पुढे चर्चगेटला जाणंही फार कठीण राहिलेलं नाही.
एमएमआर रिंग रोड, डीएमआयसी, बुलेट ट्रेन आणि मेट्रो यांसारखे नियोजित प्रकल्प इतर क्षेत्रांशी कनेक्टिव्हिटी वाढवतील. शिवाय सरकारने जलवाहतुकीचे जाळे विस्तारण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद केली आहे. ठाणे आणि वसई खाडी एकमेकांना जोडण्यासाठी 424 कोटी रुपयांची कामे हाती घेण्यात येणार आहेत. गेटवे ऑफ इंडियाजवळ प्रवासी जलवाहतुकीसाठी जेट्टी आणि इतर सुविधा उभारण्यासाठी 162.20 कोटी रुपयांच्या योजनेला मान्यता देण्यात आली आहे.
यामुळे आता दक्षिण मुंबईतून कल्याण, डोंबिवली, वसई खाडी अशी जलवाहतूक शक्य होणार आहे. मुंबई महानगराचा कायापालट करणारा आणि औद्योगिक आर्थिक विकास साधणारा विरार- अलिबाग बहुउद्देशीय महामार्गिकेच्या कामाला या वर्षात सुरुवात करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.
वसई हे मुंबई परिसरातील एक रम्य ठिकाण असल्याने आणि तसे ते टप्प्यातही असल्याने इथे घर घेण्याला अनेकजण पसंती देतात. इथे निवासी आणि व्यावसायिक अशा दोन्ही प्रकारच्या मालमत्ता उपलब्ध आहेत. वसईमध्ये प्रत्येकाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सर्व काही आहे. प्लॉट्स, फ्लॅट्स, स्टुडिओ अपार्टमेंट्स, व्हिला, बिल्डर फ्लोअर्स आणि स्वतंत्र घरांसह विविध प्रकारच्या निवासी मालमत्ताही आहेत.
आवास हाऊसिंग अलॉटमेंट स्कीम :- APPLY FOR LOTTERY – इथे क्लिक करा
अशीच एक उत्तम संधी उपलब्ध झाली आहे ती सुरक्षा स्मार्ट सिटीमुळे वसई स्थानकापासून अगदी जवळ असलेल्या या प्रकल्पात मध्यमवर्गीयांसाठी उत्तम जीवनशैली उपलब्ध होणार आहे. कारण इथे उपलब्ध होणार आहे क्लब हाऊस, स्विमिंग पूल, क्रिकेट मैदान आणि बरंच काही.
आवास हाऊसिंग अलॉटमेंट स्कीम मुळे इथे घर बुक करणाऱ्यांसाठी तीस लाखांच्या आतच म्हणजे 25 ते 28 लाखांच्या दरम्यान घर मिळू शकेल. इथे घेतलेले घर तुमच्यासाठी एक उत्तम सौदा ठरते. रहाण्यासाठी आणि गुंतवणूकीसाठीही..
रहिवासी आणि संभाव्य खरेदीदारांना उत्कृष्ट अनुभव देर्णाया अत्याधुनिक सुविधा आणि सोयींच्या उपलब्धतेमुळे वसईतील गृहनिर्माण बाजारपेठ झपाट्याने विस्तारत आहे. त्यामुळे तुम्ही घर घेण्यासाठी वसईचा विचार करत असाल तर पुढे व्हा आणि कृती कराच !
अनिकेत ठाणेकर